कापूस

वांग्यावरील फुलकिडा

Oxycetonia versicolor

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फुले आणि कळ्यांचे नुकसान होते.
  • जास्त प्रादुर्भाव झालेली झाडे, खाण्याच्या नुकसानामुळे जर्जर दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते


कापूस

लक्षणे

झाडाच्या पुनरुत्पादक अंगास किडे नुकसान करीत असल्याने उत्पादनात खूप मोठी घट होते. प्रौढ किडे फुले आणि कळ्या खातात. ते फुलाच्या आतील परागकण, केसराग्र आणि इतर पुनरुत्पादक भाग खातात. कपाशीत ते कोवळ्या बोंडांवरही हल्ला करतात. वांग्याच्या झाडाचे तसेच त्यांच्या इतर यजमान झाडांचे कोवळे कोंबचा नुकसान करतानाही त्यांना पाहिले गेले आहे, खासकरुन अपक्व अवस्थेतील.

Recommendations

जैविक नियंत्रण

आतापर्यंत तरी कोणतेही जैविक उपचार माहितीत नाहीत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा आतापर्यंत तरी कोणतेही रसायनीक उपचार माहितीत नाहीत.

कशामुळे झाले

या किडीच्या प्रौढांमुळे नुकसान होते. फुलकिडे हे दिवसा उडणारे किडे आहेत आणि प्रामुख्याने परागकण खातात. भुंगे जमिनीतील सेंद्रीय पदार्थांत विकसित होतात आणि काही मुळांनाही प्रभावित करतात पण पिकास जास्त नुकसान करीत नाहीत. प्रौढ लांबीने ७-१५ मि.मी. तर रुंदीने ५-७ मि.मी. असतात. नर आणि मादी दोन्ही सारखेच असतात. शरीर लंबगोलाकार आणि घट्ट असते, बहुधा काहीसे चपटेही असते, रंग आकर्षक असतात बहुधा विटकरी लाल असुन काळी आणि पांढरी चिन्हे असतात.


प्रतिबंधक उपाय

  • किडा पिका-पिकांत स्थलांतर करतात आणि त्यांच्या यजमान खूप आहेत.
  • पीक पध्दती बदलणे आणि कीटकनाशकांचा सातत्याने वापर केल्याने हा उपद्रव छोट्या समस्येतुन मोठ्या समस्येत बदलतो.
  • फुलकिड्यासाठी काळजीपूर्वक निरीक्षण आणि वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील ह्याचा उद्रेक टाळण्यासाठी आवश्यक उपाय केले जाऊ शकतात.
  • वांग्यातील शेंड अळीच्या व्यवस्थापनासाठी केलेल्या कीटकनाशकांच्या ठराविक कालावधीनंतरच्या वापराने या किडीची लोकसंख्या नियंत्रणात रहाते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा