भात

लहान शिंग असलेला नाकतोडा आणि टोळ

Oxya intricata & Locusta migratoria manilensis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • भातावरील नाकतोड्याचा प्रौढ हे जवळपास करंगळीच्या आकाराचे व चमकदार हिरवट पिवळ्या रंगाचे, ५ मि.मी ते ११ सें.मी लांबीचे असून त्यांच्या वरच्या बाजूला तीन काळे रेषा असतात.
  • पान, कोंब आणि ओंबीवर (कातरलेले) उपाद्रवाची लक्षणे आढळतात.
  • प्रौढ मोठ्या समूहात एकत्र होऊन स्थलांतर करतात.

मध्ये देखील मिळू शकते


भात

लक्षणे

नाकतोडे पाने खातात व त्यांच्या कडांना नुकसान करतात किंवा मोठा भाग खातात. ते कोवळ्या कोंबांना चावतात आणि ओंब्या बहुधा गळतात. भाताच्या लोंब्यात अंडी असणे आणि पिवळी आणि तपकिरी पिल्ले आणि प्रौढांनी भाताची पाने खाणे ही या उपद्रवाची आणखी काही लक्षणे आहेत.

Recommendations

जैविक नियंत्रण

जैविक नियंत्रण जे नैसर्गिकरीत्या होते जसे कि वॅस्पस, परजीवी माशा आणि किडे, मुंग्या,पक्षी, बेडुक, जाळी विणणारे कोळी यांच्या वाढीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. बुरशीचे जंतु आणि एंटोमोपॅथोजनिक बुरशी (मेटाऱ्ह्याझीम अॅक्रिडम)चा वापर देखील अळ्यांच्या लोकसंख्येचे नियंत्रण करण्यासाठी केला जाऊ शकतो. मीठाचे पाणी आणि भाताचे तूस वापरुन घरी बनविलेलेल विषारी सापळे वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. भातशेतात १०% पेक्षा जास्त नुकसान आढल्यास तिथे किटकनाशकाची फवारणी करून नाकतोड्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. दाणेदार किटकनाशके जास्त प्रभावी नसतात. विषारी सापळे लाऊन प्रौढांना आकर्षित केले जाऊ शकते. क्लोरपायरीफॉस, ब्युप्रोफेझिन, किंवा इटोफेनप्रॉक्स सारखी किटकनाशके फवारणीत वापरली जाऊ शकतात. लागवडीपूर्वी भाताच्या चुडांना मॅलेथियॉनच्या भुकटीद्वारे धुरळणी केली जाऊ शकते. इतर एफएओच्या शिफारस केलेल्या रसायनांमध्ये बॅन्डिओकार्ब 80% डब्ल्यूपी @ 125 ग्रॅम, क्लोरपायरीफॉस 50% ईसी @ 20 ईसी @ 480 मिली, डेल्टामेथ्रिन 2.8% ईसी @ 450 मिली प्रति हेक्टर चा समावेश आहे.

कशामुळे झाले

पान आणि ओंबीवरील वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे पिल्ले आणि प्रौढांमुळे उद्भवतात. ओलसर वातावरण (उदा. भाताचे शेत) त्यांच्या विकासासाठी योग्य असते. नाकतोड्यांची लांबी ५ मिमी ते ११ सेमी पर्यंत असते आणि ते एकतर मोठे आणि सुडेल किंवा लहान आणि जाड असू शकतात. ते एकतर हिरव्या किंवा गव्हाळ रंगाचे असल्यामुळे ते आपल्या सभोवतालच्या वातावरणात सहज मिसळू शकतात. मादी भाताच्या पानांवर पिवळ्या रंगाची अंडी घालते. प्रौढांना पंख फुटतात आणि मोठ्या समूहात एकत्र होऊन स्थलांतर करतात.


प्रतिबंधक उपाय

  • लागवड करताना रोपांच्या चुडा तपासून अंड्याचे गुच्छ आणि पिल्ले काढुन टाका.
  • शेताचे उपद्रवाच्या लक्षणांसाठी आणि नाकतोड्यांच्या पिल्लांसाठी किंवा प्रौढांसाठी नियमितपणे निरीक्षण करा.
  • रात्रीच्या वेळी प्रौढ सुस्त असल्याकारणाने त्यांना झाडावरून वेचून काढा.
  • रोपवाटिका पाण्याने भरा जेणेकरून किडे बुडुन मरतील.
  • रोपवाटिकेत जाळीच्या मदतीने किड्यांना पकडा.
  • पर्यायी यजमान असणार्‍या तणांना काढुन टाका.
  • कीटकनाशके ज्यामुळे मित्र किड्यांच्या संख्येवर परिणाम होईल त्यांचा जास्त वापर टाळा.
  • हिवाळ्याच्या हंगामात अंड्यांचे पुंजके भक्षकांच्या हाती लागण्यासाठी कापणीनंतर खोल नांगरणी करण्याची शिफारस केली जाते. ४५ सें.मी खोल आणि ३० सें.मी.
  • रूंदीचे खंदक कूच करणार्‍या हॉपर्सच्या पुढच्या बाजूला खोदले जाऊ शकतात आणि या खंदकामध्ये लोखंडी पत्रे लाऊन अडथळा निर्माण करावे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा