इतर

कापसावररील मातीसारखे डाग उमटवणारा ढेकूण

Oxycarenus hyalinipennis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पिल्ले आणि प्रौढ उघडलेल्या कापसाच्या बोंडांना अधाशीपणे खातात, ज्यामुळे सरकीवर डाग येतात आणि बोंडे अकाली गळतात.
  • नुकसानीत भागात सूक्ष्म जंतु घर करुन लक्षणे आणखी खराब होतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

कपाशीवर डाग आणणारे किडे म्हणुनही ओळखले जाणारे हे किडे आणि त्यांची पिल्ले मुख्यत्वेकरुन अर्धवट उघडलेल्या बोंडांवर हल्ला करतात, ज्यामुळे सरकीवर डाग दिसतात, बोंडे रंगहीन होतात, कुजतात आणि क्वचित अकाली गळतात (हे बहुधा खाण्याच्या प्रक्रियेत जंतु कपाशीच्या रसात मिसळल्याने होते). बियाणे चांगले विकसित होत नाही, हलके असते जे योग्यपणे पक्व होत नाही, ही अजुन काही लक्षणे आहेत. जास्त संख्या झाल्यास पिकाचा गंभीर नाश होऊ शकतो कारण सरकीवर डाग असतात, म्हणुन हे सामान्य नाव कपाशीवर डाग आणणार्‍या किड्यांचे आहे. झणझणीत वास आणि चिकट स्त्राव ही लक्षणे भेंडीसारख्या पर्यायी यजमानांवर खाताना सर्वसामान्यपणे दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

आफ्रितकील काही परजीवी कोळी ह्या किड्यांवर दिसतात ज्यामुळे हे किडे मंद होतात आणि लवकरच मरतात, काही कोळी ह्या उपद्रवांवर हल्लाही करतात. पानांवरील फवारे नीमच्या तेलात (५%) मिसळुन सौम्य करुन वापर केल्यास, ब्युव्हेरिया बॅसियाना आणि मेटारझियम अॅनिसोप्लियेसारख्या एंटोमोपॅथोजेनिक बुरशींवरही त्यांची लोकसंख्या नियंत्रात काही प्रभाव पडतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरपायरीफॉस, एसफेनव्हॅलरेट, बायफेनथ्रिन, डेल्टामेथ्रिन, लँब्डा-सिहॅलोथ्रिन किंवा इंडोक्साकार्ब असणारी कीटनाशक द्रावणे गुलाबी बोंडअळीविरुद्ध चांगले काम करतात आणि कपाशीवर काळसर डाग देणार्‍या किड्यांची संख्याही कमी करतात. तरीपण, हे किडे शेताला उशीरा संक्रमित करीत असल्या कारणाने, रसायनिक नियंत्रण केले जाऊ शकत नाही कारण पिकावर त्यांचे अंश राहू शकतात. किटनाशकांविरुद्ध प्रतिकार निर्माण होण्याच्या घटनाही नमुद केल्या गेल्या आहेत.

कशामुळे झाले

ऑक्झिकारेनस ह्यालिनिपेनिस नावाच्या, पॉलिफॅगल प्रकारच्या कपाशीवर डाग आणणार्‍या किड्यांमुळे ही लक्षणे उद्भवतात जे कपाशीवरील गंभीर उपद्रव होऊ शकतात. प्रौढ ४-५ मि.मी. लांबीचे असतात, आणि ते काळसर तपकिरी आणि पंख पारदर्शक असतात. नर मादीपेक्षा थोडे छोटे असतात. पांढुरकी पिवळी अंडी ४ पर्यंतच्या गु्च्छाने उघड्या बोंडाच्या सरकीत बियाणांच्या जवळ घातली जातात. पिल्ले सुमारे २.५ मि.मी लांब असतात आणि त्यांचा रंग त्यांच्या जीवनक्रमाच्या विविध टप्प्याप्रमाणे, जे सुमारे एकुण ४०-५० दिवसांचे असतात, गुलाबीपासुन ते तपकिरीपर्यंत बदलतो. मोसमाच्या शेवटी संक्रमण होते जेव्हा बोंडे उघडलेली असतात. ह्याचे इतर यजमान आहेत भेंडी आणि मालव्हॅके कुटुंबातील इतर रोपे.


प्रतिबंधक उपाय

  • शेताचे नियमित निरीक्षण करा आणि उघडलेल्या बोंडाच्या आजुबाजुला छोटे किडे दिसतायत का ते पहा.
  • ह्या किड्यांची संख्या कमी असल्यास त्यांना हाताने काढुन टाका.
  • किंवा कपाशीच्या किंवा भेंडीच्या लागवडीच्या भागात अतिनील किरणांचा दिवा लावुन ठेवा.
  • पर्यायि यजमान शेतातुन आणि आजुबाजुने काढुन टाका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा