भात

बायोमफॅलॅरिया गोगलगाय

Biomphalaria spp.

इतर

5 mins to read

थोडक्यात

  • झाडाला शक्यतो सिमीत नुकसान होते.
  • यातील काही गोगलगायी काही प्रकारच्या परजीवींसाठी आंतरिम यजमान असतात, ह्यांमुळे स्किस्टोसोमियासिस नावाचा रोग होतो.
  • गोगलगायींची घर छोटी, गोल, फिकट तपकिरी असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

भाताच्या झाडांना सिमीत नुकसान होते. तरीपण यातील बी. ग्लाब्राटासारख्या काही गोगलगायी परजीवींसाठी आंतरिम यजमान असतात आणि मानवालासुद्धा संक्रमित करु शकतात ज्यामुळे स्किस्टोसोमियासिस नावाचा रोग होतो म्हणुन सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. या रोगाचा प्रसार परजीवींचे वहन करणार्‍या गोगलगायी रहात असलेल्या ताज्या दूषित पाण्याशी (तलाव, डबकी, नद्या, धरणे, पाणथळ आणि भातशेती) मानवी संपर्काने होतो. याचा प्रसार मुख्यत: सिंचनाचे कालवे, ओढे, गटारे, आणि पाणी जमा होण्याने होतो. तरीपण झरे आणि विहिरीतील पाण्याच्या खास रसायनांमुळे तिथे या गोगलगायी वस्ती करीत नाहीत. स्थानिक लोकांना होणारे नुकसान टाळण्यासाठी पिण्यायोग्य पाणी आणि स्वच्छता सुविधा आवश्यक आहेत.

Recommendations

जैविक नियंत्रण

टिलापिया किंवा गप्पी नावाचे मासे संक्रमित पाण्यात उपस्थित असल्यास बायोमफॅरॅलियाची संख्या परिणामकारकरीत्या नियंत्रणांत येते. माशांच्या तलावांना स्किस्टोमियासिसच्या आंतरिम यजमानांपासुन मुक्त ठेवणे महत्वाचे आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. प्राझिक्वांटेल नावाचे द्रावण हे मानवातील स्किटोसोमियासिस रोगाचा मुख्य उपचार आहे. या औषधाच्या एका मात्रेने लक्षणांची गंभीरता आणि संक्रमणाचे ओझे कमी होते असे दिसुन आले आहे. पुन्हा संसर्ग होऊ शकतो म्हणून दूषित पाण्यामध्ये काम करण्याची शिफारस करण्यात येत नाही. संक्रमणाचे चक्र तोडण्यासाठी गोगलगायींचे नियंत्रण गरजेचे आहे.

कशामुळे झाले

बायोमफॅलॅरिया जातीच्या ताज्यापाण्यातील हवेतच श्र्वसन करणार्‍या गोगलगायींमुळे भाताच्या झाडांना नुकसान होते. बायोमफॅलॅरिया गोगलगायींच्या बहुतेक जाती द्विलिंगी म्हणजे एकाच गोगलगायीत नर आणि माद्यांचेही अवयव असतात आणि त्या स्वत: एकेकट्या किंवा इतर गोगलगायींबरोबर संभोग करु शकतात. अंडी काही काळाच्या अंतराने, सभोवताली चिकट द्रवासारखे आवरण असणार्‍या प्रत्येकी ५-४० च्या पुंजक्याने घातली जातात. प्रजाती आणि हवामान परिस्थितीप्रमाणे, पिल्ले ६-८ दिवसांनी बाहेर येतात आणि ४-७ अठवड्यात वयात येतात. तापमान आणि खाद्य उपलब्धता हे सिमीत करणारे घटक आहेत. एक गोगलगाय तिच्या पूर्ण जीवनकाळात सुमारे १००० अंडी घालते जो एका वर्षापेक्षा जास्त असु शकतो.


प्रतिबंधक उपाय

  • या गोगलगायीच्या उपस्थितीसाठी शेताचे निरीक्षण करा.
  • मोसमात शेतीच्या चांगल्या सवयी वागवा.
  • सावधगिरी बाळगावी कारण ही गोगलगाय मानवासाठी वैद्यकीयदृष्ट्या महत्वपूर्ण उपद्रव असू शकते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा