भेंडी

ठिपकेदार पाने खाणारी बोंड अळी

Earias vittella

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फुटव्यांना फुले येण्या आधीच मरगळतात.
  • बोंड गळतात.
  • बोंडात छिद्रे असतात आणि आतुन कुजतात.
  • कपाशीच्या बोंडातुन आतील भाग हळुहळु नाहीसा होतो.

मध्ये देखील मिळू शकते


भेंडी

लक्षणे

अळ्या मुख्यत्वेकरुन कपाशीच्या बोंडांवर हल्ला करतात, पण पुष्पकोष, फुटवे आणि फुलांवरही हल्ला करु शकतात. जर झाडी येण्याच्या सुमारास हल्ला झाला तर ते फुटव्यांच्या कळ्यांना छिद्रे पाडतात आणि खाली सरकतात. त्यामुळे फुले येण्याआधीच फुटवे सुकतात आणि गळतात. जर मुख्य फांदीवर प्रभाव पडला तर पूर्ण रोपच कोलमडु शकते. नंतरच्या टप्प्यावर हल्ला झाल्यास, अळ्या कळ्या आणि बोंड खातात, कळ्यांच्या बुडाशी आणि बोंडात छिद्रे करतात. नुकसानीत कळ्या काही वेळा अकाली उमलतात आणि वाढीव पुष्पकोष दिसुन येऊ शकतात. बोगद्यांची तोंडे बहुधा विष्ठेने झाकलेली असतात ज्यावर बुरशी किंवा इतर जंतुजन्य संसर्ग होऊन लक्षणे आणखीन खराब होतात. हल्ल्याच्या वेळी रोपाचे वय जितकेकमी तितके जास्त नुकसान ठिपकेदार बोंडआळ्या करु शकतात. ह्याच्या यजमानात भेंडी आणि जास्वंदही येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

अंडी किंवा छोट्या अळ्या शोधणे हे ह्या उपद्रवाच्या व्यवस्थापनात महत्वाचे आहे. ब्रॅकोनिडे, स्केलियोनिडे आणि ट्रिकोग्रामाटिडे कुटुंबातील काही परजीवी किडे जैव नियंत्रण पद्धत म्हणुन वापरले जाऊ शकतात. खालील क्रमश: शिकारी किड्यांनाही वापरले जाऊ शकते: कोलियोप्टेरा, हायमेनोप्टेरा, हेमिप्टेरा आणि न्युरोप्टेरा. ह्या किड्यांचे संवर्धन होईल (किंवा शेतातही सोडले जाऊ शकतात) याची काळजी घ्या आणि ब्रॉड स्केल कीटनाशकांचा वापर टाळा. आपण बॅसिलस थुरिंगिएनसिस असणारे जैव कीटनाशकांचे फवारे वापरुन लोकसंख्या उच्चीची होणे टाळु शकता. निंबोळीच्या अर्काचे (एनएसकेइ)५% किंवा नीम तेल (१५०० पीपीएम) ५ मि.ली. प्रति ली. फवारु शकता.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जर १० अंडी किंवा पाच छोट्या अळ्या प्रति १०० रोपांवर फुलोर्यापच्या सुरवातीला सापडल्या तर उपचारांची शिफारस करण्यात येते. अळ्या वाढत असताना कीटनाशकांचा प्रतिकार निर्माण करीत असल्याने, अंडी आणि छोट्या अळ्यांना शोधणे फार महत्वाचे आहे. उपचार अंड्याच्या अवस्थेवर करण्याची शिफारस केली जाते. क्लोरान्ट्रानिलिप्रोल, एमॅमेक्टिन बेंझोनेटे, फ्ल्युबेंन्दियामाइड, मिथोमिल किंवा एसफेनव्हॅलरेट असणार्या कीटनाशकांचा वापर केला जाऊ शकतो. रसायनिक उपचार कमी किंमतीच्या पिकासाठी व्यवहार्य नाहीत.

कशामुळे झाले

इरियास इनस्युलाना नावाच्या काटेरी बोंडअळीमुळे हे नुकसान उद्भवते, जी उत्तर भारतातील सर्वसामान्य उपद्रव आहे. ह्या उपद्रवाचे पर्यायी यजमान आहेत, जास्वंदी आणि भेंडी. पतंग रुपेरीसर हिरवे ते पिवळे असतात, सुमारे २ सें.मी. लांब असतात आणि फुलांवर किंवा प्रकाशाच्या स्त्रोताजवळ दिसतात. पंखांवर तीन गडद पट्टे असतात. उन्हाळ्यात हिरव्या रंगाचे सामान्यपणे आढळतात तर शरद ऋतुन पिवळे आणि तपकिरीसर आढळतात. अंडी निळ्या रंगाची असुन कोवळ्या कोंबांवर, पानांवर आणि पुष्पकोषांवर एकेकटी घातली जातात. छोट्या अळ्या फिक्या तपकिरी असुन राखाडी ते पिवळ्या आणि नारिंगी वैशिष्ट्ये असतात. इतर सुरवंटांपासुन ह्यांना त्यांच्या अंगभर पसरलेल्या छोट्या काट्यांमुळे, मोठ्या भिंगातुन पाहिल्यास, सहज वेगळे काढता येते. जशा त्या मोठ्या होतात, त्या पानाला किंवा गळलेल्या रोपांच्या भागांना चिकटुन रेशमी कोष तयार करुन कोषात जातात. उष्णकटिबंधिय हवामानात एक पिढी २०-२५ दिवसात पूर्ण होते. कमी तापमान असल्यास ही प्रक्रिया दोन महिन्यांपर्यंतही लांबु शकते.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या भागात उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • उच्चीची लोकसंख्या टाळण्यासाठी, लवकर पेरणी करा.
  • रोपात पुरेसे अंतर ठेवा.
  • जीवनचक्र मोडण्यासाठी काही थोडी शेत जमिन मोकळी ठेवा किंवा सापळा रोपे जसे कि भेंडी किंवा जास्वंदी लावा.
  • एकच पीक घेऊ नका आणि फायदेशीर रोपांची आंतरपिके घ्या.
  • काटेरी बोंड अळ्या आणि अंडी शोधण्यासाठी कपाशीच्या शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • खत पुरेसे द्या.
  • लवकर काढणी करा.
  • प्रत्येक हंगामानंतर रोपांचे सगळे अवशेष काढा.
  • खोल नांगरुन कोषांना शिकार्‍यांसाठी आणि हवामानाने नष्ट होण्यासाठी उघड्यावर पाडा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा