इतर

पांढर्‍या अळ्या

Phyllophaga spp.

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • रोपे खुजी, मरगळलेली आणि रंगहीन असतात.
  • शेतात सुकलेले भाग दिसतात.
  • जखमी रोपांची खोडे विशेषपणे जांभळी असतात.
  • थंड, ओल्या जमिनी परिस्थिती विकोपास नेतात.

मध्ये देखील मिळू शकते


इतर

लक्षणे

पांढर्‍या अळ्या पक्व झाडाच्या मुळांना तोडतात किंवा छोटी मुळे चावतात. ह्यामुळे पाणी आणि पोषके शोषणात बाधा येते ज्यामुळे वाढ खुंटते, मरगळ होते आणि झाडी रंगहीन होते. अंकुरलेल्या रोपांवरही हल्ला होतो ज्यामुळे शेतात सुकलेली वाढ दिसते किंवा ओळींमध्ये रिकामी जागा दिसते. वैशिष्ट्य म्हणजे जखमी झाडाची खोडे जांभळी होतात, जे स्फुरदाच्या कमतरतेचे लक्षण आहे. थंड, ओल्या जमिनी परिस्थिती विकोपास नेतात कारण मक्याच्या अंकुरलेल्या रोपांची वाढ हळू होते आणि फारा काळासाठी ती संवेदनशील रहातात.

Recommendations

जैविक नियंत्रण

टिफिया आणि मायझिनम जातीचे परजीवी वॅस्पस आणि पेलेसिनस पॉलिट्युराटरसारखे पांढर्‍या अळीचे नैसर्गिक शत्रु नियंत्रण करतात. पायर्गोटा उन्डाटा जातीसारख्या परजीवी माशात येतात. कॉर्डिसेप्स जातीची बुरशीही अळ्यांना संक्रमितकरते आणि लोकसंख्या नियंत्रणासाठी द्रावणात वापरली जाऊ शकते. बॅसिलस पॉपिलिये आणि बॅसिलस लेंटिमोर्बस जंतुंचे बीजाणू वापरुन जमिनीत लसीकरण केल्यासही लोकसंख्या कमी करण्यात मदत मिळते. हे सर्व उत्पाद बाजारात उपलब्ध आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. पांढर्‍या अळीच्या व्यवस्थापनासाठी पेरणीपूर्वी त्यांची उपस्थिती जाणुन घेण्यासाठी शेताचे बारकाईने निरीक्षण करणे आवश्यक आहे. जमिनीत कीटनाशकांची धूरी दिल्याने लोकसंख्या मान्य पातळीपर्यंत कमी होते. बियांणांवरील उपचारानेही काही बाबतीत पांढर्‍या अळ्यांचा प्रभाव कमी होतो पण बहुधा कोणत्याही रसायनिक उपचारांची शिफारस केली जात नाही.

कशामुळे झाले

फिलोफागा जातीच्या पुष्कळशा बीटल्सच्या अळ्यांमुळे नुकसान होते जिला सामान्यपणे "पांढरी अळी" (१०० पेक्षा जास्त विविध प्रजाती) म्हटले जाते. इतर प्रकारच्या अळ्याही सामिल असु शकतात आणि म्हणुन त्यांना ओळखायला शिकणे महत्वाचे आहे. बीटल्स सुमारे १२-२५ मि.मी. लांब,पिवळे ते लालसर तपकिरी किंवा काळ्या रंगाचे, जोमदार, आणि आयताकृती असतात. अळ्या पांढुरक्या असुन डोके तपकिरी आणि C आकाराचे असते, २०-४५ मि.मी. लांबी आणि पायांच्या तीन जोड्या असतात. ओटीपोटाच्या मागचा भाग गडद आणि थोडा मोठा असतो कारण शरीरातुन जमिनीचे कण दिसतात. ह्या किड्यांचे जीवनचक्र फार वैविध्यपूर्ण आहे आणि ह्यामुळे ह्यांच्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रतिबंधक नियंत्रण उपाय गरजेचे आहेत.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास जास्त सहनशील वाण लावा.
  • अळ्यांची उच्च लोकसंख्या टाळण्यासाठी पेरणीची तारीख बदला.
  • शेताचे निरीक्षण करण्यासाठी प्रभावित भागातील काही रोपे खणुन काढुन मुळांच्या भागात पांढर्‍या अळ्या शोधा.
  • खोल मुळे असणारी शेंग पिके (अल्फाल्फा किंवा क्लोव्हर्स) सारख्या यजमान नसणार्‍या पिकांबरोबर फेरबदल करा.
  • अंडी घालणे कमी होण्यासाठी शेतात गवतआणि तण वाढु देऊ नका.
  • सोयाबिन आणि बटाटे लागवड केलेल्या जागी मका लावु नका.
  • मध्य हंगामात नांगरुन किड्यांना शिकार्‍यांसाठी उघडे पाडा.
  • काढणीनंतर खोल नांगरुन रोपाचे अवशेष काढुन जाळा.
  • किंवा पॅस्चरिंग हॉग्जना वापरा जे खणुन पांढर्‍या अळ्यांना खातात.
  • पांढर्‍या अळ्यांच्या नैसर्गिक शत्रुंवर प्रभाव पडु नये म्हणुन कीटनाशकांचा जास्त वापर करु नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा