कापूस

सोरेशिन

Rhizoctonia solani

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • ओबडधोबड आकाराचे काळे ते लालसर तपकिरी व्रण कोवळ्या रोपांच्या देठांवर दिसतात.
  • देठ वेढले जातात आणि रोप मरु शकते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

कापूस

लक्षणे

खोल गेलेले, अंडाकृती ते आकारहीन, लालसर तपकिरी ते काळे व्रण रोपांच्या देठांवर दिसतात. ह्यांचा विळखा खोडाला पडल्याने कपाशीचे रोप बहुधा मरते. व्रणावर वरवरची बुरशी असते ज्यावर धुळीचे कण चिकटतात. संसर्ग आणि व्रण हे बहुधा जमिनीच्या स्तराखाली वाढतात, पण जसे खोड वाढते आणि उंच होते तसे व्रण जमिनीच्या वर आलेल्या कोंबावर दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

येत्या ४-५ दिवसात जर थंड किंवा पावसाळी हवा असणार असली तर पेरणी करु नये. ५ सेंटीमीटरपेक्षा जास्त खोल पेरणी करु नका.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. एट्रीडायझोल, कॉपर ऑक्झिक्लोराइड, टॉलक्लोफॉस-मिथाइल, थियाबेनडाझोल थिराम, आणि कप्तान असणार्‍या कीटनाशकांच्या संयुक्त वापराने कोंबवाढीची टक्केवारी वाढते आणि कपाशीच्या बियाणातील रोगाची क्षमता कमी करते.

कशामुळे झाले

जमीनीतील बुरशी रिझोक्टोनिया सोलानीमुळे ही लक्षणे दिसतात, जी पुष्कळशा यजमानांना संसर्गित करते. रोपांना झालेल्या जखमा म्हणजे रोपणी करताना वगैरे, संसर्गासाठी अनुकुल असतात. जेव्हा व्रण जमिनीजवळ होतात, तेव्हा त्यांना, वार्‍याने रोप हलुन जमिनीशी झालेल्या घर्षणाने होणार्‍या पेशींच्या व्रणांसारखे समजले जाऊ शकते. जसे रोप वाढते, त्यांच्यात नैसर्गिकत: संसर्गाशी लढण्याची ताकद येते कारण मुळे खोलवर पसरतात आणि मुळातील पेशी घट्ट होतात.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाच्या लक्षणांसाठी बागेतनियमीत नजर ठेवा.
  • प्रतिरोधक किंवा लवचिक वाण वापरा.
  • रोपणीसाठी रोगमुक्त सामग्रीच वापरा.
  • ओल्या मातीत पेरणी करु नका.
  • थंड हवेत पाणी देऊ नका.
  • ज्वारी किंवा इतर छोट्या धान्याबरोबर पीक फिरवणी करावी.
  • जेव्हा जमिनीचे तापमान २० डिग्री सेल्शियसपेक्षा जास्त असताना रोपणी करावी.
  • उंचावलेल्या वाफ्यांवर रोपणी केल्यास जमीनीचे तापमान वाढण्यास आणि पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा