ऊस

ऊसावरील खपल्या

Melanaspis glomerata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने आणि उसाचे दांडके वाळतात.
  • वाढ खुंटते.
  • खोड आणि पानांच्या मध्य शिरांवर गोलाकार गडद रंगाच्या खपल्या येतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

ऊस

लक्षणे

खोड आणि मध्य शिरांवर गोलाकार, तपकिरी ते राखाडीसर काळे खवले दिसतात. ऊसाची संक्रमित पाने टोकाशी वाळतात आणि रंग फिकट हिरवा आणि रोगीट होतो. प्रादुर्भाव चालूच राहील्यास पाने नंतर पिवळी पडतात. रसाचे नुकसान झाल्याने पाने उघडत नाहीत आणि अखेरीस पिवळी पडुन वाळतात. शेवटी ऊस वाळते आणि जर उभा चिरला तर तपकिरीसर लाल दिसतो. संक्रमित ऊस आक्रसलेला असतो आणि पूर्ण ऊसावरच उपद्रव पसरतो आणि गंभीर संक्रमणांत खोडावर त्याच्या खपल्या दिसतात. एकाच जागी रहाणयाच्या सवयीमुळे आणि सूक्ष्म आकारामुळे किडे झटकन नजरेस पडत नाहीत. गंभीर नुकसान झाल्यानंतरच यांचे अस्तित्व जाणवते.

Recommendations

जैविक नियंत्रण

बेण्यांना १% मासळी तेल रोसिन साबण इमल्शनमध्ये बुडवा. पांढरे तेल (झाडीत आणि खोडांवर) फवारा, ह्यामुळे लहान खवल्यांवर काही प्रमाणात परिणाम होतो. चिलोकोरस निग्रिटस किंवा फारास्किम्नस हॉर्नी एग कार्ड ५ सीसी प्रति एसी याप्रमाणे सोडा. अॅनाब्रोटेपिस मायुराइ, चेइलोन्युरस प्रजातींसारखे हयमेनोप्टेरन परजीवी आणि सॅनियोसुलस नुडस आणि टारोफॅगस प्युट्रेसेंन्शिए सारखे भक्षक कोळीना सोडा जे खवल्यांच्या किड्यांना खातात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. बेण्यांना ०.१% मॅलेथियॉन द्रावणात पेरणीपूर्वी भिजवा. डायमिथोएट २ मि.ली. प्रति ली. किंवा मोनोक्रोटोफॉस १.६ मि.ली. प्रति ली. ची फवारणी पाचट काढल्यानंतर करा. उपद्रवाची सुरवात होण्यापूर्वी थोड आधी बेण्यांना अॅसेफेट ७५ एसपी १ ग्रॅम प्रति ली. चे उपचार पाचट काढल्यानंतर दोनदा करा.

कशामुळे झाले

रांगाणार्‍या खवल्यांमुळे नुकसान उद्भवते. माद्या ओव्होव्हिव्हिपेरस असतात म्हणजे शरीरातच अंडी ऊबवुन पिल्लांना जन्म देतात. ऊबल्यानंतर रांगणारे (छोटे अपक्व खवले) खाण्याची जागा शोधत फिरतात. ते त्यांचा सोंड झाडत टोचुन रस शोषण करतात आणि मग जागचे हलत नाहीत. पेऱ्यासारख्या रचनेतुन संक्रमण सुरु होते आणि ऊसासह वाढत रहाते. रांगणारे खवले झाडाचे रस शोषण करतात. गंभीर संक्रमणात पानांचे कोष, हिरवा भाग आणि मध्यशीरही संक्रमित होतात.


प्रतिबंधक उपाय

  • सीओ ४३९, सीओ ४४३, सीओ ४५३, सीओ ६७१ आणि सीओ ६९२ सारख्या प्रतिकारक वाणांची लागवड करा.
  • खवले किड्यांपासुन मुक्त असलेले बेणे लावा.
  • स्वच्छ लागवड सामग्रीचा वापर करा जेणेकरून खवले किड्यांची संख्या लवकर वाढणार नाही.
  • शेत आणि बांध तणमुक्त राखा.
  • शेतातुन साचलेले पाणी निचरा करुन काढा.
  • संक्रमणाच्या लक्षणांसाठी शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • ऊसाची जास्त संक्रमित झाडे मुळासकट उपटून जाळा.
  • यजमान नसणार्‍या पिकांसह (उदा.
  • गहू) पीक फेरपालट करा.
  • लागवडीच्या १५० आणि २१० व्या दिवशी पाचट काढा.
  • सतत खोडवा घेणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा