भात

लाल पट्ट्यांचा रोग

Gonatophragmium sp.

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानाच्या बुडाशी सुईच्या टोका एवढे पिवळसर हिरवे ते फिकट नारिंगी ठिपके येतात.
  • लाल पट्टे किंवा छटा या ठिपक्यांपासुन पानाच्या टोकापर्यंत पसरतात.
  • सामान्यत: फक्त एक किंवा दोन अशा पट्ट्या प्रत्येक पानावर येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

रोपाला ओंब्या लागण्याच्या सुमारास जेव्हा रोपे प्रजनन अवस्थेत पोचतात तेव्हाच सामान्यतः हा रोग होतो. सुरवातीला पानाच्या बुडाशी सुईच्या टोका एवढे पिवळसर हिरवे ते फिकट नारिंगी ठिपके येतात. जसजसा रोग वाढत जातो, डाग पर्णकोषाच्या बाजुने पानाच्या टोकापर्यंत वाढत जातात ज्यामुळे लालसर चट्टे आणि पट्टे दिसतात. डाग करपट होऊन एकमेकात मिसळतात ज्यामुळे पान करपल्यासारखे लक्षण दिसते. या लक्षणांची संत्र्याच्या पानावरील करप्याच्या लक्षणांशी गल्लत होऊ शकते आणि गंभीर टप्प्यांवर लक्षणे एकमेकांपासुन पासुन वेगळी काढणे कठिण असते. तरीपण, लाल पट्ट्याच्या रोगात फक्त एक किंवा दोनच पट्टे प्रति पान दिसतात आणि त्यावर वैशिष्ट्यपूर्ण नारिंगी ठिपक्यांपासुन सुरु होऊन पानाच्या टोकापर्यंत जाणारे पट्टे दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

सध्यापर्यंत ती या रोगावरील जैव नियंत्रण पद्धती उपलब्ध नाही. जर आपणांस काही माहिती असली तर कृपया आम्हाला कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थायोयोफेनेट मिथाइलची फवारणी या रोगाचे परिणामकारकरीत्या नियंत्रण करतात.

कशामुळे झाले

गोनॅटोफ्राग्मियम कुटुंबातील बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात असे मानले जाते. जरी ही बुरशी रोपात वाढीच्या सुरुवातीच्या काळा पासुन उपस्थित असली तरी लक्षणे मात्र ओंब्या लागण्याच्या सुमारास जेव्हा रोपे प्रजनन अवस्थेत पोचतात तेव्हाच सामान्यतः दिसतात. पर्यावरण घटक जसे कि उच्च तापमान, सापेक्ष उच्च आर्द्रता, पाने जास्त वेळ ओली रहाणे आणि नत्राचा उच्च पुरवठा हे रोगाच्या विकसात सहाय्य करतात. असे मानले जाते कि जंतु रोपात प्रवेश करुन विष सोडतो जे पानाच्या शिरांतुन टोकापर्यंत पोचते म्हणुन हे वैशिष्ट्यपूर्ण पट्टे दिसतात. लाल पट्ट्यांचा रोग हा दक्षिणपूर्व आशिया आणि भारतातील भात उत्पादनावरील संभाव्य धोका आहे.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • रोपांत पुरेशी जागा सोडा आणि बियाणे दर योग्य ठेवा.
  • शेताचे या रोगाच्या लक्षणासाठी नियमित निरीक्षण करा.
  • नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा.
  • ओंब्या येण्याच्या सुमारास अधुनमधुन शेतातील पाण्याचा निचरा केल्यानेही या रोगाचा विकास टाळता येईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा