उडीद आणि मूग

हरबर्‍यावरील निळे भुंगेरे

Euchrysops cnejus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कळ्या, फुले आणि कोवळ्या घाट्यांवर पोखरलेली चिन्हे दिसतात.
  • लाल रेषा, छोटे काळे केस शरीरावर असणारे गोगलगायींसारखे सुरवंट.
  • स्पष्ट काळ्या ठिपक्यांची निळे (नर) भुंगेरे.

मध्ये देखील मिळू शकते


उडीद आणि मूग

लक्षणे

कळ्या, फुले आणि घाट्यांवर आत शिरल्याच्या छिद्राच्या रुपात किंवा खाल्ल्याने होणार्‍या छिद्राच्या रुपात लक्षणे दिसतात. घाट्यांवरील नुकसान बहुधा प्रत्येक घाट्यावर पुष्कळशा छिद्रातुन दिसते. या छिद्रातुन स्त्रव होते आणि छिद्रांच्या कडा काळ्या होतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

लेपिडोप्टेरान उपद्रवाच्या नैसर्गिक शत्रुंना गवती निळ्या भुंगेर्यांची लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी वापरा. अंड्यांवर परजीवीपणा करणारी ट्रायकोग्रामा प्रजाती अठवड्याच्या अंतराने ०.६ लाख प्रति एकर प्रति अठवडा दराने चार वेळा वापरा. टेलोनोमस प्रजाती (अंड्यांना खाणारी) आणि अॅप्नाटेलेस प्रजाती (अळ्यांना खाणारी) ह्यांना शेतात सोडले असताना कीटकनाशके न वापरता यांचे संवर्धन करा. इतर सुरवंटांच्या बरोबरीने कीटकनाशकांच्या वापरानेही अळ्यांचे नियंत्रण केले जाऊ शकते. बॅसिलस थुरिंगिएनसिस (किमान १०० प्रति ली. पाणी प्रति हेक्टर)ने झाडांना आच्छादित करा. नीमचे तेल वापरुनही उपद्रवाचे नियंत्रण केले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. गवती निळ्या भुंगेर्यांसाठी कोणत्याही कीटकनाशकाची नोंद करण्यात आलेली नाही. लेपिडोप्टेराच्या इतर प्रजातींसाठी वापरली जाणारी कीटकनाशके यांचेही नियंत्रण करण्यासाठी वापरली जातात. प्रोफेनोफॉस वापरुन इ. नेज्युसचे प्रभावी नियंत्रण करण्याची शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

युक्रिसॉप्स नेज्युसच्या अळ्यांमुळे लक्षणे उद्भवतात. प्रौढ नर फिकट जांभळे असतात तर माद्यांच्या पंखांच्या बुडाशी फिकट चमचमीत निळा रंग दिसतो आणि शरीर जास्त काळे असते. माद्या जीवनभरात कोंबांवर, कळ्यांवर किंवा पानांवर ६०-२०० अंडी घालतात. अळ्या जाडजुड, चपट्या, फिकट हिरव्या किंवा पिवळ्या असुन लांबीने सुमारे १३ मि.मी. असतात व त्यांच्या शरीरावर लाल रेष आणि बारीक काळे केस असतात. त्यांच्या आसपास बहुधा काळ्या मुंग्या असतात. त्यांच्या रंगामुळे आणि त्यांच्या उपाद्रवाच्या जागांमुळे सुरवंट जरी दिवसा वावरत असले तरी सहजासहजी ओळखता येत नाहीत. अळ्या जास्त करुन कडधान्य पिकातील फुले आणि कोवळ्या शेंगांना छिद्र करुन खातात. पानांवरच कोषात जातात.


प्रतिबंधक उपाय

  • लागवड करताना पुरेसे अंतर ठेवा आणि लवकर किंवा उशीराची पेरणी टाळा.
  • अळ्या आणि कोष मारण्यासाठी नियमित मशागत करा.
  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी शेतावर लक्ष ठेवा.
  • अळ्या, कोष आणि प्रौढांना गोळा करुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा