कापूस

कपाशीची पाने मुडपणारी अळी

Syllepte derogata

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • अळ्या पानांच्या गुंडाळ्या करतात आणि तिथुन पानांच्या कडांना खातात.
  • प्रभावित पाने मुडपतात, मरगळतात ज्यामुळे पानगळ होते.
  • बोंड धारणाही प्रभावित होते आणि बोंडे अकाली पक्व होणेही होऊ शकते.
  • जास्त लोकसंख्या झाल्यास पिकाचे चांगलेच नुकसान होऊ शकते.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके

कापूस

लक्षणे

रणशिंगाच्या आकारात पाने मुडपली जातात, मुख्य करुन रोपाच्या वरच्या भागातील, ही सुरवातीची लक्षणे आहेत. अळ्या मुडपलेल्या पानांच्या आत असतात आणि तिथुन त्या पानांच्या कडांना चावतात. हळुहळु, मुडपलेली पाने गुंडाळतात, निस्तेज होतात, ज्यामुळे पानगळ होते आणि बोंडे अकाली पक्व होतात. जर हल्ला कळ्या किंवा फुलधारणेच्या सुमारास झाला तर बोंडांची रचनाही बिघडते.तरीपण जास्त लोकसंख्या क्वचितच सापडते. जर ह्या किड्यांच्या लोकसंख्येचे नियंत्रण केले गेले नाही तर पिकाचे चांगलेच नुकसान होऊ शकते. एस डेरोगाटा हा भेंडीवरील सर्वसामान्य उपद्रव आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी जाती किंवा इतर शिकारी किड्यांचा उपयोग जैव नियंत्रण म्हणुन लोकसंख्या कमी करण्यासाठी केला गेला आहे. अॅपँटेलेस प्रजाती आणि मेसोकोरस प्रजाती ह्या दोन जाती अळ्यांवर परजीवीपणा करतात आणि ब्राचिमेरिया प्रजाती आणि झांथोपिम्पला प्रजाती ह्या दोन जाती कोषांवर परजीवीपण करतात ह्यांची शेतातील चाचणी यशस्वी झालेली आहे. जर कीटनाशकांची गरज भासलीच तर बॅसिलस थुरिगिएनसिस (बीटी) असणार्‍या फवारे उत्पादांचा वापर लोकसंख्या कमी करण्यासाठी केला जाऊ शकतो.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पायरेथ्रॉइडस, सायपरमेथ्रिन आणि इंडोक्झाकार्ब (किंवा ह्या सक्रिय घटकांचे मिश्रण) वापरुन कपाशीच्या शेतात लोकसंख्या पातळी कमी करण्यात सफलता मिळाली आहे.

कशामुळे झाले

सिलेप्टे डेरोगाटा नावाच्या कपाशीची पाने मुडपणार्‍या अळ्यांच्या खाण्यामुळे नुकसान होते. प्रौढ पतंग मध्यम आकाराचे असतात आणि त्यांच्या पंखांच्या पल्ला २५-३० मि.मी. असतो. ते पिवळसर पांढुरके असतात आणि त्यांच्या डोक्यावर आणि छातीवर विशिष्ट काळे आणि तपकिरी डाग असतात. गडद तपकिरी नागमोडी रेषा दोन्ही पंखांवर पहायला मिळतात, ज्यामुळे विशिष्ट नक्षी तयार होते. माद्या जास्त करुन रोपाच्या वरच्या टोकावरील कोवळ्या पानांच्या खालच्या बाजुला अंडी घालतात. छोट्या अळ्या सुरवातीला पानाच्या खालील भाग खातात पण नंतर वरच्या बाजुला येऊन पानाला मुडपुन विशिष्ट कोष तयार करुन त्यात कोषावस्थेत जातात. अळ्या सुमारे १५ मि.मी. लांब आणि रंगाने मातकट फिकट हिरव्या तसेच अर्धपारदर्शक असतात.


प्रतिबंधक उपाय

  • एस.
  • डेरोगाटा ही वारंवार होणारी समस्या असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • उच्चीची लोकसंख्या टाळण्यासाठी मोसमात उशीरा पेरणी करा.
  • चांगली खत योजना आखुन निरोगी रोपे वाढवा.
  • रोग किंवा उपद्रवाच्या लक्षणांसाठी रोपे किंवा शेताचे निरीक्षण करा.
  • संक्रमित पाने आणि सुरवंटांना हाताने काढा.
  • संक्रमित पाने, सुरवंट आणि कचरा काढुन जाळुन नष्ट करा.
  • सापळे वापरुन पतंगांना आकर्षित करा.
  • कीटनाशकांचा अविवेकी वापर टाळा ज्यामुळे उपद्रवाचे नैसर्गिक शत्रु नष्ट होतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा