मका

झपाट्याने वाढ होण्याची विकृती

Rapid Growth Syndrome

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • अचानक वाढ बळावते आणि वाढीचा दर चांगलाच वाढतो.
  • केंद्रीत वर्तुळे पीळ दिल्यासारखे आणि खूप घट्ट होतात.
  • नविन येणारी पाने उमलल्यानंतर ठळक पिवळी असतात.
  • प्रभावित पाने बुडाशी सुरकुतलेली असु शकतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

झाडाची वाढ खूप झपाट्याने होते. मक्याची पाने व्यवस्थित उमलत नाहीत आणि केंद्रीत वर्तुळे पीळ दिल्यासारखे आणि खूप घट्ट होतात. झपाट्याने होणार्‍या वाढीमुळे नविन पाने उमलत नाहीत आणि उमलताना केंद्रीत वर्तुळे वाकतात आणि पीळ दिल्यासारखी होतात. केंद्रीत वर्तुळात अडकलेली पाने जेव्हा उमलतात तेव्हा ठळक पिवळी असतात ज्यामुळे ती शेतात सहज दिसुन येतात. प्रभावित पाने बुडाशी सुरकुतलेली असु शकतात आणि वाढीच्या पूर्ण हंगामात ती तशीच रहातात.

Recommendations

जैविक नियंत्रण

पुष्कळशा हवामानासंबंधित ताण प्रभावांशी संबंधित प्रकारांप्रमाणेच, काही संकरीत वाणांसाठी हे सर्वसामान्य आहे कि ती इतरांपेक्षा अधिक झपाट्याने वाढ विकृतीला जास्त धार्जिणी असतात. आपल्या भागासाठी उचित सरळ किंवा संकरित वाण निवडा.

रासायनिक नियंत्रण

रसायनिक नियंत्रण ह्या बाबतीत संबंधित नाही.

कशामुळे झाले

नुकसान बहुधा थंड हवामान अचानकपणे उबदार परिस्थितीत बदलण्याशी संबंधित असते ज्यामुळे झाडाच्या वाढ दरात झपाट्याने वृद्धी होते. झपाट्याने होणार्‍या वाढीमुळे नविन पाने पूर्ण उमलत नाहीत ज्यामुळे ती उमलताना केंद्रीत वर्तुळे वाकतात आणि पीळ बसतो. ही विकृती बहुधा वाढीच्या ५व्या ते ६व्या टप्प्यात आढळून येते व काहीवेळा वाढीच्या शेवटच्या म्हणजे १२ व्या टप्प्यात देखील दिसुन येतो. बहुधा ह्याचा उत्पादनावर गंभीर परिणाम होत नाही. लक्षात घ्या कि पीळलेली केंद्रीत वर्तुळे इतर कारणांनीही होऊ शकतात सर्वाधिक प्रमाणात तण नाशकांच्या जखमांमुळे होतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिबंधक उपाय लागु होत नाहीत.
  • प्रभावित झाडांची पाने बहुदा काही दिवसांनी उमलतात.

प्लँटिक्स डाऊनलोड करा