मॅनिओक

कसावावरील मिज माशी

Jatrophobia brasiliensis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांवर गाठी येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके
मॅनिओक

मॅनिओक

लक्षणे

अळ्यांच्या खाण्याने झाडांवर गाठी येतात. पानांच्या वरच्या बाजुला बहुधा गाठी येतात, जिथे माशा त्यांची अंडी घालतात आणि कळ्यांवर तसेच फांद्यांवर त्यामानाने कमी असतात. गाठी पिवळसर हिरव्या ते लाल रंगाच्या असुन आकाराने शंकूसारख्या असतात. जेव्हा गाठी फुटतात तेव्हा कोणाकृती बोगदे तयार होतात ज्याच्या आत अळ्या असुही शकतात किंवा नसुही शकतात. जर गाठींना पानांखालुन पाहिले तर एक छोटे छिद्र दिसते ज्यातुन प्रोढ माशा बाहेर पडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

निरीक्षणासाठी आणि संभोगात व्यत्यय आणण्यासाठी रंगीत सापळे वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा.

कशामुळे झाले

जट्रोफोबिया ब्रासिलिएनसिस प्रजातीमुळे नुकसान उद्भवते. माशा ह्या फार सूक्ष्म उडणारे किडे असतात ज्या पानांच्या पृष्ठभागावर अंडी घालतात. जेव्हा अंडी ऊबतात तेव्हा बाहेर येणार्‍या अळ्यांमुळे अनैसर्गिक पेशींची वाढ होते, ज्यामुळे पानाच्या वरील पृष्ठभागावर गाठी येतात.


प्रतिबंधक उपाय

  • शक्य असेल तिथे कोरड्या हवामानात लागवड करा.
  • खुल्या जागेत शेती करा आणि पुरेशी हवा खेळेल अशा तर्‍हेने झाडांतील अंतर राखा.
  • झाडाखाली आणि आजुबाजुला तण नियंत्रण करा.
  • शेतात गळलेली पाने काढुन जाळा किंवा पुरा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा