इतर

चेरीच्या पानावरील करपा

Apiognomonia erythrostoma

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • शिरांच्या मधल्या भागात किंवा कडेला लागुन फिकट हिरवे डाग पानांवर येतात.
  • नंतर तो एकमेकात मिसळतात आणि मोठे तपकिरी धब्बे तयार होतात हे शिरांनी सीमित नसतात.
  • गडद तपकिरी किंवा काळे ठिपके ह्या सुकलेल्या भागात नुसत्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकतात.
  • अखेरीस पाने मरतात पण झाडालाच लटकुन रहातात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
जर्दाळू
चेरी

इतर

लक्षणे

ह्या रोगाची गंभीरता यजमानाप्रमाणे बदलते, तसेच पर्यावरण परिस्थितीवरही अवलंबुन असते. वसंत ऋतुत पानांवर, शिरांच्या मधल्या भागात किंवा कडांच्या बाजुने फिकट हिरवे डाग येतात. हे डाग नंतर पिवळे ते लाल होतात, काही वेळा ह्यांना पिवळी प्रभावळ असते आणि फळे तसेच फांद्यांवरही येऊ शकतात. जसे ते मोठे होतात, एकमेकात मिसळतात आणि मोठे तपकिरी धब्बे तयार होतात जे शिरांनी सीमित नसतात. ह्या सुकलेल्या भागांवर गडद तपकिरी किंवा काळे ठिपके नुसत्या डोळ्यांनीही दिसतात. अखेरीस पाने सुकतात, आणि मुडपतात. बहुधा ती गळत नाहीत पण झाडालाच लटकुन रहातात. तपकिरी डाग क्वचित फळांच्या पृष्ठभागावर येतात आणि नंतर विकृत आकार आणि चिराही पडु शकतात. बहुधा जरी फक्त पानेच प्रभावित होत असली आणि हल्ला झाला तरी रोगामुळे झाडाचे जास्त मोठे नुकसान होत नाही.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या रोगाचे नियंत्रण करण्यासाठी कोणतेही जैव उपचार उपलब्ध नाहीत. जर आपल्याकडे ह्या रोगावरील काही उपचार असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खालीलपैकी कोणतेही एक सक्रिय घटक असलेली रसायने प्रतिबंधक किंवा उपचारात्मक रुपात वापरली जाऊ शकतात: भायतेरटॅनोल, कॉपर, डिथियानॉन, डोडाइन, फेनब्युकोनाझोल किंवा झिराम. शेताच्या स्वच्छतेबरोबर आणि प्रतिबंधक उपायांच्या सूचिबरोबर बुरशीनाशकांचा वापर केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळतात.

कशामुळे झाले

अॅपियोग्नोमोनिया एरिथ्रोस्टोमा नावाच्या बुरशीमुळे चेरीची पाने करपतात, जी चेरीव्यतिरिक्त प्लम आणि अॅप्रिकॉट्या झाडांनाही प्रभावित करते. बागेच्या जमिनीवर गळलेल्या पानांत किंवा झाडावरुन लटकणार्‍या पानांत बुरशी विश्रांती घेते. वसंत ऋतुत जेव्हा तापमान अनुकूल होते, तेव्हा बुरशी अंकुरते आणि बीजाणू तयार करते जे नंतर वार्‍याने किंवा पावसाने इतर निरोगी पानांवर प्रसारीत होतात. वाढीच्या पूर्ण काळात पाने संवेदनशील रहातात ज्यामुळे संक्रमणाचे चक्र वर्षभरात पुष्कळ वेळा घडू शकते. हे फारशा प्रमाणात पर्यावरणीय परिस्थितीवर आणि झाडाच्या विकासाच्या टप्प्यावर अवलंबुन आहे. चेरीची पाने पूर्ण न उमललेली असणे आणि फळे दिसण्यायोग्य मापाची होणे हे संक्रमणास आवश्यक आहे. दुष्काळ किंवा मुळांच्या नुकसानाच्या ताणाने कमजोर झालेल्या झाडांनाच रोग बहुधा प्रभावित करतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशात जर अॅपियोग्नोमोनिया एरिथ्रोस्टोमाला क्वारंटाइनच्या सूचित घातले गेले असेल तर संबंधित अधिकार्‍यांना कळवा.
  • झाडाचे जास्त सहनशील वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • थेट ऊन मिळेल आणि हवा चांगली खेळती राहील अशी जागा निवडा.
  • झाडीची योग्य छाटणी केल्याने ऊनही आत शिरेल आणि हवाही चांगली खेळती राहील.
  • शेताचे निरीक्षणकरा आणि जंतुंना निवारा देणारे तण काढुन टाका.
  • संतुलित खतांची योजना पूर्ण करण्यासाठी फॉर्टिफायर्सही द्या.
  • सेंद्रिय बाबींचे आच्छादन घालुन जमिनीची आर्द्रता राखा.
  • पाने पूर्ण उमलल्यानंतर रोगाच्या लक्षणांसाठी रोपांचे निरीक्षण करा.
  • शरद ऋतुन गळुन पडलेल्या सगळ्या चेरीजना जमा करुन नष्ट करा किंवा त्यांना जमिनीत खोल पुरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा