ऊस

शेंडे पोखरणारा पांढरा किडा

Scirpophaga excerptalis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पोंगा मर.
  • पानभर समांतर छिद्रांच्या ओळी दिसतात.
  • फांद्यांना, फुटव्यांना आणि पानांना आतुन खाल्ले जाते.
  • पतंग रुपेरी पांढरे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके

ऊस

लक्षणे

जेव्हा पाने उमलतात तेव्हा त्यावरील समांतर छिद्रांच्या ओळी ही पोखरणार्‍या किड्यांच्या कामाचे दृष्य लक्षण आहे. पानाच्या मध्यशीरेत तपकिरी वाळलेले बोगदे दिसतात जे सुरवातीच्या टप्प्यावर झालेल्या हल्ल्यास ओळखण्याचे वैशिष्ट्यपूर्ण लक्षण आहे. पानाच्या वरच्या बाजुस देठाजवळ अंड्याचे पुंजके असतात. फुटव्यांवर हल्ला होतो, ज्यामुळे खोड मरते. ऊसात पोंगा मर आढळते आणि रंग लालसर तपकिरी होतो. शेंड्यांचे कोंब वाळतात आणि खुजे होतात. बाजुने फुटवे निघाल्याने झाड झुडपासारखे दिसते. जमिनीजवळच्या खोडाच्या भागातही छोटी छिद्रे पाहिली जाऊ शकतात. एका फुटव्यात फक्त एकच अळी आतुन खात असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रायकोग्रामा चिलिनिस सारखे अंडी खाणारे परजीवी १०००० प्रति हेक्टर याप्रमाणे १० दिवसांच्या अंतराने किंवा इच्न्युमोनिड पॅरासिटाइज्ड गँब्रॉइडस (आयसोटिमा) जॅवेन्सिस (१०० जोड्या/हेक्टर) २-३ वेळा सोडावेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कार्बोफ्युरॉन ५% (३३.३ किलो /हेक्टर) फोकुन द्या किंवा क्लोरँट्रानिप्रोल १८.५% एससी (३७५ मि.ली./हेक्टर) ची फवारणी करा. मुळाजवळ हलकी चर पाडुन त्यात कार्बोफ्युरॉनचे खडे टाकुन नंतर हलके सिंचन करावे. तरीही कोवळे प्रभावित फुटवे तोडणे अत्यंत प्रभावी ठरते.

कशामुळे झाले

स्किर्पोफेगा एक्सर्पटालिस नावाच्या ऊसाचे शेंडे पोखरणार्‍या पांढर्‍या किड्यामुळे नुकसान होते. प्रौढ पतंगांचे पंख रुपेरी पांढरे असुन पिसांसारखी टोक असतात. माद्यांनी घातलेल्या अंड्यांवर पिवळे तपकिरी केस किंवा लव असते. अळ्या गुंडाळलेल्या पानांत बोगदे करतात त्यामुळे वर्णित नुकसान होते. अळ्या सुमारे ३५ मि.मी. लांब, दुधाळ पांढर्‍या किंवा पिवळ्या असुन डोके तपकिरी असते, कोणतेही पट्टे नसतात आणि पाय अगदी कमजोर असतात. मध्यशीरेतुन खात खात त्या झाडाच्या गाभ्यापर्यंत पोचतात. तिसरी पिढी ऊसाचे भारी नुकसान करते. खास करुन आर्द्र हवामानात रोपे या उपद्रवास खूप धार्जिणी असतात.


प्रतिबंधक उपाय

  • सीओ ४१९, सीओ७४५, सीओ६५१६, सीओ८५९, सीओ११५८ किंवा सीओ७२२४ सारखी प्रतिकारक वाण किंवा सहनशील वाणे लावा.
  • जोड ओळ पद्धत योग्य राहील.
  • मसाले किंवा कडधान्यांसारख्या यजमान नसणार्‍या पिकांसह आंतरपिक घ्या.
  • मका, ज्वारीस आंतरपिक म्हणुन वापरु नका.
  • प्रौढ पतंगांचे निरीक्षण करण्यासाठी २-३ कामगंध सापळे हेक्टरी लावा.
  • नैसर्गिक भक्षकांना बाहेर पडता येईल असे प्रकाश किंवा कामगंधाचे २ सापळे ५ हेक्टरसाठी लावा.
  • किंवा संध्याकाळी वा सकाळी वरच्या दिशेने जाळ्या टाका.
  • प्रभावित झाडांचे भाग काढुन टाका.
  • अंडी दिसताच पुंजके गोळा करुन नष्ट करा.
  • तसेच अंडी ऊबायच्या २र्‍या कालावधीत मृत गाभे काढुन नष्ट करा.
  • नैसर्गिक भक्षक आणि परजीवींचे संगोपन करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा