भात

सोनेरी सफरचंद गोगलगाय

Pomacea canaliculata

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • गोगलगाय पाण्याच्या पातळीखालील खोडांना नुकसान करत असल्याने पिके आडवी होतात.
  • त्या पाण्याखालील फुटवे आणि पाने खातात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

हा उपद्रव फक्त पाणथळ भातशेतीलाच होतो. नुकसानाचे पहिले लक्षण जिथे गोगलगाय पाण्याच्या पातळीखालील खोडांना नुकसान करत असल्याने पिके आडवी होतात. पीक सुरवातीच्या काळात खूप संवेदनशील असते, म्हणुन गोगलगाय मुख्यत: थेट पेरणी केलेली अंकुरित बियाणे आणि ३० दिवस वयाचे लागवड केलेली रोपे खातात. कालांतराने खोड जास्त जाड आणि कडक होते असल्याने गोगलगाय त्यांना खाऊ शकत नाही. गोगलगाय सुरुवातीला फुटवे कातरतात व त्या नंतर पाण्याखालील पान आणि खोड खातात. इतर रोपे जसे कि टॅरो (कोलोकॅसिया एस्क्युलेनटामे) वरही हल्ला होऊ शकतो. या किड्यांचे जीवनचक्र ११९ दिवस ते ५ वर्षांचे असु शकते. जर तापमान उच्च राहीले तर जीवनमान कमी होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

जमिन तयार करताना, लागवड करताना किंवा पीक स्थिरावले असताना मोठ्या प्रमाणात राबवलेल्या गोगलगाय व अंडी संकलन मोहिमा प्रभावी ठरतात. गोगलगायींना वेचून पशू खाद्य म्हणून विकले जाऊ शकते. लाल मुंग्या ज्या गोगलगायींची अंडी खातात, पक्षी किंवा बदके ज्या छोट्या गोगलगायींना खातात त्यांना प्राधान्य दिले पाहिजे. जमिन तयार करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर किंवा रोपे थोडी मोठी होऊन स्थिरावली असताना पाळीव बदक शेतात सोडली जाऊ शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. खत वापराचा सामान्य दर आणि वेळापत्रकाप्रमाणे खताचा वापर २ सें.मी. पाण्यात केल्यास या गोगलगायवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. कीटनाशकांचा वापर पूर्ण शेतात करण्याऐवजी फक्त खोलगट भागात आणि पाण्याच्या मार्गात करा. लागवड केल्यानंतर लगेच किंवा थेट पेरणी केलेल्या भातशेतीत बिया उगवताच पण फक्त ३० दिवसांपेक्षा कमी वय असलेल्या रोपातच या उत्पादांचा वापर केला गेला पाहिजे. नेहमी लेबल वाचुन सुरक्षित वापराची खात्री करा.

कशामुळे झाले

पोमाके कॅनालिक्युलाटा आणि पोमाके मॅक्युलाटा नावाच्या सोनेरी सफरचंद गोगलगायीच्या दोन प्रजातींमुळे ही लक्षणे उद्भवतात. या खूप आक्रमक असतात आणि भातशेतीचे गंभीर नुकसान करु शकतात. त्या बहुधा पाण्याच्या मार्गाने (सिंचन कालवे, नैसर्गिक पाणी वितरण) किंवा शेतात पाणी भरण्याच्या वेळी पसरतात. कोरड्या काळात गोगलगाय स्वत:ला चिखलात गाडुन घेतात आणि सहा महिन्यांपर्यंत सुप्तावस्थेत राहू शकतात, आणि जेव्हा पाणी येते तेव्हा परत वर येतात. भातशेतीत यांच्या रंग आणि आकारामुळे इतर गोगलगायींपासुन वेगळे ओळखता येते. सोनेरी सफरचंद गोगलगायचे कवच मळकट तपकिरी रंगाचे आणि शरीर सोनेरी गुलाबीसर किंवा नारिंगी पिवळे असते. क्षेत्रिय गोगलगायींपेक्षा त्या आकाराने मोठ्या आणि रंगाने फिकट असतात. त्यांची अंडी चमकदार गुलाबी रंगाची असतात आणि शेकडोंच्या पुंजक्याने घातली जातात.


प्रतिबंधक उपाय

  • सशक्त आणि जोमदार रोपांची लागवड करा.
  • रोपांच्या संवेदनशील काळात (३० दिवसांपर्यंत) शेतात पाण्याचा निचरा शक्य होईल तितका करा किंवा या काळात पाण्याची पातळी २ सें.मी.च्या खाली ठेवा.
  • लागवडीसाठी कमी दाटी असलेल्या रोपवाटीकेतील काटक व २५-३० दिवसांची रोपे वापरा.
  • शक्यतो सकाळच्या वेळी गोगलगायींना हाताने वेचून काढा आणि अंड्यांचे पुंजके चिरडुन टाका.
  • भात शेतीच्या आजुबाजुने पपई आणि कसावाची पाने ठेवा ज्यावर गोगलगायी आकर्षित होऊन सहज पकडता येतात.
  • जिथुन शेतात पाणी आत शिरते आणि बाहेर पडते तिथे बांध (अडथळा) घाला.
  • अंडी घालण्याकरिता जागा देण्यासाठी बांबुच्या काठ्या रोवा.
  • नैसर्गिक भक्षकांवर परिणाम होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा उपयोग सिमित ठेवा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा