भेंडी

लोह कमतरता

Iron Deficiency

कमतरता

5 mins to read

थोडक्यात

  • पाने कडांपासुन पिवळी पडतात.
  • शिरा मात्र हिरव्या राहतात.
  • संपूर्ण पान पांढरट पिवळे होते आणि कडांवर तपकिरी ठिपके आणि सुकलेले भाग दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

57 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
केळी
अधिक

भेंडी

लक्षणे

लोह कमतरता प्रथम नविन पानांवर दिसते. वरील पानांच्या दोन शिरामधील भाग पिवळा पडणे व शिरा मात्र हिरव्या राहणे ही लोह कमतरतेची वैशिष्ट्यपूर्ण लक्षणे आहेत. जर काही उपाय योजना केली गेली नाही तर नंतरच्या काळात संपूर्ण पान पांढरट पिवळे पडते आणि कडांवर तपकिरी ठिपके येऊन पानांचे भाग सुकलेले दिसतात. प्रभावित भाग दूरवरुनही सहजपणे ओळखला जाऊ शकतो. लोहकमतरता असलेल्या झाडांची वाढ खुंटते आणि संभवत: उत्पादनात घट होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

लहान शेतकरी नेटल स्लॅग आणि शेवाळच्या अर्कांनी बनविलेली खते वापरू शकतात. शेणखत, पीट आणि कंपोस्ट वापरल्यानेही जमिनीतील लोह वाढते. शेताच्या आजुबाजुला डँडेलियनची झाडे लावा, कारण हे झाड शेजारच्या पिकांना लोह उपलब्ध करुन देत असतात.

रासायनिक नियंत्रण

  • लोह ( उदा. फेरस सल्फेट एफइ१९%) असणारी खते वापरा.
  • आपली जमिन आणि पिकासाठी सर्वोत्तम उत्पादन आणि प्रमाण जाणून घेण्यासाठी आपल्या कृषी सल्लागाराचा सल्ला घ्या.
  • आपल्या पिकाचे इष्टतम उत्पादन मिळविण्यासाठी लागवडीचा हंगाम सुरु होण्यापूर्वी माती परीक्षण करण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

उष्णकटिबंधातील हलक्या जमिनी किंवा पाण्याचा निचरा चांगला न होणार्‍या जमिनी किंवा ज्या क्षेत्रात खूप थंडी असते किंवा जास्त पाऊस असतो अशा ठिकाणी लोह कमतरता ही गंभीर समस्या अहे. ज्वारी, मका, बटाटे, आणि बीन्स ही सगळ्यात जास्त बाधीत होणारी पीके आहेत तर गहु, अल्फाल्फा (जनावरांना चारा म्हणुन देण्यात येणारी वनस्पती) अतिशय कमी संवेदनशील आहेत. चुनखडीयुक्त, अल्क जमिनीत लोहाची कमतरता नक्कीच दिसुन येते. प्रकाश संश्र्लेषण क्रियेसाठी आणि डाळवर्गीय पिकामध्ये मुळावर गाठीच्या विकसासाठी तसेच व्यवस्थित रहाण्यासाठी लोहाचे कार्य महत्वाचे आहे. म्हणुनच लोह कमतरतेत मुळांच्या गाठींची वाढ व्यवस्थित होत नसल्याने पुरेसे नत्र जमा होत नाही व पर्यायाने उत्पादनात घट दिसून येते. लोहाच्या कमतरतेमुळे झाडात कॅल्शियम घेण्याचे व जमा करून ठेवण्याचे प्रमाणही वाढते.


प्रतिबंधक उपाय

  • लोह कमतरतेला कमी संवेदनशील जातींची निवड करा.
  • पिकाच्या आजुबाजुला डँडेलियन झाडे लावा.
  • लोह हे घटक असणारी खते वापरण्याची शिफारस करण्यात येत आहे.
  • जर शक्य असेल तर, संवेदनशील पीकांची चुनखडीयुक्त, अल्क जमिनीत लागवड करणे टाळा.
  • पाणी जास्त देणे टाळा व पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल ह्याची काळजी घ्या.
  • चुन्याचा वापर टाळा ह्याने जमिनीतील सामूची पातळी वाढेल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा