लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील फुलपाखरु

Papilio demoleus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • सुरवंट कोवळ्या फिकट हिरव्या पानांवर उपद्रव करतात.
  • उपद्रवाची सुरुवात पानांच्या कडांपासुन करुन मध्यापर्यंत पोचतात.
  • हे कीटक वर्षभर सक्रिय असतात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

कोवळी पाने कडांपासुन मध्याकडे खाल्ली जातात. पाने पूर्ण खाल्ली गेल्याने फक्त काटकीच उरतात. लहान आणि मोठी लिंबावरील फुलपाखरे लिंबाच्या झाडावरील सर्व पाने खाऊ शकतात आणि जर त्यांना विचलित केले गेले तर घाणेरडा वास सोडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

लिंबावरील फुलपाखरांच्या अंड्यांना ऊएनसिट्रसच्या पुष्कळ प्रजाती खातात आणि अळ्यांना अॅपानटिलिस पॅलिडोसिन्क्टस गाहान खातात. कोषावस्थेलाही तेरोमॅल्युस प्युपारम एल. खातात.

रासायनिक नियंत्रण

फेनिथ्तोथियॉन किंवा फेनथियॉनची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने २-३ वेळा करावी. अॅझॉर्डिन खोडावरील उपचार लिंबावरील फुलपाखरांच्या १० मि.मी. पेक्षा लहान असणार्‍या अळ्यांसाठी विषारी असतात. सिट्रिमेटचे फांदीवरील उपचार कोवळ्या रोपांना सुरक्षित ठेवण्यासाठी प्रभावी असतात. डायपेल २x, थुरिसाइड, एन्डोसल्फान डब्ल्युपी, लॅनेट एसएल, वगैरेचे फवारे बाहेरील आवरणावर मारले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

लिंबुवर्गीय पिकांवरील फुलपाखरांच्या सुरवंटामुळे होते. सुरवंट कोवळ्या पानांना रोपावस्थेपासुनच खाऊ लागतात आणि झाडावरील नविन फुटवाही खातात. पूर्ण वाढ झालेला सुरवंट रंगाने हिरवा असतो. गंभीर संक्रमण झाल्यास पूर्ण झाडाचीच पानगळ होते.


प्रतिबंधक उपाय

  • लागवड स्वच्छ ठेवा.
  • उदा.
  • पक्षांना शेतात येण्यासाठी प्रोत्साहन द्या, त्यांच्यासाठी शेतात पक्षीथांबे उभारा.
  • अंडी घातलेली पाने आणि अळ्या हाताने वेचुन जमिनीत गाडा किंवा जाळा.
  • लहान-मोठ्या झाडांवरील नविन फुटव्याची दर दोन अठवड्यानी अंडी आणि अळ्यांसाठी तपासणी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा