भात

भाताच्या पानावरील अरुंद तपकिरी ठिपके

Sphaerulina oryzina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानाच्या मध्यशीरेभोवती रोगाचे वैशिष्ट्यपूर्ण डाग दिसतात.
  • पर्णकोषाची वाढती रंगहीनता दिसते जिला "जाळीदार धब्बे"ही म्हटले जाते.
  • वाढीच्या नंतरच्या अवस्थेत म्हणजे ओंबी धारणेच्या किंचित पूर्वी ठिपके उमटतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पानांवर २-१० मि.मी. लांबीचे १-१.५ मि.मी. च्यापेक्षा कमी जाडीचे आडवे डाग येतात. मध्यकेंद्राची वाढ पानाला समांतर असते. डागांना गडद तपकिरी केंद्रे असतात व त्यांच्या कडा पानांच्या बाहेरच्या कडांना पोचेपर्यंत फिकट होत जातात. पर्णकोषांवरील डाग पानांवरच्या डागांसारखेच असतात, तर पेरांवरील आणि देठांवरील डाग बारीक असतात आणि बहुधा समांतर वाढतात. प्रतिकारक वाणांत संवेदनशील वाणांपेक्षा डाग अरुंद, बारीक आणि गडद असतात. वाढीच्या नंतरच्या अवस्थेत म्हणजे ओंबी धारणेच्या किंचित पूर्वी ठिपके उमटतात. रोगामुळे ओंब्यातील दाणे वेळेआधी परिपक्व होतात आणि जांभळट तपकिरी रंगहीनता बिया किंवा दाण्यांमध्ये दिसते. झाडे आडवी होणे देखील पाहिले गेले आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

स्फेरुलिना ओरिझिनाविरुद्ध कोणतेही पर्यायी उपचार माहितीत नाहीत. जर आपणांस ह्या रोगावरील उपचार माहिती असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आपल्या उत्तराची वाट पहात आहोत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर तपकिरी अरुंद डागांमुळे शेताला जोखिम असेल, तर प्रोपिकोनॅझोलची फवारणी झाडाच्या वाढीच्या विवध टप्प्यांवर करावी.

कशामुळे झाले

सामान्यतः पालाशाची कमतरता असलेल्या जमिनीत आणि २५-२८ डिग्री सेल्शियस तापमान असलेल्या क्षेत्रात हा रोग आढळून येतो. हा रोग वाढीच्या नंतरच्या अवस्थेत म्हणजे ओंबी धारणेच्या काळात निदर्शनात येतो. पर्यायी यजमानांमुळे बुरशी जगते आणि नविन भातशेताला संक्रमित करते. ओंबी धारणा अवस्थेदरम्यान झाडे या रोगास अधिक संवेदनाक्षम होतात, आणि झाड परिपक्व होण्याच्या वेळी नुकसान अधिक गंभीर होते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक वाण लावा.
  • शेतातील आणि आजुबाजुचे पर्यायी यजमान काढुन टाका.
  • पूर्ण मोसमात संतुलित खत नियोजन करा.
  • पालाशचा पुरवठा पुरेसा होईल याची काळजी घ्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा