कापूस

कपाशीवरील तुडतुडे

Amrasca biguttula

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने पिवळसर आणि वरच्या बाजुला गोळा होतात.
  • नंतरच्या टप्प्यांवर कडांपासुन तपकिरी रंगहीनता सुरु होते.
  • वाळलेले पान गळतात.
  • वाढ खुंटते.

मध्ये देखील मिळू शकते


कापूस

लक्षणे

संक्रमित पान पिवळी पडतात व कडेपासुन तपकिरी होत मध्यापर्यंत पोहोचतात. पान पूर्ण सुकुन गळण्याआधी हळुहळु गोळा होऊ लागतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास "तुडतुड्यांमुळे भाजणे" दिसते, पाने वाळतात व कोवळ्या झाडांची वाढ खुंटते. वाढीच्या शेवटच्या काळात प्रादुर्भाव झाल्यास फळधारणा क्षमता कमी होऊन उत्पादनात मोठी घट होते आणि धाग्यांची प्रतही खालवते.

Recommendations

जैविक नियंत्रण

सामान्य हिरवे लेसविंग (क्रिसोपेर्ला कार्निया), ओरियस किंवा जिओकॉरीसच्या प्रजाती, कॉसिनेलिडसच्या आणि कोळ्यांच्या काही प्रजाती हे तुडतुड्याचे नेहमीचे भक्षक आहेत. त्या प्रजातींचा वापर करा आणि साधारणपणे कीटकनाशकांचा वापर टाळा. पहिले लक्षण दिसताच स्पिनोसॅड (०.३५ मि.ली./ली) वापरा.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच जर उपलब्ध असली तर जैविक उपचार पद्धतीही वापरा. मेलॅथियॉन, सायपरमेथ्रिन (१मि.ली/ली), सल्फोक्झेफ्लोर, क्लोरपायरीफॉस (२.५ मि.ली./ली), डायमिथिओएट, लँब्डासायहॅलोथ्रिन (१ मि.ली./ली) किंवा क्लोरँट्रॅनिपरोल + लँब्डा + सायहॅलोथ्रिन(०.५ मि.ली./ली) वर आधारीत कीटनाशक मिश्रणे वापरली जाऊ शकतात. पण त्यामुळे कदाचित ह्या किड्यांचे नैसर्गिक भक्षकही प्रभावित होऊ शकतात आणि म्हणुन हे फक्त गंभीर परिस्थितीतच आणि वेळेत वापरले पाहिजे. कीटनाशकांचे बीजोपचार केल्यास ४५-५० दिवसांपर्यंत पिकावरील तुडतुड्यांच्या संख्येला आळा बसु शकतो.

कशामुळे झाले

अमारास्का डिव्हास्टानच्या प्रौढ आणि पिल्लांमुळे नुकसान उद्भवते. ते झाडाचे रसशोषण करतात आणि त्यांच्या लाळेतुन विष झाडात जाते ज्यामुळे पेशींना नुकसान होते आणि प्रकाशसंश्लेषण क्रियेवर घातक परिणाम होतो. मध्यम ते उच्च तापमान (२१ ते ३१ डिग्री सेल्शियस), मध्यम ते उच्च आर्द्रता (५५ ते ८५%) ह्या किडांच्या उपस्थितीसाठी आणि कार्यासाठी पूरक असते. कमी तापमान आणि जोराचा वारा ह्या किड्यांच्या कार्यावर विपरीत परिणाम करतो.


प्रतिबंधक उपाय

  • प्रतिकारक किंवा सहनशील वाण वापरा (बाजारात बरेच वाण उपलब्ध आहेत).
  • तुडतुड्यांच्या उपद्रवाच्या लक्षणांसाठी नियमितपणे शेताचे निरीक्षण करत चला.
  • संतुलित खत नियोजन सुनिश्चित करा आणि नत्राचा जास्त वापर टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा