सोयाबीन

बेडकाच्या डोळ्यासारखे पानांवरील ठिपके

Cercospora sojina

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानावर बारीक पाणी शोषल्यासारखे ठिपके उमटतात.
  • ठिपके वाढून गोलाकार करपट डागात बदलतात ज्याचे केंद्र राखाडीसर असते आणि कडा गडद तपकिरी असतात.
  • हे खोड आणि शेंगांवर देखील पसरु शकतात.
  • संक्रमित दाण्यांवर गडद लहान आणि मोठे ठिपके दिसतात आणि दाणे आक्रसलेले असतात.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

वाढीच्या कोणत्याही टप्प्यावर संक्रमण होऊ शकते पण हे जास्त करुन फुलधारणेच्या वेळी कोवळ्या पानांवर दिसते. सुरवातीची लक्षणे बारीक, तपकिरी पाणी शोषल्यासारखे ठिपके दिसतात. कालांतराने हे ठिपके वाढून (१-५ मि.मी) गोलाकार करपट डागात बदलतात ज्याचे केंद्र राखाडीसर असते आणि कडा गडद तपकिरी असतात. जर संक्रमण जास्त असेल तर पाने वाळून गळतात. चुरगळलेल्या केंद्रासकट लांबट ठिपके खोडावर येऊ लागतात. शेंगावर गोलाकार किंवा लांबट खोलगट तपकिरी ठिपके उमटतात. संक्रमित दाणे आक्रसलेले असतात आणि विविध आकाराचे तपकिरी ठिपके दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

उपलब्ध असल्यास जैविक उत्पादांबाबत एकात्मिक दृष्टीकोन ठेवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायरॅक्लोस्ट्रोबिन असणार्‍या उत्पादांचा वापर जर लागणीच्या सुरवातीला आणि नंतर वाढीच्या काळात केल्यास बुरशीचा प्रसार रोखण्यास मदत होते. आर्द्र हवामानात बुरशीनाशके चांगले परिणाम देतात. जर पीक काढणीला २१ दिवसांपेक्षा कमी काळ उरला असेल तर उपचार सुरु करु नयेत.

कशामुळे झाले

सर्कोस्पोरा सोजिना बुरशीमुळे बेडकाच्या डोळ्यासारखे ठिपके दिसतात. ही बुरशी दोन पीकांमधल्या काळात शेतातील रोपांच्या अवशेषात किंवा बियाण्यात रहाते. जर संक्रमित बियाणे पेरली तर रोपे देखील संक्रमितच असतात. सोयाबीनची कोवळी पाने जुन्या पानांपेक्षा जास्त संवेदनशील असतात. उबदार, आर्द्र, ढगाळ हवामानाबरोबर वारंवार पडणारा पाऊन या रोगाच्या विकासाला अनुकूल असतो. संक्रमित सोयाबीनच्या रोपांचे अवशेष जर जमिनीवर तसेच सोडले तर ते देखील रोगाच्या वाढीस अनुकूल असतात.


प्रतिबंधक उपाय

  • लवचिक सहनशील किंवा प्रतिकारक वाण लावा.
  • बुरशीविरहित प्रमाणित बियाणे वापरा.
  • शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • संक्रमित पाने आणि फांद्या काढुन टाका.
  • पाण्याचा निचरा चांगला होईल याची काळजी घ्या.
  • हंगामात लवकर लागवड करा.
  • मका आणि इतर तृणधान्यसारख्या यजमान नसणार्‍या पीकाबरोबर तीन वर्षे पीक फेरपालट करा.
  • खोल नांगरुन रोपाचे अवशेष गाडुन टाका.
  • संक्रमित रोपांचे अवशेष काढुन जाळुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा