लिंबूवर्गीय

तपकिरी मऊ खवले

Coccus hesperidum

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • तपकिरी मऊ खवले खोड, पाने, हिरव्या फांद्या आणि क्वचित फळे देखील खातात.
  • उपद्रवाच्या नुकसानाने पाने पिवळी पडतात आणि गंभीर बाबतीत पानगळ देखील होते.
  • काजळी बुरशीमुळे होणारे अप्रत्यक्ष नुकसान हे खवल्यांच्या थेट नुकसानापेक्षा खूप जास्त असते.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

लक्षणे, हल्ल्याची गंभीरता आणि लिंबुवर्गीयाचे प्रकार (लिंबु आणि ग्रेपफ्रुट खासकरुन संवेदनशील असतात.) याशी जुडलेली असतात. खवले बहुदा जमिनीजवळच्या खोड, पाने, हिरव्या फांद्या आणि क्वचित फळे देखील खातात. जोपर्यंत मोठ्या संख्येने खवले विकसित होत नाहीत तोपर्यंत थेट नुकसान बहुधा स्पष्ट दिसत नाही. खाण्याच्या नुकसानाने पाने पिवळी पडतात आणि गंभीर बाबतीत, पानगळ देखील होते. खवल्यांनी सोडलेल्या मधाळ रसामुळे काजळी बुरशीचे संक्रमण होते ज्यामुळे पाने आणि फळे काळी पडतात यामुळे खरतर खवल्यांपेक्षाही जास्त नुकसान होते. अशक्त झाडांना फळेही कमी लागतात आणि जर ती पक्व झालीच तरी त्यांचे आकार खूप लहान असते. सी. हेस्पेरिडम क्वचितच त्याच्या यजमानांना मारतो तरी कोवळ्या रोपांच्या वाढीवर आणि भविष्यातील उत्पादकतेवर प्रभाव पडतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पस मेटाफिकस ल्युटेयोलस, मायक्रोटेरिस नायट्नेरी, मेटाफिकस हेल्व्होलस, एनसिरटस प्रजाती., एनकार्शिया सिट्रिना आणि मुंग्यांना सहन करणारे कोक्लोफॅगस प्रजाती यांच्या नैसर्गिक भक्षकात येतात. सर्वात सर्वसामान्य भक्षक आहेत परजीवी माशा, लेसविंग्ज (क्रिसोपा, क्रिसोपेर्ला) आणि स्कटेलिस्टा स्याने तसेच लेडीबर्ड बीटल्स र्हासयझोबियस लोफान्थे. एनतोमोपॅथोजेनिक बुरशी (व्हर्टिसिलियम लेकानि) आणि स्टेनेर्नेमा फेल्टेये सुत्रकृमी खासकरुन जास्त आर्द्र हवामानात प्रभावी असतात. वनस्पती तेले/अर्क (उदा. पायरेथ्रम किंवा फॅटी अॅसिडस) हे सेंद्रिय फवारणी मध्ये येतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. तपकिरी मऊ खवल्यांचे नियंत्रण करणे कठिण आहे. क्लोरपायरीफॉस, कार्बारिल, डायमेथोएट किंवा मॅलॅथियॉन असणारे उत्पाद या किड्यांविरुद्ध चांगले काम करतात. कमी श्रेणीचे तेल फवारेही या उपचारांना पूरक म्हणुन वापरले जातात. काजळी बुरशीसाठी बुरशीनाशके वापरुन प्रतिबंध करता येतो. कोणत्याही बाबतीत मित्र किड्यांना त्रास देणारी विस्तृत श्रेणीची कीटकनाशके वापरु नयेत.

कशामुळे झाले

कोक्कस हेस्पेरिडम नावाच्या तपकिरी मऊ खवल्यांच्या उपद्रवामुळे लक्षणे उद्भवतात. हा लिंबुवर्गीय पिकातील सर्वसामान्य उपद्रव आहे खासकरुन उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय क्षेत्रांमध्ये तसेच हरितगृहांमध्ये आढळतो. यांच्या उद्रेकाचा हंगाम हे मध्य उन्हाळा ते शरद ऋतुच्या सुरवातीपर्यंतचा असतो. नर खूप चलित असतात आणि दोन पंखवाल्या वॅस्प किंवा माशीसारखे असतात पण क्वचितच दिसतात. माद्या अंडाकृत, चपट्या आणि मऊ असुन पानांच्या खालच्या बाजुला चिकटुन बसतात. जशा त्या वयात येतात त्यांचा रंग हिरव्याहुन तपकिरी होतो. ते काहीशा मधाच्या पोळ्यासारख्या रचनेत अंडी घालतात. तिथुन बारीक रांगणारे किडे झपाट्याने उपद्रवासाठी फांद्या, पानांच्या मध्य शिरांच्या बाजुने किंवा फळांवर चांगली जागा शोधतात. ते वार्‍यानेही आजुबाजुच्या झाडांवर पसरतात आणि उपद्रवाचा प्रसार करतात.


प्रतिबंधक उपाय

  • सर्व लागवड सामग्रीचे खवल्यांसाठी निरीक्षण करूनच शेतात किंवा हरितगृहात न्या.
  • खवल्यांच्या लक्षणांसाठी आपल्या बागेचे नियमित निरीक्षण करा आणि संख्येने कमी असल्यास त्यांना खरवडुन काढा.
  • खूप जास्त संक्रमित पाने आणि फांद्या काढुन जाळा.
  • झाडीत हवा खेळती रहाण्यासाठी पुरेशी छाटणी करा जेणेकरून खवल्यांसाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल.
  • फांद्या आणि खोडाभोवती अडथळे किंवा सापळे लावा ज्यामुळे खवल्यांचे खाद्य असलेल्या मुंग्यांचा प्रतिबंध होईल.
  • मित्र किड्यांवर परिणाम होईल असे विस्तृत श्रेणीचे कीटकनाशक वापरु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा