सोयाबीन

सोयाबीनवरील गर्डल बीटल

Obereopsis brevis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फांद्यांवर किंवा खोडावर दोन गोलाकार खाचा दिसतात.
  • पाने मरगळतात आणि वाळतात.
  • कोवळ्या रोपांची मर होते.
  • बीटलचे डोके आणि छाती पिवळट लाल रंगाची व पंख तपकिरी असतात.
  • अळ्या पांढर्‍या असुन डोके गडद असते.

मध्ये देखील मिळू शकते


सोयाबीन

लक्षणे

रोपावस्थेत खोडावर किंवा फांदीवर दोन गोल चिरांच्या वैशिष्ट्याने लक्षणे दृष्य होतात. रोप आणि कोवळी रोप वाळतात किंवा मर होते तर जुन्या झाडात फक्त पाने तपकिरी होतात किंवा वाळतात. प्रभावित फांद्यांवर गोलाकार वर्तुळे दिसतात. ह्या चिरांच्या वरचा संक्रमित भाग अखेरीस वाळतो. संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यावर जमिनीपासुन सुमारे १५-२५ सें.मी. उंचीवर रोप कापले जाते.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत, कोणतेही प्रभावी सेंद्रीय उपचार उपलब्ध नाहीत. सोयाबीन गर्डल बीटलचे नियंत्रण करण्यासाठी पर्यायी उपचार प्रतिबंधात्मक आणि मशागतीच्या उपचारांपुरतेच मर्यादित आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर आर्थिक सीमेच्या ५% पेक्षा जास्त नुकसान होत असेल तर एनएसकेइ ५% किंवा अॅझाडिराक्टिन १००००पीपीम ला १ मि.ली प्रती लिटर पाण्यात मिसळुन वापरावे ज्यामुळे गर्डल बीटल्स अंडी घालत नाहीत. दाणेदार कार्टॅप हायड्रोक्लोराइड ४ किलो प्रति एकर पेरणीच्या वेळी टाकावे. लँब्डा-सायहॅलोथ्रिन ५ इसी १ मि.ली. किंवा डायमिथोएट २५ इसी, १ मि.ली. प्रति ली. पाण्यात मिसळुन पेरणीनंतर ३०-३५ दिवसांनी फवारावे आणि संक्रमण दिसल्यास पहिल्या फवारणीनंतर १५-२० दिवसांनी परत फवारणी करावी. क्लोरँट्रानिलिप्रोल १८.५% एससी १५० मि.ली. प्रति हेक्टर, प्रोफेनोफॉस आणि ट्रायझोफॉसची वाढीच्या आणि फुलधारणेच्या काळात शिफारस करण्यात येते.

कशामुळे झाले

ओबेरोप्सिस ब्रेव्हिस नावाच्या पांढर्‍या, मऊ शरीराच्या, गडद डोक्याच्या अळ्यांमुळेच बहुधा लक्षणे उद्भवतात. प्रौढ बीटल्सचे वैशिष्ट्य त्याचे पिवळट लाल डोके आणि छातीचा रंग आणि पंखाच्या टोकाला तपकिरी रंग असतो. माद्या गर्डलच्या मध्ये अंडी घालतात. अळ्या खोडात पोखरुन आतील भाग खातात ज्यामुळे बोगदे तयार होतात. चिरांच्या वरच्या भागाला पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे तो वाळतो. परिणामी उत्पादनाचे मोठे नुकसान होते. बीटल्ससाठी २४-३१ अंशाचे तापमान आणि जास्त सापेक्ष आर्द्रता ही आदर्श परिस्थिती आहे.


प्रतिबंधक उपाय

  • एनआरसी-१२ किंवा एनआरसी-७ सारखी सहनशील वाण लावा.
  • योग्यवेळी पेरणी (पावसाळ्याच्या सुरवातीला) करताना बियाणे समान अंतरावर पेरा.
  • नत्रयुक्त खतांचा जास्त वापर टाळा.
  • संक्रमित झाडांचे भाग किमान दर १० दिवसातुन एकदा गोळा करुन नष्ट करा.
  • काढणीनंतर झाडांचे अवशेष नष्ट करा.
  • पीक फेरपालटची शिफारस केली जाते पण मका किंवा ज्वारीसह आंतरपीक घेणे टाळा.
  • पुढच्या हंगामासाठी जमिन तयार करताना उन्हाळ्यात खोल नांगरा.
  • शाइंचाचा वापर सापळा पीक म्हणुन केला जाऊ शकतो.

प्लँटिक्स डाऊनलोड करा