डाळिंब

डाळिंबाची मरगळ

Ceratocystis fimbriata

बुरशी

5 mins to read

थोडक्यात

  • पाने पिवळी पडणे ते झाडाची पूर्ण पानगळ होण्यापर्यंत लक्षणे विविध आहेत.
  • फांद्या उभ्या चिरल्या जातात.
  • गडद राखाडीसर तपकिरी छटा फाटलेल्या मुळाच्या, खोडाची साल, फांद्या आणि खोडाच्या वाहक भागात दिसते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
बदाम
लिंबूवर्गीय
आंबा
मॅनिओक
अधिक

डाळिंब

लक्षणे

झाडाच्या एका किंवा काही फांद्यांवर सुरवातीला झाडी पिवळी पडते. नंतर हे पूर्ण झाडात पसरते आणि पूर्ण पानगळ होते. पानांची मरगळ बहुधा खालच्या पानांपासुन वरच्या शेंड्यापर्यंत जाते पण काही रोपात पूर्ण झाडी एकाच वेळी गळते. ह्या रोगात फांद्या उभ्या तडकणे सामान्य आहे. मुळे, फांद्यांच्या साली, खासकरुन खालच्या फांद्यांच्या तडकु शकतात. अशावेळी किंवा रोपाच्या भागांना उभे किंवा तिरके चिरले असतानही राखाडीसर तपकिरी छटा वाहक भागात दिसते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बॅसिलस सबटिलिसच्या जमिनीतील वापराने मरगळीच्या संसर्गात घट दिसुन येते. ट्रिकोडर्मा जातीना पायेसिलोमायसे जातीबरोबर २५ ग्रॅ. प्रति २ किलो चांगले विघटित झालेले सेंद्रिय खतात मिसळुन डाळिंबाच्या खोडाभोवती उपचार केले असता मर संसर्गाचा प्रतिबंध होण्यात मदत होते. नीम, करंज, महुआ आणि एरंडाच्या वड्यांनी जमिनीचे उपचार केले असताही सी. फिम्ब्रियाटाविरुद्ध प्रभावी दिसले आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. संसर्गित भागातुन आणि निरोगी रोपांच्या आजुबाजुची माती भिजविणे किंवा पुर्ण बागेत प्रॉपिकोनाझोल (०.१%) + बोरिक अॅसिड (०.५%) + फॉस्फोरिक अॅसिड (०.५%) वापरुन भिजविण्याची शिफारस केली जाते. मरगळ रोगाचे नियंत्रण करण्यासाठी रोपणीपूर्वी बुरशीनाशके (०.२%) वापरुन माती निर्जंतुक केली जाऊ शकते. जमिनीला प्रॉपिकोनाझोल (०.१५%) किंवा क्लोरपायरिफॉस (०.२५%) वापरुनही भिजविले जाऊ शकते.

कशामुळे झाले

बुरशीचे जीवाणू विश्रांती रचना म्हणुन किंवा संक्रमित रोपांच्या भागात बुरशीचे सक्रिय भाग म्हणुन १९० दिवसांपर्यंत आणि जमिनीत किमान चार महिन्यांपर्यंत जगतात. रोपाचे जमिनीवरील भागात संसर्ग जखमातुन होतो. मुळेसुद्धा सुरवातीच्या नुकसानाशिवायच संसर्गित होऊ शकतात. बीजाणूंचा प्रसार संसर्गित अंकुरलेल्या रोपांद्वारे, सिंचनाद्वारे आणि पावसाच्या पाण्याद्वारे, किड्यांद्वारे आणि नेहमीच्या शेतकामाद्वारे होतो. यजमानात शिरल्यानंतर, बुरशीचे भाग आणि बीजाणू वाहक भागातुन झाडात पसरतात, ज्यामुळे वाहक भागात लालसर तपकिरी ते जांभळी किंवा काळी छटा दिसते.


प्रतिबंधक उपाय

  • रोगाचा प्रसार होणे टाळण्यासाठी संसर्गित रोपाची सामग्री काढुन नष्ट करा.
  • छाटणीचे आणि कलमाचे साहित्य वापरापूर्वी आणि नंतर निर्जंतुक करा.
  • डाळिंबांच्या झाडांचा यजमान नसलेल्या जातींबरोबर फेरपालट करा आणि ज्या ठिकाणी सी.
  • फिमब्रियाटा आधीच उपस्थित आहे अशा जागा टाळा.
  • झाडात पुरेसे अंतर राखा (ज्यामुळे मुळे एकमेकांच्या संपर्कात येऊन बुरशीचा प्रसार होणार नाही).
  • शेतात पाणी जमा झाल्यास संसर्गाचा संभव वाढतो.
  • शेतकामाच्या वेळी झाडांना इजा होऊ देऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा