सोयाबीन

सोयाबीनवरील तपकिरी ठिपके

Septoria glycines

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • जुन्या पानावर पिवळ्या कडासकट लाल तपकिरी अनियमित ठिपके येतात.
  • हे ठिपके एकमेकात मिसळतात आणि पिवळ्या प्रभावळीत मोठे तपकिरी डागत विकसित होतात.
  • पुर्ण पान लालसर तपकिरी आणि पिवळे पडून अकाली गळते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

पहिली लक्षणे बहुधा खालील जुन्या पानांवर दिसतात. वाढीच्या काळात ऊबदार आणि पावसाळी वातावरण रोपातील यांच्या वाढीस अनुकूल असते. पानाच्या दोन्ही बाजुने बारीक अनियमित गडद तपकिरी ठिपके येतात पण जास्त करून फक्त एकाच बाजुने येतात. जसजसा रोग वाढत जातो, तसे डाग मोठे होऊन एकमेकात मिसळुन मोठे अनियमित तपकिरी भाग पानांच्या कडेपासुन किंवा शिरांपासुन सुरवात होऊन पिवळ्या प्रभावळीत रुतलेले दिसतात. कालांतराने पाने लालसर तपकिरी आणि पिवळी पडुन अकाली गळतात. नुकसान व्यापक नसते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ज्या भागात पावसाळी हवामान जास्त काळ असते तिथे बॅसिलस सबटिलिस असणार्‍या उत्पादांचा वापर रोगाच्या सुरवातीच्या टप्प्यावर करा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. तपकिरी डागांमुळे होणारे नुकसान खूप कमी असते म्हणुन सहजासहजी बुरशीनाशकांच्या उपचारांची शिफारस केली जात नाही. बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केल्यास ते प्रतिबंधक स्वरुपाचे असतात. पावसाळ्यात अॅझोक्सिस्ट्रोबिन, क्लोरोथॅलोनिल, मँकोझेब आणि पायाक्लोस्ट्रोबिन गटातील बुरशीनाशकांचा वापर (बहुधा २-२.५ ग्रॅ./ली. पाणी) रोपाच्या जमिनीवरच्या भागांवर करा.

कशामुळे झाले

सोयाबीनवरील तपकिरी ठिपके सेप्टोरिया ग्लायसिन्स नावाच्या बुरशीमुळे होतो. ही संक्रमित रोपांच्या जमिनीतील अवशेषात जिवंत रहाते. मध्य मोसमात ही जास्त पाहिली जाते कारण ही बियाणेजन्य नाही. पाने ओली ठेवणारे हवामान हिला अनुकूल आहे. ऊबदार, आर्द्र आणि पावसाळी वातावरण आणि २५ डिग्री सेल्शियसचे तापमान हिच्या वाढीसाठी अनुकूल आहे. पावसाच्या उडणार्‍या पाण्याने हिचे बीजाणू खालच्या पानांवर पसरुन पहिले संक्रमण होते. ह्याच हवामानात रोपारोपावरील दुय्यम संक्रमणही होते. जरी रोग मुख्यत: खालच्या पानांवर होत असला तरी उष्ण आणि कोरड्या काळात ही क्वचितच वरील झाडीत शिरते. उत्पन्नावर हिचा प्रभाव बहुधा फार कमी पडतो.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास सहनशील वाण लावा.
  • पीक घेतल्यानंतर रोपाचे अवशेष नांगरुन काढुन टाका.
  • यजमान नसणार्‍या (मका, तृणधान्य) पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • संक्रमणाची जोखिम नाहीशी करण्यासाठी शेताची मशागत करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा