आंबा

निळे पट्टेदार नेटल अळी

Parasa lepida

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर चावल्याची छिद्रे दिसतात.
  • खाल्ल्याने पूर्ण पानेच नष्ट होतात.

मध्ये देखील मिळू शकते

4 पिके
केळी
कॉफी
आंबा
मॅनिओक

आंबा

लक्षणे

जेव्हा सुरवंट लहान असतात तेव्हा ते पानांचा खालचा थर खातात. पानांच्या टोकांवर जिथे सुरवातीस अंडी घातली जातात तिथुनच नुकसानास सुरवात होते. मग सुरवंट पानांच्या कडांपर्यत पोचुन तिथेही भरपूर खातात. मग जसे ते मोठे होतात तसे पूर्ण पानच टोकापासुन सुरु करुन पानांचा फक्त मधला भागच शिल्लक ठेवतात ज्यावरही चावल्याची चिन्हे स्पष्ट दिसतात. परिणामी झाडाच्या प्रकाश संश्र्लेषणात बाधा येते, ज्यामुळे पिकांचे उत्पादन कमी भरते. जर आक्रमण झालेल्या झाडांना फळे असतील तर ती पक्व होण्यापूर्वीच गळतात. सुरवंटांना गटागटांनी खाताना पाहिले जाऊ शकते. सुरवंटांची विष्ठाही दृष्य असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

रसायनांशिवाय प्रादुर्भावाचे नियंत्रण करायचे असल्यास, प्रादुर्भावित झाडांवरुन सुरवंटांना हाताने वेचणे हा एक पर्याय आहे. हे करताना, चिमटा किंवा चिकटपट्टीच्या तुकड्याचा वापर करावा आणि थेट स्पर्श टाळावा. प्रकाश सापळे लावुनही प्रौढ पतंगांना गोळा केले जाऊ शकते. प्रादुर्भावाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी हेक्टरी ५ प्रकाश सापळे लावावेत.

रासायनिक नियंत्रण

आपल्या ठराविक परिस्थितीसाठी योग्य कीटकनाशक निवडा, त्याच्या लेबलावरील सूचनांचे काळजीपूर्वक पालन करा आणि वापरताना, सुरक्षा कपडे, हातमोजे यांचा वापर करा. खूप जास्त प्रादुर्भाव झाल्यासच फवारणी करा. कार्बारिल, डायक्लोर्व्होस आणि एंडोसल्फान वापराने प्रादुर्भावाचे नियंत्रण केले गेल्याचे अहवाल आहेत.

कशामुळे झाले

निळ्या पट्टेदार नेटल अळीमुळे हानी होते. ह्या बहुधा उष्णकटिबंधीय प्रदेशात आढळतात आणि पूर्ण वर्षभर उपस्थित असतात. पतंग जीवनचक्राच्या अनेक टप्यातुन जातो. सुरवात अंड्यांपासुन होते जी झाडाच्या पानांवर घातली जातात. ऊबल्यानंतर, छोटे सुरवंट पाने खायला सुरवात करतात. वाढीच्या काळात ते पुष्कळदा कात टाकतात. अखेरीस स्वत:भोवती कोष निर्माण करुन कोषात जातात. काही काळानंतर त्या कोषातुन प्रौढ पतंग बाहेर येतात आणि चक्र पुन्हा सुरु करतात. ह्या किडीच्या अळ्यांचे शरीर हिरव्या रंगाचे असुन तीन फिकट निळे पट्टे असतात आणि ३-४ सें.मी. लांबीच्या असतात. कोष हे एखाद्या पुठ्ठ्याचे आवरण असलेल्या मोठ्या बियांना रेशमाच्या कपड्यात गुंडाळल्यासारखे दिसतात. माद्या आणि नर पतंगांवरील रंगाची रचना सारखीच असते. त्यांची डोकी पिवळसर हिरवी असुन शरीर लालसर तपकिरी असते तर पाय गडद तपकिरी असुन पंखांच्या बाहेरच्या किनारीही तपकिरी असतात.


प्रतिबंधक उपाय

  • प्रादुर्भाव सुरवातीला एकाच भागात सीमित असतो.
  • सुरवंटांना हाताने गोळा करुन नष्ट करावे.
  • त्याच भागात कोषही शोधुन नष्ट करावेत.
  • खोडावर, पानांवर आणि जमिनीवर शोधा.
  • कोष शक्यतो शेजार शेजारीच असतात.
  • फक्त खात्रीशीर दुकानदारांकडुनच स्वच्छ व प्रमाणित लागवड सामग्री खरेदी करा.
  • निळ्या पट्टेदार नेटल अळीच्या अंडी वा पिल्लांनी प्रादुर्भावित झाडाच्या भागांना नविन जागी नेल्यानेही प्रादुर्भावाचा प्रसार होतो.

प्लँटिक्स डाऊनलोड करा