द्राक्षे

कॉकशेफर (बीटल किडा)

Melolontha melolontha

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने मरगळतात आणि पिवळी पडतात.
  • मुळांना नुकसान होते.
  • पीक कमी भरते.

मध्ये देखील मिळू शकते


द्राक्षे

लक्षणे

अळ्या मूळतंतुंना नुकसान करतात ज्यामुळे रोप मरगळतात आणि झाडी पिवळी पडते. मूळांची पूर्ण साल काढुन खाल्ली जाते ज्यामुळे द्राक्षाची वेलीचे पूर्ण नुकसान होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

चिचुंद्र्या, वटवाघुळ, कोकिळ, सुतारपक्षी, चिमण्या, जमिनीवरील बीटल्स, मोठे वॅस्पस आणि ताचिनिड माशांसारख्या नैसर्गिक भक्षक शत्रुंचे संगोपन करा. ब्युव्हेरिया बॅसिनिया किंवा मेटार्‍हिझियम अॅनिसोप्लिये सारख्या जैव बुरशी वापरा. हेटेरोर्‍हाब्डिटिस मेगिडिस सारखे परजीवी जंत मातीत सोडले असता ते सुस्तावलेल्या अळ्यांना खातात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. आपल्या द्राक्षाच्या मळ्यात मॅलेथियॉन ५०% इसी ४०० मि.ली. प्रत्येकी ६००-८०० ली. पाणी / एकरी वापरा

कशामुळे झाले

मेलोलोंथा नावाच्या चेफर बीटलच्या प्रौढांमुळे नुकसान उद्भवते. ते रंगाने तपकिरी असुन डोके गडद असते. माद्या किडे त्यांची अंडी मातीच्या थराखाली सुमारे १०-२० सेंमी. खोलीवर घालतात. अळ्या पांढुरक्या पिवळ्या, पारदर्शक आणि सुमारे ५ मि.मी. लांबीच्या असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळ्यांना सोंड असुन खालचा जबडा मजबूत असतो. त्यांचे डोके पिवळसर आणि शरीर पांढरे असुन त्या मांसल असतात तसेच 'C' आकाराच्या असतात. अळ्या ग्रब (जाडजूड होऊन सुस्तावलेल्या) म्हणुन जमिनीत विश्रांती घेतात आणि रोपांची मूळे खातात. त्यांचे जीवनचक्र सुमारे ३-४ वर्षांचे असते. अळीचा तिसरा टप्पा हा फार खादाड असतो ज्यामुळे रोपांना भारी नुकसान होते. मूळे खाल्ली तर जातातच पण त्यात बोगदेही केले जातात ज्यामुळे रोपाचा वरचा भाग मरगळतो आणि मरतो. प्रौढ बीटल्स दिवसा विश्रांती घेतात आणि संध्याकाळच्या सुमारास खाण्याच्या जागेकडे उडुन जातात.


प्रतिबंधक उपाय

  • बीटल्स आणि खाल्ल्याने झालेल्या नुकसानासाठी पिकाचे अठवड्यातुन दोनदा निरीक्षण करा.
  • जर कॉकशेफरची संख्या तशी थोडी कमीच असली तर त्यांना हाताने काढुन साबणाच्या पाण्याने भरलेल्या बादलीत टाका.
  • प्रौढ बीटल्सना दूर ठेवण्यासाठी मळ्याच्या किनार्‍याने लोकरीसारखे अडथळे निर्माण करा.
  • प्रकाश सापळे लावा कारण हे बीटल्सना मोठ्या संख्येने आकर्षित करतात.
  • मातीत नांगरुन अळ्यांची विश्रांती स्थाने नष्ट करा.
  • परजीवी आणि नैसर्गिक भक्षकांना अनुकूल अशी वातावरण निर्मिती करा कारण ते अळ्यांना खातात.
  • काही भागात त्यांना मानवी अन्न म्हणुनही वापरले जाते.

प्लँटिक्स डाऊनलोड करा