कारले

पसरट पायाचे किडे

Coreidae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पिकाची वाढ खुंटते.
  • किडींनी खाल्लेल्या ठिकाणी फळे रंगहीन होतात.
  • फळांवर खोलगट भाग दिसतात.
  • पाने आणि फांद्यांना हानी होते.
  • पाने पिवळी किंवा तपकिरी पडतात.

मध्ये देखील मिळू शकते


कारले

लक्षणे

पसरट पायाच्या किड्यांमुळे पिकात अनेक प्रकारची लक्षणे दिसतात जी किड्यांची प्रजाती, विकासाचा टप्पा आणि प्रभावित झाडाचा प्रकार ह्यावर अवलंबुन असतात. या किड्यांमुळे पिकास होणार्‍या हानीची काही सामान्य लक्षणे इथे दिली आहेत. झाडाची खासकरुन कोवळ्या विकसित होत असणार्‍या झाडांची वाढ हळु होते. ह्यामुळे उत्पादन कमी भरते किंवा उत्पादन मिळण्यास उशीर होतो. ह्या किड्यांमुळे फळांत रंगहीनता तसेच आकार विकृती होते. प्रभावित फळे रंगहीन, विकृत आकाराची किंवा पृष्ठभागावर खोलगट भाग असणारी होतात. ह्या दृष्य दोषांमुळे बाजार मूल्य कमी भरते. या किड्यांमुळे झाडाच्या पाने आणि फांद्यांनाही हानी पोचते ज्यामुळे पाने पिवळी ते तपकिरी होतात, मरगळतात आणि झाडाची मरही होते. ह्या व्यतिरिक्त पसरट पायाच्या काही प्रजाती झाडांच्या रोगजंतुंचे वहनही करतात, ज्यामुळे पिकाची अधिकच हानी होऊन उत्पादन कमी भरते.

Recommendations

जैविक नियंत्रण

कीटनाशक साबण व जैविक उत्पादन जसे कि नीम तेल किंवा पायरेथ्रिनच्या वापराने फक्त छोट्या अळ्यांचे काही प्रमाणात नियंत्रण केले जाते. पसरट पायाच्या किड्यांचे नियंत्रण करण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे त्यांची अंडी काढुन टाकणे होय.

रासायनिक नियंत्रण

पसरट पायाच्या किड्यांच्या रसायनिक नियंत्रणात किडींना मारणे वा पळवुन लावण्यासाठी कीटनाशकांचा वापर केला जातो. पसरट पायाच्या किड्यांसाठी पायरेथ्रॉइडस, नियोनिकोतिनॉइडस आणि स्पिनोसॅडसह अनेक कीटनाशके आहेत. ह्या कीटनाशकांचा वापर फवारणी, धुरळणी किंवा आमिष सापळे म्हणुनही केला जाऊ शकतो पण महत्वाचे म्हणजे कीटनाशकांचा वापर करताना त्यांच्या लेबलांवरील सूचना काळजीपूर्वक वाचुन पालन करावे. फवारणीच्या वेळी सुरक्षा कपडे आणि अवजारे वापरावित तसेच हवामान वादळी वा पावसाळी असल्यास फवारणी करु नये. तसेच उत्पादन किती वेळा आणि केव्हा वापरावे ह्याच्या सूचनांचेही पालन करावे. जरी रसायनिक नियंत्रण पसरट पायाच्या किड्यांची लोकसंख्या कमी करण्यात प्रभावी असले तरी, लक्ष्य नसलेल्या किडी, वन्यजीव आणि मानवांवरही ह्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. म्हणुन कीटनाशकांचा वापर विवेकाने आणि मशागत तसेच जैविक नियंत्रणासह एकात्मिक किट व्यवस्थापनाच्या दृष्टीकोनातुनच करणे महत्वाचे आहे.

कशामुळे झाले

पसरट पायाच्या किड्यांचे मागचे पाय चपटे आणि पानाच्या आकाराचे असतात. हे मध्यम आकाराचे किडे सुमारे २० मि.मी. लांबीचे असतात. हे बहुधा तपकिरी किंवा हिरव्या रंगाचे असतात आणि झाड, फळे, भाज्या तसेच सुक्या मेव्याचा रस शोषण करतात. पसरट पायाच्या किड्यांचे जीवनचक्र मादीने झाडांवर अंडी घातल्याने सुरु होते. अंडी सुमारे १.४ मि.मी. लांबीची, अंडाकृती आकाराची, तांबट ते गडद तपकिरी रंगाची असुन ओळीने घातली जातात. अंडी ऊबुन छोट्या अळ्या बाहेर येतात ज्या प्रौढ किड्यांची छोटी प्रतिकृती असतात. अळ्या प्रौढ होण्यापूर्वी विविध संक्रमणातुन जातात, कात टाकुन नविन होऊन वाढतात. जशा त्या मोठ्या होत जातात तशा त्या अधिकाधिक प्रौढांसारख्या दिसतात आणि पंखही येतात. एकदा का पसरट पायाचे किडे प्रौढ झाले कि मग संभोग करतात आणि अंडी घालतात जिथुन परत नविन चक्र सुरु होते. हवामान आणि खाद्य उपलब्धता ह्याप्रमाणे एका वर्षात पसरट पायाच्या अनेक पिढ्या जन्म घेतात. जेव्हा भरपूर पाऊस पडतो तेव्हा ह्यांचा उपद्रवही भारीच होतो. जेव्हा हिवाळा थोडासा ऊबदार असतो तेव्हा बहुतेक प्रौढ किडे तग धरतात आणि अधिक उपद्रव करतात. काही प्रकारचे पसरट पायाचे किडे फक्त तणातच प्रजनोत्पादन करतात आणि फळधारणेच्या काळात हेच किडे सर्वाधिक उपद्रव करतात.


प्रतिबंधक उपाय

  • पसरट पायाचे किडे सक्रिय असण्याची लक्षणे जसे कि अंड्यांचे पुंजके, रंगहीन फळे, फळांवर खोलगट भाग तसेच पाने आणि फांद्यांना हानी यासारख्या चिन्हांसाठी झाडांची नियमित तपासणी करत चला.
  • ओळींवरील आच्छादने किंवा जाळी पसरणे यासारखे अडथळे टाकून पसरट पायाच्या किड्यांना आपल्या झाडांपासुन दूर ठेवा.
  • शेतातील तण काढुन टाका कारण पसरट पायाचे किडे तणांत राहून तण खातात.
  • शेतातुन गळलेला पालापाचोळा, फळे काढुन टाका कारण ह्यावर पसरट पायाचे किडे आकर्षित होतात.
  • नैसर्गिक भक्षकांना (पक्षी, कोळी आणि भक्षक किड्यांना) निवारा आणि पाणी मिळेल असे करुन आकर्षित करा किंवा शेतात सोडा ज्यामुळे पसरट पायाच्या किडींचे नियंत्रण करण्यात मदत होईल.
  • मोसमाच्या अखेरीस शेतात चांगली स्वच्छता बाळगा जेणेकरुन किडे पुढच्या मोसमापर्यंत रहाण्याची शक्यता कमी होईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा