केळी

केळी फळांवर खपली देणारा भुंगा

Nacoleia octasema

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • वरवर खाल्लेले दिसते.
  • काळे व्रण दिसतात.
  • लबलबीत पदार्थाची उपस्थिती.
  • प्रौढ भुंगे रंगाने फिकट तपकिरी ते पिवळसर तपकिरी असुन पंखांवर काळी चिन्हे असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

केळी

लक्षणे

केळी फळांवर खपली देणार्‍या भुंग्याच्या अळ्यांमुळे नुकसान होते आणि मुख्यत्वेकरुन फळांतच मर्यादित रहाते. अळ्या पुष्पकोषात असलेल्या फळांच्या घडावरच हल्ल्याचे लक्ष केंद्रीत करतात. बाहेर आल्याबरोबर त्या फुलांना आणि विकसित होत असलेल्या फळांच्या पृष्ठभागाला खायला सुरवात करतात ज्यामुळे त्यांवर चर येऊन ते झपाट्याने काळे पडतात आणि चांगले दिसत नाहीत. कालांतराने पुष्पकोष उघडुन गळुन पडतात, त्यावेळी अळ्या खालच्या अजुनही पुष्पकोषात असलेल्या कोवळ्या घडावर स्थलांतरीत होतात. जर त्यांना कोणताही पर्याय उरला नाही तर अळ्या घडाच्या बुडाशी रहातात, आणि नर फुलांना खातात किंवा पिकत असलेल्या फळांना खातात. बहुधा ह्या जागांवर पारदर्शक चिकट पदार्थ, जो फक्त केळ्यावर खपली देणार्‍या भुंग्यांशीच निगडित आहे, ह्या जागी दिसतो. फळांवर दर्शनी चर आल्याने त्यांची बाजारपेठ संपुष्टात येते.

Recommendations

जैविक नियंत्रण

ह्या उपद्रवाविरुद्ध कोणतेही प्रमुख परजीवी किंवा भक्षक अजुनतरी लक्षात आलेले नाहीत. काही परजीवी वॅस्पस, कोळी आणि इतर सर्वसामान्य भक्षक काही थोड्या प्रमाणात नैसर्गिक नियंत्रण मिळवुन देतात. टेट्रामोरियम बायकॅरिनेटम नावाची मुंगी जी बहुधा रोपांवर आणि घडांवर आढळते, काही प्रमाणात केळ्यावर खपली देणार्‍या भुंग्याचे नियंत्रण करते. स्पिनोसॅड असणारी जैव कीटनाशक द्रावणे, ब्युव्हेरिया बसानिया किंवा मेटार्‍हिझियम अॅनिसोप्ले किंवा बॅक्टेरियम बॅसिलस थुरिंजिएनसिस बुरशीसुद्धा परिणामकारक ठरु शकतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. क्लोरपायरीफॉस, बायफेनथ्रिन आणि बेंडियोकार्ब ही सक्रिय तत्वांवर आधारीत मिश्रणे घडात इंजेक्शनद्वारे वापरावीत. घड सोप्यावर सरळ उभे असतानाच उपचार केले गेले पाहिजेत. २० ते ४० मि.ली. सौम्य केलेले कीटनाशक योग्य मात्रेत सोप्याच्या एक तृतियांश वरच्या भागात इंजेक्शनद्वारे द्या. ह्या भागावर किंवा खाली इंजेक्शन दिल्यास एकतर फळांना नुकसान होईल किंवा परिणामकारक होणार नाही.

कशामुळे झाले

नॅकोलिया ऑक्टासेमा नावाच्या केळी फळांवर खपली देणार्‍या भुंग्यामुळे हे नुकसान होते. प्रौढ फिकट तपकिरी ते पिवळसर तपकिरी छटेचे असुन त्यांच्या पंखांवर काळी चिन्हे असतात. हे जीवनमान कमी (४-५ दिवस) असणारे भुंगे संधीकाळात फारच सक्रिय असुन संध्याकाळी लवकर संभोग करतात. दिवसा ते अवशेषात आणि जुन्या पानांच्या खाली लपतात. माद्या उगवत असलेल्या घडावर किंवा त्याच्या आजुबाजुच्या पानांवर आणि पुष्पकोषांवर अंडी घालतात. उबल्यानंतर अळ्या घडावर जातात आणि खायला सुरवात करतात. अंडी ऊबण्यापासुन ते अंडी घालण्यापर्यंतचे त्यांचे जीवनचक्र हे २८ दिवसात पूर्ण होते. केळ्यावर खपली देणार्‍या भुंग्याला आर्द्र आणि ऊबदार हवामान भावते, आणि ओल्या काळात ते सगळ्यात जास्त नुकसान करतात. थंड आणि कोरड्या हिवाळ्याच्या काळात हे किडे दिसत नाहीत, पण ह्या काळात जर अकाली पाऊस आला तर दिसु शकतात. संशोधनांती असे दिसुन आले आहे कि कमी आर्द्रता आणि कोरड्या काळात प्रौढ संभोग करत नाहीत आणि अंडीही घालत नाहीत. केळ्याच्या पिकावरील सगळ्यात जास्त आर्थिक नुकसान करणारा हा उपद्रव आहे आणि जर नियंत्रण केले गेले नाही तर घडाचे १००% नुकसान होऊ शकते.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास लवचिक वाण लावा.
  • नविनच आलेल्या घडांची नुकसानासाठी आणि/किंवा अळ्यांसाठी तपासणी करा.
  • घडाच्या देठाच्या बुडाजवळ खास लक्ष द्या आणि तिथे काही पारदर्शक चिकट पदार्थ दिसतो का ते पहा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा