इतर

मक्यावरील ठिपकेदार किडे

Astylus atromaculatus

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फुल आणि मक्याच्या कणसावर काळ्या ठिपक्यांसह पिवळे लांबट किड्यांचे पुंजके दिसतात.
  • स्त्रीकेसर आणि दाण्यांना नुकसान होते.
  • बियाणे आणि उगवत्या रोपांना नुकसान होते आणि कमी पीक उभे राहते.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

फुल आणि मक्याच्या कणसावर काळ्या ठिपक्यांसह पिवळे लांबट किड्यांचे पुंजके दिसतात. बियाणे आणि उगवत्या रोपांना नुकसान होते आणि कमी पीक उभे राहते. हे किडे खर तर परिणामकारक परागीकरण करणारे मानले जातात कारण यांची उडण्याची क्षमता २०० मी. किंवा जास्त देखील असू शकते. जेव्हा हवामान अनुकूल (ऊबदार, कोरडे हवामान आणि १५ अंश सेल्शियसवरील तापमान) असते तेव्हा त्यांचा उपद्रव सुरु होतो. या हवामानात देखील कीटकनाशके वापरण्याइतके नुकसान ते करीत नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

भक्षकांसकट निवासी व्यवस्थापन (तृणधान्यावरील खोडकिडा) बरोबर या किड्यांना आकर्षित करणारी आणि पळवुन लावणारी (डेस्मोडियमचे आंतरपीक आणि नॅपियर गवताचे बांध) झाडे या क्वचित होणार्‍या उपद्रवाला पीकाला खाण्यापासुन रोखण्यासाठी पूर्वीही वापरले गेले आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. रसायनांची बीज प्रक्रिया आणि फवारणी हे अॅस्टिलस बीटल्सच्या नियंत्रणासाठी सध्या शिफारस करण्यात आलेले उपाय आहेत.

कशामुळे झाले

अॅस्टिलस अॅट्रोमॅक्युलाटस नावाच्या मक्यावरील ठिपकेदार किड्यांमुळे हे नुकसान उद्भवते. प्रौढ किडे थोडे लांबट असुन पिवळे पंख काळ्या ठिपक्यांना झाकतात. ते बहुधा वनस्पतीच खातात आणि मका, भात, ज्वारी किंवा सुर्यफुलातील स्त्रीकेशर, परागकण किंवा दाणे खातात. ते सहसा या झाडांना जास्त नुकसान करीत नाहीत. जर शेतात पीक फार कमी असेल तर किडे गवतांवर थव्यांनी जमा होतात आणि जर त्यांना गुरांनी खाल्ले तर समस्या होते आणि काही वेळा मृत्यु देखील होऊ शकते. माद्या कोरड्या पानांखाली अंडी घालतात. अळ्या जमिनीत रहातात आणि झाडाच्या कुजणार्‍या अवशेषांना खातात. ते काही वेळा बियाणाला किंवा उगलेल्या मक्याच्या रोपांनाही नुकसान करतात, ज्यामुळे कमी पीक उभे राहते. ऊबदार, कोरड्या हवामानाचा काळ (१५ अंश सेल्शियसपेक्षा जास्त) त्यांच्या जीवनचक्राला अनुकूल असतो.


प्रतिबंधक उपाय

  • वारंवार एकच पिक घेणे टाळा कारण हे कीटकांच्या विकासास अनुकूल आहे.
  • पिवळ्या बादलीत पाणी भरुन किंवा २-फिनेल इथेनॉलच्या आमिषाचे सापळे वापरुन लोकसंख्या कमी करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा