केळी

गोडीचे ठिपके

Sugar Spot

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • फळांच्या सालीवर तपकिरी डाग येतात.
  • गर मऊ असतो.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

केळीची काढणी झाल्यानंतर लक्षणे उमटतात. सुरवातीला बारीक गडद ठिपके केळीच्या सालीवर येतात, जे कालांतराने मोठे होतात. तपकिरी डाग गरात देखील दिसु शकतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

फळ विकसनाची ही प्रक्रिया नैसर्गिक असल्याने कोणतेही जैव उपचार गरजेचे नाहीत किंवा उपलब्ध नाहीत.

रासायनिक नियंत्रण

फळ विकसनाची ही प्रक्रिया नैसर्गिक असल्याने कोणतेही रसायनिक उपचार गरजेचे नाहीत किंवा उपलब्ध नाहीत.

कशामुळे झाले

केळी नैसर्गिकपणे पक्व होत असल्यामुळे लक्षणे उद्भवतात. काढणीनंतरही ती पक्व होत रहातात. डाग येणे हा पिष्टमय पदार्थाचे साखरेत रुपांतर होत असल्याचा संकेत आहे, म्हणजेच जितके जास्त तपकिरी ठिपके तितकी साखरेची पातळी जास्त असते. पॉलिफेनॉल ऑक्झिडेस किंवा थायरोसिनेस या एन्झाइमचा संयोग प्राणवायूशी होणे हे तपकिरी रंगहीनतेचे कारण मानले जाते. एथिलिन हॉर्मोन फळांतील आम्लांशी प्रतिक्रिया करुन त्यांचे विघटन करते ज्यामुळे केळी मऊ पडतात. जेव्हा फळांना जखमा होतात तेव्हा नैसर्गिक तपकिरीपणा आणि मऊपणा जास्तच ठळकपणे दिसते.


प्रतिबंधक उपाय

  • तपकिरीपणाची प्रक्रिया हळू करण्यासाठी काढलेली फळे अंधारात आणि कोरड्या जागी साठवा.
  • केळीला सफरचंद किंवा टोमॅटोसारख्या इथिलिन निर्माण करणार्‍या इतर फळांसह साठवु नका.
  • त्यांना फ्रीजप्रमाणे थंड वातावरणात ठेवण्याचा सल्ला दिला जात नाही.

प्लँटिक्स डाऊनलोड करा