द्राक्षे

द्राक्षांवरील केवडा (डाऊनी मिल्ड्यु)

Plasmopara viticola

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर तपकिरी रंगाच्या प्रभावळीसह पिवळसर हिरवे तेलकट डाग येतात.
  • हे वाढुन अनियमित तपकिरी डागात रुपांतरीत होतात.
  • डागांच्या खाली पांढरट राखाडी कापसासारखा दाट थर येतो.
  • कोंबांवर, नविन कोवळ्या फुटींवर आणि फुलांवरही प्रभव पडतो.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

पानांच्या पृष्ठभागावर तपकिरी प्रभावळीचे पिवळसर हिरवे तेलकट डाग येत येतात. रोगाबरोबर हे ही वाढुन अनियमित करपट डागात रुपांतरीत होतात जे तपकिरी रंगाच्या वेगवेगळ्या छटांचे असतात. पुष्कळशा उबदार आद्र रात्रींनंतर, पांढरट राखाडी दाट कापसासारखा थर ह्या डागांखाली तयार होतो. जर मोसमाच्या उशिरा ह्या रोगाचा प्रादुर्भाव जुन्या पानांवर झाल्यास दोन शिरांमधील भाग पिवळे पडून कालांतराने लालसर तपकिरी ठिगळांसारखी नक्षी तयार होते. वैशिष्ट्यपूर्ण तेलकट तपकिरी भाग आणि बुरशीची वाढ कोंबात, कोवळ्या फुटीत आणि फुलोऱ्यातही आढळते. पानगळ होण्याने किंवा नवीन फुट आणि फुले खुजी होणे किंवा मरत असल्याने वाढ खुंटून उत्पादनात मोठी घट होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

वेलींना होणारी लागण थांबविण्यासाठी लागण होण्यापूर्वीच वापरायच्या सेंद्रिय बुरशीनाशकात कॉपरवर आधारीत बुरशीनाशके जसे कि बोर्डोक्स मिश्रणांचा समावेश आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्रतिबंधात्मक बुरशीनाशके वेलींना होणार्‍या लागणीस प्रतिबंध करण्यात मदत करतात पण ती पानांच्या खालच्याबाजुला व्यवस्थित फवारणे गरजेचे असते. कॉपरवर आधारीत बुरशीनाशके, जसे कि बोर्डोक्स मिश्रण आणि डायथियोकार्बामेटस वापरले जाऊ शकतात. लागण झाल्यानंतर जर बुरशीनाशके वापरायची असली तर ती पहिले लक्षण दिसताक्षणीच वापरायला हवीत. फॉसेटिल अल्युमिनियम आणि फेनैलामाइडस सामान्यत: लागण झाल्यानंतर वापरल्या जाणार्‍या बुरशीनाशकात येतात

कशामुळे झाले

प्लास्मोपारा व्हिटिकोला नावाच्या बुरशीमुळे ही लक्षणे उद्भवतात आणि ज्या भागात वाईनचे उत्पादन होते तिथे वारंवार वसंत ऋतुतील आणि उन्हाळ्यातील पावसाने आणि १० डिग्री सेल्शियस वरील तापमानात हा रोग अतिशय विध्वंसक म्हणून ओळखला जातो. ही बुरशी संक्रमित वेलींच्या अवशेषात, जमिनीत किंवा लागण झालेल्या नवीन फुटींमध्ये आपली सुप्तावस्था घालवते. वसंत ऋतू मध्ये वारा आणि पावसाच्या उडणार्‍या पाण्याने ह्यांचे बीजाणू पसरले जातात. हे बीजाणू फलित झाल्यानंतर अशी रचना तयार करतात जे पानांवरील छिद्रातुन पानांच्या खालच्या बाजुला पसरतात. नंतर हे डाग पसरून वैशिष्ट्यपूर्ण बुरशीचा थर पानांच्या बाहेर दिसु लागतो. १३-३० डिग्री सेल्शियस तापमानात बुरशीची वाढ होते. ज्यावेळी पुष्कळशा गरम आणि आद्र रात्री सलग येतात व तापमान १८-२५ डिग्री सेल्शियस असते अशावेळी ह्या बुरशीची वाढ उत्कृष्ट होत असते.


प्रतिबंधक उपाय

  • पाण्याचा निचरा व्यवस्थित आहे का नाही याची खात्री करा.
  • उपलब्ध असल्यास प्रतिरोधक जाती निवडा.
  • भरपूर सुर्यप्रकाश मिळेल या दिशेने व अशा ठिकाणी द्राक्ष लागवडीचे नियोजन करा.
  • गल्लीतील व दोन वेलीतील अंतर जास्त ठेवा जेणे करून बागेत हवा खेळती राहील.
  • वेलींना व्यवस्थित आधार देऊन जमिनीवर पडू नये ह्याची काळजी घ्या.
  • बागेत व आसपासच्या भागात तणांचे नियंत्रण करा.
  • बागेतील वेलींचे अवशेष काढून टाका.
  • शेती उपयोगी अवजारे वापरल्यानंतर साफ ठेवावीत.
  • संक्रमित माती आणि वेलींची सामग्री इतरत्र नेऊ नका.
  • वेलींचा जोम राखण्यासाठी संतुलित खत नियोजनाची खात्री करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा