तूर

केसाळ पतंग

Lymantriinae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर खाल्ल्याचे नुकसान दिसते.
  • मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास पानगळ होते.
  • ह्या किड्यांच्या सुरवंटांमुळे नुकसान उद्भवते.

मध्ये देखील मिळू शकते


तूर

लक्षणे

सुरवंट पाने कुरतडतात, ज्यामुळे झाडेच छाटल्यासारखी दिसतात. ही कीड अनेक प्रजातीच्या पिकांना आणि झाडांना खाते. अळ्यांची संख्या खूप जास्त झाल्याने पानगळ होते. अळ्या फळांचेही छोटे चावे घेतात ज्यामुळे फळांचा रंग बदलतो आणि पृष्ठभागावरील साल खरबरीत होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बॅसिलस थुरिंजिएनसिसचा वापर करुन केसाळ पतंग किडींपासुन, खासकरुन जेव्हा त्या कोवळ्या असतात, मुक्तता मिळविली जाऊ शकते. बॅसिलस थुरिंजिएनसिस फक्त सुरवंटांनाच मारते जे फवारलेल्या झाडीस खातात आणि ७ ते १० दिवसांच्या अंतराने दुसर्‍या फवारणीची शिफारस केली जाते कारण वापरानंतर ह्याचा प्रभाव तितकाच असतो. स्पिनोसॅडही प्रभावी आहे पण ह्यांमुळे मधमाशा तसेच नैसर्गिक भक्षकांना हानी होऊ शकते. मधमाशा मेल्यानंतरही अनेक तासांपर्यंत त्यांच्यात हे विष भिनलेले रहाते. स्पिनोसॅडचा वापर फुलधारणा होत असलेल्या झाडांवर कधीही करु नये.

रासायनिक नियंत्रण

केसाळ पतंगांच्या संसर्गास सामान्यपणे नैसर्गिक शत्रुंद्वारेच नियंत्रित केले जाते, म्हणुन झाडे कोवळी असली आणि वाढीत समस्या दिसुन आल्याशिवाय कीटनाशकांचा वापर बहुधा आवश्यक भासत नाही. जर भारीच पानगळ झाली तरच रसायनिक नियंत्रण हा एकच उपाय असु शकतो. आपल्या भागात कोणत्या कीटनाशकांच्या वापराची परवानगी आहे हे माहिती करुन घेणे महत्वाचे आहे. केसाळ पतंगांच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणार्‍या उत्पादनांच्या माहितीत क्लोरँट्रानिलिप्रोल, मेथॉक्झिफेनोझाइड आणि फॉस्मेट सारखे सक्रिय घटकांच्या असण्याबद्दल लिहिलेले असते. लक्षात घ्या कि इतर वसंत ऋतुतील सुरवंटाच्या नियंत्रणासाठी वापरण्यात आलेले फवारे हे केसाळ पतंगांच्या नियंत्रणासाठीही वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

केसाळ पतंग, हे प्रामुख्याने ऑर्गिया, डॅसिचिरा आणि युप्रोक्टिस प्रजातीचे असतात, ज्यांमुळे जगभरातील झाडांचे नुकसान होते. प्रौढ पतंगांच्या शरीरभर केस असतात आणि ते तपकिरी, राखाडी वा पांढर्‍या रंगाचे असतात. केसाळ पतंगांच्या जीवनाचे अनेक टप्पे आहेत. पतंग शरद ऋतुत अंडी घातात आणि नंतरच्या वसंत ऋतुपर्यंत ही अंडी सूप्तावस्थेत असतात. जेव्हा हवामान ऊबदार होते तेव्हा अंडी ऊबुन कोवळे सुरवंट बाहेर येतात. हे सुरवंट पिकांची, झाडा-झुडपांची पाने खातात, खाता-खाता वाढत रहात आणि कात टाकत रहातात. जसे ते वाढतात तसे त्यांच्या शरीरावर वैशिष्ट्यपूरण केसांचे पुंजके येतात ज्यामुळे त्यांना केसाळ पतंग असे नाव पडले आहे. काही अठवडे खाल्ल्यानंतर, सुरवंट कोष निर्माण करतात. कोषात जाऊन सुरवंट पतंग बनतात. प्रौढ पतंग कोषातुन बाहेर येऊन संभोग करतात आणि माद्या अंडी घालतात ज्याद्वारे नविन पिढीचे नविन चक्र सुरु होते. माद्या पंखहीन असल्याने पतंगांची लोकसंख्या ही एकाच ठिकाणी वाढत रहाते.


प्रतिबंधक उपाय

  • केसाळ पतंगाना हाताळताना थोडी सावधगिरी बाळगावी कारण त्यांच्या सुरवंटाचे केस मानवी कातडीस खाज देतात आणि स्पर्श झाल्यास लगेच वेगळे होतात.
  • ह्यांना हाताळताना सुरक्षित कपडे घालावे तसेच सुरवंटाचा कोणताही भाग श्र्वासाद्वारे आत घेतला जाऊ नये.
  • अंड्यांचे पुंजके आणि कोवळ्या सुरवंटांना शोधुन काढुन टाका.
  • किडीसाठी निरीक्षण करीत रहाणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा