केळी

केळी वरील पनामा मर रोग

Fusarium oxysporum

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • जुनी पाने पिवळी आणि मरगळलेली दिसतात.
  • पाने तपकिरी होऊन कोलमडतात.
  • बुंधा फुटतो.
  • अखेरीस सगळे भाग सडतात आणि मरतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

केळ्यांच्या वाणाप्रमाणे, जंतुंच्या जोमाप्रमाणे आणि हवामान परिस्थितीप्रमाणे लक्षणे थोडी बदलु शकतात. रोग पहिल्यांदा जुन्या पानांना प्रभावित करतो आणि मग हळुहळु वर चढत कोवळ्या पानांना प्रभावित करतो. रोगाचे वैशिष्ट्य आहे पिवळी आणि मरगळलेली पाने आणि देठ आणि खोडाच्या बुडाशी चीर जाणे. रोगट पाने तपकिरी, कोरडी होतात आणि अखेरीस देठांवर कोलमडतात, ज्यामुळे फांदीभोवती, "आवरण"तयार होते. पिवळसर ते लालसर छटा फांदीवर दिसतात ज्या बुडाशी जास्त तीव्र होतात. चीरले असता लालसर ते गडद तपकिरी रंगहीनता आतील भागात दिसते, जी बुरशीच्या वाढीकडे आणि भाग सडण्याचे संकेत देतात. अखेरीस जमिनीच्या वरील आणि खालील सर्व भाग कुजतात आणि मरतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैवनियंत्रक घटके जसे कि ट्रिकोडर्मा व्हिरिडेसारख्या बुरशीचा किंवा स्युडोमोनाज फ्ल्युरोसेन्स जंतुचा वापर जमिनीत करणे ही प्रभावी पद्धत आहे आणि असे केल्यास रोगाच्या घटना आणि गंभीरता कमी होते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. इतर बुरशीच्या रोगांविरुद्ध केळ्यावरील फ्युसॅरियम विल्ट, एकदा निदर्शनास आल्यानंतर बुरशीनाशकांनी नियंत्रित केला जाऊ शकत नाही. कंदांना ठराविक बुरशीनाशकात (१०ग्रॅम प्रति १० ली. पाण्यात) बुडवुन मग रोपणी केल्यानंतर ६ महिन्यांनी सुरवात करुन जमिनीला दर दुसर्‍या महिन्यात भिजविण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

फ्युसॅरियम ऑक्झिपोरम नावाच्या बुरशीच्या प्रजातीमुळे पनामा रोग ज्याला फ्युसॅरियम विल्ट असेही म्हटले जाते तो होतो, जी बुरशी जमिनीत काही तपांपर्यंत राहू शकते. ती रोपात मुळांच्या छोट्या केसांतुन शिरते ज्यासाठी हलकी, पाण्याचा चांगला निचरा न झालेली जमिन अनुकूल असते. म्हणजे ती पाण्याच्या पृष्ठभागावरुन, गाड्यांबरोबर, हत्यारांनी आणि पायतणांनी छोट्या अंतरावर प्रसारित होते. संक्रमित रोपांचे साहित्यही रोगाचा प्रसार लांबवर होण्यात कारणीभूत असते. वाढलेले तापमान रोगाच्या वाढीतील महत्वाचा घटक आहे. खोडातील वाहक भागांना नुकसान झाल्याने पाणी आणि पोषकांचे वहन होत नाही ज्यामुळे पानांचे पिवळे पडणे आणि रोपात जोम नसणे होते. जर सगळी परिस्थिती बरोबर जुळुन आली तर केळ्यावरील फ्युसॅरियम विल्ट फारच विनाशकारी रोग आहे.


प्रतिबंधक उपाय

  • निरोगी झाडापासून धरलेले प्रमाणित स्रोतांकडील बियाणे वापरा.
  • ह्या रोगास प्रतिरोधक बियाणांचे प्रकार वापरा.
  • पाण्याचा निचरा चांगला होईल हे पहा.
  • रोपांवर दर दुसर्‍या अठवड्यात लक्ष ठेवा .रोगी रोपांना जागच्या जागी मारण्यासाठी वनस्चापतीनाशकांचा उपयोग करा.
  • जास्त संसर्गित झालेले रोप मुळापासुन उखडा आणि तिथेच जाळुन टाका.
  • संसर्गित जागेतुन संसर्गित मातीचे वहन निरोगी भागात होणार नाही ह्याकडे लक्ष ठेवा.
  • हत्यारे, अवजारे आणि शेतात वापरायची यंत्रे सोडियम हायपोक्लोराइट ब्लीच वापरुन स्वच्छ करा.
  • उच्च संसर्गित जागेत पुढील ३-४ वर्षे केळी लावु नका.
  • पीक फिरवणी करताना ऊस, भात किंवा सुर्यफुले लावा ज्याने संसर्गाच्या घटना कमी होतील.
  • पीकात अधुनमधुन चायनीज लीकस (अॅलियम ट्युबरोसम) लावा.
  • जे जंतु बुरशीच्या वाढीत बाधा आणतात त्यांना बढावा द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा