भात

भाताच्या पानावरील कोळी

Oligonychus spp.

कोळी

5 mins to read

थोडक्यात

  • पानाच्या खालच्या बाजुला पावडरी जाळ्यासारखा पदार्थ दिसतो.
  • वरच्या बाजुला पिवळसर तपकिरी ठिपके दिसतात.
  • पाने राखाडी होऊन वाळतात. कोळी फार सूक्ष्म असतात आणि भिंगाशिवाय दिसणे कठीण आहे.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

पानांच्या वरच्या बाजुला पांढरे ठिपके उमटतात व कालांतराने वाळून पिवळे किंवा तपकिरी होतात. यालाच लिफ स्टिपलिंग असे म्हणतात. गंभीर प्रदुर्भावात पाने राखाडी होऊन वाळतात. कोळी पानाच्या खालच्या बाजुला नाजुक जाळी विणतात जी पावडरीसारख्या पदार्थासारखी दिसतात. कोळ्यांनी टोचुन रस शोषण केल्यामुळे झाडातील हरितद्रव्य कमी होऊन ती फिकट पिवळी किंवा फिकट पडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैविक पर्यायात स्युडोमोनाससारख्या जीवाणूंची १० ग्राम प्रती किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया कारगर सिद्ध होते. निंबोळी पेंड युरिया सोबत मिश्रण करून वापरल्याने चांगले परिणाम दिसतात. लक्षणे दिसल्यानंतर विरघळणाच्या गंधकाचे ३ ग्रॅम फवारे मारा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. स्पिरोमेसिफेन असणारी कोळीनाशके या ओ. ओरायझेविविरुद्ध चांगलीच परिणामकारक असतात. तथापि, संक्रमणाची गंभीरता, खर्च आणि कीटकांच्या जनसंख्या घनतेवरील संभाव्य प्रभावाच्या अनुषंगाने उपचारांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच वेळेत उपचार करणे महत्वाचे आहे.

कशामुळे झाले

ऑलिगोनिकस ओरायझे नावाच्या कोळ्याच्या रस शोषणामुळे ही लक्षणे उद्भवतात. उच्च तापमानात (२५ डिग्री सेल्शियस किंवा जास्त) आणि सापेक्ष उच्च आर्द्रतेच्या हवामानात नुकसान खूप जास्त होते. पर्यावरणाच्या स्थितीनुसार कोळीचे जीवन चक्र ८-१८ दिवसांचे असते. प्रौढ बाहेर येतानाच लैंगिकरीत्या पक्व असतात आणि लवकरात लवकर संभोग करतात. पानांच्या खालच्या बाजुला मध्य शीर आणि इतर शिरांच्या बाजुला अंडी एकेकटी घातली जातात. अंडी ४-९ दिवसात उबतात. पाणथळ जमिनीतील तण जे भाताबरोबर सापडतात (एचिनोक्लोआ कोलोना), जे पर्यायी यजमानही असतात त्यामुळेही गंभीर प्रादुर्भाव होऊ शकतो. याचे उपचार कठीण असल्याने, सामान्यतः ज्या जागी यांचा प्रादुर्भाव मागील वर्षी झाला असेल त्याच जागी त्यापुढील वर्षात पुन्हा होतो.


प्रतिबंधक उपाय

  • कोळ्याच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • तण नियंत्रण चोखपणे करा कारण ते कोळ्यांसाठी पर्यायी यजमानांचे काम करतात.
  • पीक घेतल्यानंतर लगेच शेताची खोल नांगरणी करुन भाताचे अवशेष पूर्णपणे गाडून टाका किंवा इतर पीकांबरोबर पीक फेरपालट करा.
  • नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळा कारण ती या उपद्रवास पूरक असतात.
  • काढणीनंतर पीकाचे सर्व अवशेष काढुन टाका.
  • काढणीनंतर खोल नांगरा.
  • यजमान नसणार्‍या पिकांसह फेरपालट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा