द्राक्षे

द्राक्षवरील काळे फुलकिडे

Retithrips syriacus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने आणि फळांवर रुपेरी धब्बे दिसतात.
  • पानांवर (किडींच्या विष्ठेचे) राखाडी चमकदार काळे ठिपके दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

फुलकिडे यजमान पानांतुन रस शोषण करतात, ज्यामुळे पानगळ आणि आक्रसणे होते. पानांत सोंड खुपसल्याने पानांवर रुपेरी धब्बे येतात. खाल्लेल्या जागी, फळे राखाडी होतात. जेव्हा गंभीर प्रादुर्भाव होतो तेव्हा फळे विद्रूप होतात आणि चांगली विकसित होत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

जियोकोरिस ऑक्रोप्टेरस आणि मेटासियुलस (भक्षक) सारख्या नैसर्गिक भक्षकांना बागेत सोडा. भक्षक फुलकिडे, हिरवे लेसविंग्ज, मायन्यूट पायरेट बग्ज आणि अनेक फितोसीड माइटसमुळे झाडांवरील रस शोषक फुलकिड्यांच्या नियंत्रणात मदत मिळेल.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कीटकनाशकांद्वारे फुलकिड्यांचे नियंत्रण करणे कठिण जाते कारण एकतर ते फिरते असतात, त्यांची खाण्याची पद्धत आणि संरक्षित अंडी तसेच अळी ते प्रौढावस्थेचा प्रवास (अळी पासुन प्रौढ होण्याच्या अवस्थेतील सर्व बदल.). जगातील एकाधिक भागात खालील कीटकनाशके वापरली जातात: डायमेटोएट आणि बायफेंथ्रिन. स्पिनोसॅड वर आधारीत उत्पादांचाही जैव नियंत्रण पद्धत म्हणुन विचार केला जातो. उपद्रव व्यवस्थापनावरील स्थानिक नियमांचे नेहमीच पालन करा.

कशामुळे झाले

झाडांचे रस शोषण करणार्‍या फुलकिड्यांच्या प्रौढ आणि पिल्लांमुळे नुकसान होते. फुलकिडे अंडी ऊबुन बाहेर येतात आणि दोन सक्रियतेने खादाड अळी टप्प्यांतुन विकसित होतात. प्रौढ मादी सुमारे १.४ ते १.५ मि.मी. लांबीची असते तर नर १.३ मि.मी. लांबीचा असतो. हे गडद ते काळसर तपकिरी प्रजातीतील आहेत. अंडी ऊबुन बाहेर आलेल्या अळ्या लगेचच बहुधा गटा-गटाने खायला सुरवात करतात. नविनच तयार झालेले प्रौढ फिकट आणि लालसर असतात. फुलकिडे हे पानांच्या खालील बाजुस खातात पण जेव्हा प्रादुर्भाव गंभीर असतो तेव्हा, विशेष करुन थंड महिन्यात, वरील बाजुसही खाल्ले जाते. उबदार हवामानात, अंडे ते प्रौढावस्थेपर्यंतचे जीवनचक्र हे अगदी थोड्या कालावधीत म्हणजेच २ अठवड्यात पूरे होते.


प्रतिबंधक उपाय

  • संवेदनशील झाडे लावू नका.
  • फुलकिड्यांचे नियमितपणे आणि नियमित कालांतराने निरीक्षण करत चला तसेच ह्या उपद्रवी फुलकिड्यांचे पर्यायी यजमान तण जवळपास राहू देऊ नका.
  • त्या जागेतील परिस्थितीस चांगली अनुकूलन झालेली झाडेच लावा.
  • उचित पारंपारिक सांभाळ करुन झाडे चांगली जोमदार राखा तसेच त्यांची ह्या फुलकिड्यांच्या नुकसानीसाठीची सहनशीलताही वाढवा.
  • झाडांना सिंचन भरपूर द्या आणि नत्रयुक्त खतांचा अतिरेकी वापर टाळा ज्यामुळे फुलकिड्यांची लोकसंख्या वाढण्यास मदत मिळते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा