ऑलिव्ह

कुर्कुलियो टोका

Otiorhynchus cribricollis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • प्रौढ कुर्कुलिको टोके पानांवर हल्ला करतात, ज्यामुळे पानांच्या वैशिष्ट्यपूर्ण दातेरी कडा तयार होतात.
  • ते कोवळ्या कोंबानाही खातात, क्वचित कधी आजुबाजुच्या सालींच्या वर्तुळांनाही खातात.
  • उच्च लोकसंख्येमुळे चांगलेच नुकसान होऊ शकते खास करुन कोवळ्या रोपात.

मध्ये देखील मिळू शकते


ऑलिव्ह

लक्षणे

प्रौढ कुर्कुलियो टोके पानांवर हल्ला करतात, पानांच्या कडा चावुन पानांच्या कडांना दातेरी बनवतात. ते कोवळ्या कोंबांनाही खातात, क्वचित कधी आजुबाजुच्या सालीच्या वर्तुळांनाही खातात. ह्यामुळे पाणी व पोषकांचे वहन बाधीत होते आणि त्यामुळे फांदीची मर होते. काही पिकात टोके फुलांत सोंड खुपसुन प्रजोत्पादनाची रचना नष्ट करतात. लोकसंख्या उच्च झाल्यास चांगलेच नुकसान होते खास करुन कोवळ्या रोपांना. पूर्वी लागवडीत असणार्‍या भागातुन ऊबणारे प्रौढ सुद्धा नविनच लावलेल्या द्राक्षवेलींवर किंवा मळ्यांवर हल्ला करतात. द्राक्ष किंवा फळांना बहुतेक नुकसान होत नाही. अळ्या पिकांची मुळेही खातात पण त्यांनी केलेले नुकसान दुर्लक्ष करण्याइतपतच असते.

Recommendations

जैविक नियंत्रण

आजतागायत ह्या किड्यांवर कोणतेही जैव नियंत्रक घटक नाहीत असे वाटते. जर आपणांस माहिती असले तर आम्हाला जरुर कळवा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कृत्रिम पायरेथ्रॉइडचे उपचार कुर्कुलियो टोक्यांचे नियंत्रण करण्यात सगळ्यात जास्त परिणामकारक आहेत. अल्फासायपरमेथ्रिन असणार्‍या उत्पादांचे पानावरील फवारेही फळे नसणार्‍या किंवा न लागणार्‍या द्राक्षांच्या वेलींवर वापरले जाऊ शकतात.

कशामुळे झाले

कुर्कुलियो टोके (ओटियोर्‍हिंचस क्रिब्रिकोलिस)मुळे नुकसान उद्भवते. प्रौढ रात्री खातात. दिवसा ते सालीखाली, फांद्याच्या बेचक्यात, फळ आणि पानांमध्ये किंवा जमिनीतील छिद्रात विश्रांती घेतात. अंडी झाडांवर किंवा जमिनीवरील सुट्या जैव बाबीत घातली जातात. ऊबल्यानंतर छोट्या अळ्या जमिनीत खणुन रोपांच्या उपमुळांना खातात. ते शरद ऋतुत कोषात जातात. कोषावस्थेचा काळ हवामानाप्रमाणे तीन ते चार अठवड्यांचा असतो. कुर्कुलियो टोके मध्यम तापमानात चांगले फोफावतात. ह्यांची प्रतिवर्षी फक्त एकच पिढी होते, पण उन्हाळ्याच्या गरमीनंतर त्यांच्या पुनर्रचनेमुळे असे भासते कि ती दुसरी पिढी आहे. बहुतेक प्रौढ टोके उडत नाहीत पण काही थोड्या अंतरापर्यंत उडु शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • जर नुकसानीत फांद्या आढळल्या तर वसंतात लवकर विश्रांती घेणार्‍या प्रौढांना शोधा.
  • तणांचे नियंत्रण करा कारण ते पर्यायी यजमान म्हणुन काम करतात.
  • झाडांच्या सभोवताली चिकट पट्यांची वर्तुळे लावुन संरक्षण करा म्हणजे प्रौढ टोके खोडावर चढु शकणार नाहीत.

प्लँटिक्स डाऊनलोड करा