आंबा

आंब्यावरील पांढरा खवला

Aulacaspis tubercularis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • वाळणे, पानगळ, काटक्या वाळणे, कमी फुलधारणा, फ़ळे खुजी आणि विकृत होणे.
  • अकाली फळ गळ.

मध्ये देखील मिळू शकते


आंबा

लक्षणे

पान, फांद्या आणि फळातील रस शोषक किडींमुळे झाडास जखमा होतात. भारी संक्रमण झाल्यास आंब्याच्या झाडाचा कोरडेपणा, पानगळ, काटक्या वाळणे आणि कमी फुलधारणा ज्यामुळे कमी वाढ आणि विकास होतो. पिकलेल्या फळाच्या सालीवर गुलाबी डाग दिसतात ज्यामुळे ती आकर्षक दिसत नाहीत, त्यामुळे बाजारमूल्य कमी होते खास करुन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत. किडींच्या दाटीमुळे फळ उत्पादनावर नक्कीच प्रभाव पडतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

आंब्यावरील पांढर्‍या खवल्यांचे नैसर्गिक भक्षक खूप आहेत. आंब्यावरील पांढर्‍या खवल्यांच्या नैसर्गिक भक्षकांना आकर्षित करुन अन्नद्रव्य देण्याची तजविज शेतकरी करु शकतात ज्यामुळे पांढर्‍या खवल्यांच्या नैसर्गिक भक्षकांची संख्या शेतात वाढेल. अधिक प्रकारे नैसर्गिक भक्षक सोडणेही शक्य आहे.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आपल्या भागातील नियमांप्रमाणे कीटनाशके वापरा आणि वापरल्या जाणार्‍या सक्रिय घटकांना बदलत रहा, म्हणजे किडीत प्रतिकार निर्माण होणार नाही. लक्षात असु द्यात कि पांढर्‍या खवल्यांसाठी कीटनाशक फवारणी अव्यवहार्य ठरु शकते कारण बहुतेक वाणे २० मी. उंच असतात आणि साध्या फवारणी उपकरणांद्वारे इतक्या उंच पोचता येत नाही.

कशामुळे झाले

आंब्यावरील पांढर्‍या खवल्यांमुळे नुकसान उद्भवते जे अचल, कवचधारी, सूक्ष्म, कवचयुक्त किडे हेमिप्टेरा कुटुंबातील डायास्पिडिडे प्रकारात मोडतात. हे किडे आंब्याच्या झाडावर, रोपांपासुन ते मोठ्या जुन्या झाडापर्यंत वाढीच्या सर्व टप्प्यांवर हल्ला करतात. खाताना हे किडे रस शोषण करतात आणि विषारी पदार्थ झाडात सोडतात. पावसाळ्यापेक्षाही उष्ण आणि कोरड्या हवेत खासकरुन रोपांवर आणि आंब्याच्या झाडांवर ह्याचा जास्त प्रभाव पडतो.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या शेतासाठी उचित आणि वांछित वाण निवडा.
  • आशिया आणि आफ्रिकेतील संशोधनाप्रमाणे अल्फांसो, केंट, टॉमी अॅटकिन्स आणि डॉड वाणांपेक्षाही अतुलाफो, अॅपल, हेडन आणि किट ही आंब्याची वाणे पांढर्‍या खवल्यास जास्त सहनशील आहेत.
  • पांढर्‍या खवल्यांचे दर पंधरवड्यास निरीक्षण करा आणि संक्रमित काटक्या छाटा.
  • दोन झाडात पुरेसे अंतर राखण्याची खात्री करा म्हणजे झाड वाढ घटकांसाठी स्पर्धा करणार नाहीत.
  • काढणीपूर्व फळांवर पिशवी लावणे ही भौतिक संरक्षण पद्धत आहे.

प्लँटिक्स डाऊनलोड करा