ढोबळी मिरची आणि मिरची

टोमॅटो फळावरील बुडकुज

Calcium Deficiency Rot

कमतरता

5 mins to read

थोडक्यात

  • हिरव्या फळाच्या बुडाशी तपकिरी किंवा राखाडी डाग उमटतात.
  • आतुन काली कुज दिसते.

मध्ये देखील मिळू शकते


ढोबळी मिरची आणि मिरची

लक्षणे

टोमॅटो फळावरील बुडकुजचे वैशिष्ट्य आहे कि फळांच्या बुडाला अनियमित धब्बे येतात. धब्ब्यांचे माप आणि रंग वेगवेगळे असु शकतात. सुरवातीच्या काळात ते फिकट हिरवे असतात. जस जसे फळ पिकु लागते हे डाग तपकिरी आणि काळे होतात. फळांच्या पेशीत सातत्य रहात नाही आणि काही भाग खोलगट होतात आणि बूड चपटी होतात. फळांच्या आतील काळी कुज देखील बाहेरुन काहीही लक्षण न दर्शविता विकसित होऊ शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असलेले पदार्थ जसे कि शेवाळ चुनखडी, बसाल्ट भुकटी, जळलेला चुना, डोलोमाइट, जिप्सम आणि स्लॅग लाइम जमिनीत घालावे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कॅल्शियम क्लोराईडची फवारणी ही आपातकालिन उपाय म्हणुन वापरा पण खूप वेळा किंवा जास्त प्रमाणात फवारणी करू नका.

कशामुळे झाले

फळांच्या पेशीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणार्‍या विकाराला फळावरील बुडकुज असे म्हणतात. या विकारात कोणतेही जंतु वा किडे गुंतलेले नाहीत. कॅल्शियममुळे पेशींना ताकद आणि दृढता मिळते. जमिनीतील कॅल्शियमची कमतरता असते किंवा झाड जमिनीतुन कॅल्शियम शोषुन फळांपर्यंत पोचविण्यास असमर्थ असल्याने कॅल्शियमची कमतरता होते. यामुळे पेशींच्या रचनेचा नाश होतो व विशिष्ट गडद, खोलगट भाग तयार होतात. अनियमित सिंचन किंवा मुळाचे नुकसान हे ही कॅल्शियम कमतरतेचे कारण असु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • जमिनीतील सामूच्या पातळीचे उदा.
  • चुनखडी घालुन समायोजन करा.
  • जमिनीला आर्द्र ठेवण्यासाठी पालापाचोळा पसरा.
  • खोल लागवड करताना मुळांना धक्का लागु देऊ नका.
  • खत योजनेत कमी नत्र आणि भरपूर कॅल्शियम असण्याची खात्री करा.
  • कोरड्या काळात नियमित पाणी द्या.
  • जास्त पाणी देणे टाळा आणि शेतातुन पाण्याचा चांगला निचरा होईल या कडे लक्ष द्या.
  • नत्र देताना अमोनियमपेक्षा नायट्रेटच्या रुपात द्या.

प्लँटिक्स डाऊनलोड करा