तूर

फेसाळ किडा

Cercopidae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फांद्यांवर पांढरे फेसाळ द्रव्य दिसते.

मध्ये देखील मिळू शकते


तूर

लक्षणे

वसंत ऋतु आणि उन्हाळ्याच्या सुरवातीस झाडांच्या कोवळ्या फांद्या आणि पानांवर फेसाळ द्रव्यांचे पुंजके विकसित होतात. प्रत्येक पांढर्‍या पुंजक्यात छोटे ४-६ मि.मी.चे अजुनही पूर्ण विकसित न झालेले फिकट पांढरे किडे असतात. बहुधा झाडाची वाढ बाधीत होते, पण जर किडे कोवळ्या कोंबांची टोक खात असतील तर मात्र वाढीची समस्या उद्भवु शकते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या छोट्या उपद्रवासाठी जैविक नियंत्रण उपलब्ध नाही. आवश्यकता भासल्यास, त्यांना हाताने काढुन टाका.

रासायनिक नियंत्रण

फ्रॉगहॉप्पर आणि फेसाळ किड्यांचे नियंत्रण करण्यासाठी कीटनाशकांची आवश्यकता नाही. कीटनाशके फेसाळ किड्यांविरुद्ध प्रभावी नाहीत कारण अळ्या ह्या फेसाळ द्रव्यात सुरक्षित असतात आणि फवारणीचा त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही.

कशामुळे झाले

फेसाळ किड्यांनी रस शोषण केल्याने नुकसान उद्भवते. ते बहुधा जास्त हानी करत नाहीत पण जर ते संख्येने जास्त वाढत असतील तर मात्र समस्या होऊ शकते. भक्षकांपासुन सुरक्षित रहाण्यासाठी ते फेसाळ द्रव्य तयार करतात. फेसाळ किड्यांच्या जीवन चक्राचे तीन भाग आहेत: अंडी, अळ्या, प्रौढ. प्रत्येक भाग सुमारे ६ महिन्यांचा असु शकतो. जेव्हा अंडी ऊबतात तेव्हा कोवळ्या अळ्या झाडांवर ताव मारतात. नंतरच्या टप्प्यावर ते स्वत:स सुरक्षित ठेवण्यासाठी फेस तयार करतात आणि त्यात प्रौढ होईपर्यंत वाढत रहातात. विकसित होण्यासाठी अळ्या झाडाच्या विविध भागांवर खाण्यासाठी १-३ महिने फिरत रहातात. प्रौढ फेसाळ किडे झाड्यांच्या पाला-पाचोळ्यात आणि फांद्यांवर अंडी घालतात. फेसाळ किड्यांची प्रत्येक मादी सुमारे १००-२०० अंडी घालते. ही अंडी झाडांवरच सुप्तावस्थेत रहातात. अळ्या बहुधा हिरव्या रंगाच्या असतात. प्रौढ होण्यापूर्वी त्यांच्या शरीराचा रंग गडद होत जातो तसेच पंखही विकसित होतात. फेसाळ किड्यांना शेंगवर्गीय तसेच नत्र समायोजन करणार्‍या झाडांवर ताव मारायला आवडतो.


प्रतिबंधक उपाय

  • फेसाळ किड्यांपासुन मुक्तता मिळविण्यासाठी फेस धुवून काढण्यासाठी पाण्याची जोरदार फवारणी करा आणि झाडे हलवुन किडींना झाडावरुन खाली पाडा.
  • सुप्तावस्थेतील अंडी कमी करण्यासाठी वाढीचा मोसम संपल्यानंतर शेताची सफाई करा.
  • वसंत ऋतुत, तणांवर फेसाळ किडे दिसतातय का ते पहा आणि ते पिकांवर पसरण्यापूर्वीच त्यांची विलेवाट लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा