तूर

गोचिड

Membracidae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फांद्यांवर कोमेजलेल्या खपल्या दिसतात.
  • झाडे मरगळतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

तूर

लक्षणे

किडींने रस शोषण केल्याने फांद्यांवर कोमेजलेल्या खपल्या दिसतात. फांद्यांवर खाल्ल्याच्या खुणा दिसतात. प्रभावित भाग वाळतो आणि गंभीर संक्रमण झाल्यास पानगळ होते. झाड मरगळल्यासारखे दिसते आणि जोम कमी असतो. पेशीतुन रस शोषण केल्याने आणि किड्यांच्या लाळेतुन विषारी पदार्थ झाडात स्त्रवल्याने पानेही विकृत आकाराची होतात. ह्याशिवाय, गोचिडांनी सोडलेल्या मधाळ रसाने काळी बुरशी, कॅप्नोडियम प्रजाती वगैरे आकर्षित होतात आणि पानांची प्रत अधिकच खराब होते. हे किडे बहुधा हिरव्या फांद्यांतुन रस शोषण करतात. गंभीर प्रादुर्भावाने कोमेजलेल्या खपल्या, मरगळ दिसते आणि झाडांचा जोम कमी होतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

गोचिडांच्या अंड्यांना परजीवी मारु शकतात. आजतागायत या किडींविरुद्ध कोणतीही जैविक नियंत्रण पद्धत माहितीत नाही. जर आपणांस याच्या घटना किंवा लक्षणांची गंभीरता कमी करणारी कोणतीही यशस्वी पद्धत माहिती असेल तर कृपया आमच्याशी संपर्क साधावा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या उपद्रवाच्या लोकसंखेचे नियंत्रण करण्यासाठी डायमेथोएट २ मि.ली./ली. पाण्याचा वापर केला जातो.

कशामुळे झाले

ओटिनोटस ओनेराटस आणि ऑक्झिराचिस टॅरांडुस सह मेंमब्रिकसिडे कुटुंबातील अळ्या आणि प्रौढांमुळे नुकसान होते. या किडींना झाडांवरील तुडतुडे किंवा काटेरी किडे म्हणुनही ओळखले जाते. राखाडी तपकिरी, पंख असलेले किडे सुमारे ७ मि.मी. लांबीचे असतात ज्यांच्या छातीकडील भाग काट्यांसारखे पुढे आलेले असतात. माद्या फांद्यांवर किंवा डहाळ्यावर अनियमित संखेच्या पुंजक्याने अंडी घालतात. हे पर्यावरणीयदृष्ट्या मुंग्यांसह सुखाने नांदतात. अळ्या मधाळ रस सोडतात ज्यांना मुंग्या खातात आणि किड्यांना इतर नैसर्गिक भक्षकांपासुन वाचवितात. उपद्रवाच्या लोकसंख्येला थंड हवा आणि आर्द्रतेतील वाढ मानवते.


प्रतिबंधक उपाय

  • प्रदूर्भावाच्या लक्षणांसाठी शेताचे निरीक्षण करत चला.

प्लँटिक्स डाऊनलोड करा