पपई

केसाळ सुरवंट

Euproctis sp.

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • आंब्याच्या झाडामध्ये पानगळ ह्या लालसर तपकिरी, केसाळ अळ्या ज्यांच्या दोन्ही टोकांना एकेक केसाळ गुच्छ असतो ह्यांच्या मुळे होते.
  • कोवळ्या अळ्या पांढुरक्या केसांनी आच्छादलेल्या असतात.
  • पतंग चकचकित पिवळ्या रंगाचे असुन त्यावर गडद रेषा असतात आणि पुढच्या पंखांवर काळे ठिपके असतात.

मध्ये देखील मिळू शकते

13 पिके

पपई

लक्षणे

अळ्यांच्या सुरवातीच्या काळात शरीराच्या बगलेतुन लांब पांढुरके केस उगवलेले असतात. ते आंब्याच्या झाडांच्या पानांना आणि बऱ्याचशा इतर जातीच्या झाडांच्या पानांनाही गटाने खातात आणि अखेरीस पानगळ होते. प्रौढ अळ्यांचे डोके लाल असते आणि सभोवताली पांढरे केस आणि लालसर तपकिरी शरीर असते. त्यांना डोक्यावर आणि ढुंगणाकडच्या टोकाला एकेक केसाळ गुच्छ असतो. अळ्या पानांवर किंवा फांद्यांवर केसांच्या कोषात आपली कोषावस्था घालवतात. पतंग चकचकीत पिवळा असतो आणि पुढच्या पंखांवर पलीकडे जाणार्‍या गडद रेषा असतात आणि पंखांच्या कडेला काळे ठिपके असतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

अळ्या गटांनी खात असल्याने पेटत्या माशालींनी त्यांचा नायनाट केला जाऊ शकतो. नीम (अॅझॅडिराचटा इन्डिका एल.) आणि धतुरा (धतुरा स्ट्रॅमोनियम एल.) च्या अर्काची फवारणी सुरवंटांची संख्या कमी करते. बॅसिलस थुरिन्जिएनसिस हा जिवाणू असलेले कीटनाशक सुरवंटाची आतडी निकामी करुन त्यांना मारतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. सायपरमेथ्रिन, डेल्टामेथ्रिन, फ्ल्युवॅलिएंट आणि फेनव्हलरेट सारख्या कीटनाशकांचे फवारण्या ह्या केसाळ किड्यांविरुद्ध परिणामकारक असतात.

कशामुळे झाले

सुरवंटांच्या समान वैशिष्ट्ये असणार्‍या दोन प्रजातींमुळे पानांचे नुकसान होते आणि पानगळही होते. पानाच्या खालच्या बाजूला माद्या पिवळी, सपाट, गोल अंडी पुंजक्यांनी घालतात. अंड्याची घरटी दिसत नाहीत कारण ती पिवळ्या तपकिरी केसांनी आणि खवल्यांनी वेढलेली असतात. अळ्या ४-१० दिवसांनी उबुन बाहेर येतात. त्या जोपर्यंत कोषात जात नाहीत तोपर्यंत म्हणजे १३-२९ दिवस झाडाची पाने खात रहातात. ९-२५ दिवसांनंतर रेशमी कोषातुन प्रौढ पतंग बाहेर येतो. थंडीच्या दिवसात अळ्या सुप्तावस्थेत जाऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • बागेत अंडी, अळ्या, पतंग आणि कोषांसाठी नियमित निरीक्षण करीत रहा.
  • लागण कमी असताना सुरवंट, कोष आणि अंड्यांचे गुच्छ जमा करुन नष्ट करुन टाका.
  • प्रौढ पतंगांचे नियंत्रण प्रकाश सापळे लाऊन केले जाऊ शकते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा