लिंबूवर्गीय

लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिडे

Scirtothrips citri

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • फळांच्या सालीवर राखाडी किंवा रुपेरी खरचटलेले व्रण दिसतात.
  • जसजसे फळ मोठे होत जाते तसतसे प्रभावित झालेले भाग देखील वाढत जातात.

मध्ये देखील मिळू शकते


लिंबूवर्गीय

लक्षणे

लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिड्याचे प्रौढ आणि अळ्या कोवळ्या, तयार न झालेल्या फळांच्या सालीत छिद्र करतात, आणि सालीवर खर्चटलेले राखाडीसर किंवा रुपेरी व्रण सोडतात. जुन्या अळ्या खर तर खूप जास्त नुकसान करतात कारण त्या मुख्यत्वेकरुन कोवळ्या फळाच्या फळकोषाच्या खालच्या बाजुला रससोषण करतात. जसजसे फळ वाढते, तसतशी नुकसान झालेली साल फळकोषाच्या खालच्या बाजुने वाढते आणि व्रण आलेल्या भागांचे वर्तुळ तयार होते. पाकळ्या गळाल्या पासून ते फळ सुमारे ३.७ से.मी. व्यासाचे होईपर्यंत झाड या प्रदुर्भावास फार संवेदनशील असतात. झाडीच्या बाहेर लागलेल्या फळांना फुलकिड्यांच्या हल्ल्याची जोखिम जास्त असते तसेच त्यांना वारा आणि उन्हाने करपण्याची देखील जोखिम असते. गराची प्रत आणि रसाचे वैशिष्ट्य जरी प्रभावित होत नसले तरी फळे विक्रीलायक रहात नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

भक्षक कोळी युसेइयस ट्युलारेनसिस, जाळी करणारे कोळी, लेसविंग्ज आणि सुक्ष्म पायरेट बग्ज लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिड्यांवर हल्ला करतात. इ. ट्युलारेनसिस या उपद्रवाचे नियंत्रण करतो आणि त्या बागेत किती नैसर्गिक शत्रु आहेत याची कल्पना देतो म्हणुन त्याला 'सूचक' जात म्हणुनही ओळखले जाते. सर्वसामान्य कीटकनाशकांचा वापर करुन या भक्षक प्रजातींना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. सेंद्रिय पद्धतीने व्यवस्थापन केलेल्या बागेत स्पिनोसॅडबरोबर सेंद्रिय मान्यता असलेल्या तेलांचे, काओलिन किंवा साबाडिला अल्कालॉइडस सारखी द्रावणे काकवी किंवा साखरेच्या आमिषाबरोबर वापरण्याची शिफारस करण्यात येते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. जरी पानांवर हल्ला होत असला तरी सामान्यपणे निरोगी झाड फुलकिडे कमी असल्यास झालेले नुकसान सहन करु शकते. झाडांना फळे लागण्याआधी वारंवार कीटकनाशकांचा वापर करु नये अशी शिफारस करण्यात येते कारण, यामुळे प्रतिकार निर्माण होऊ शकतो, त्यामुळे नंतरच्या वर्षांत फुलकिड्यांचे नियंत्रण करणे कठिण जाऊ शकते. अॅबामेक्टिन, स्पिनेटोरम, डायमेथोएट आणि सायफ्ल्युथ्रिन असणार्‍या द्रावणांचा वापर लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिड्यांविरुद्ध केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

स्किर्टोथ्रिप्स सिट्री नावाच्या लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिड्यांमुळे नुकसान होते. प्रौढ बारीक, नारिंगी पिवळ्या रंगाचे असुन त्यांचे पंख झालरीसारखे असतात. वसंत ऋतुत आणि उन्हाळ्यात माद्या सुमारे २५० अंडी नविन पान, कोवळी फळे आणि हिरव्या फांद्यांवर घालतात. हिवाळ्याच्या सुरवातीला, सुप्तावस्थेत रहाणारी अंडी बहुधा मोसमाच्या शेवटच्या वाढीत घातली जातात. ही अंडी पुढच्या वसंत ऋतुत जेव्हा झाडाला नवी पालवी फुटेल तेव्हा ऊबतात. तरुण अळ्या खूप बारीक असतात तर जुन्या अळ्या जवळपास प्रौढांच्या मापाच्या, फिरकीच्या आकाराच्या आणि पंखहीन असतात. शेवटच्या अळीच्या टप्प्यावर (कोष) फुलकिडे रस सोषण करत नाहीत आणि स्वत:चा विकास जमिनीवर किंवा झाडाच्या बेचक्यात करवितात. जेव्हा प्रौढ बाहेर येतात, ते बहुधा झाडीतच सक्रिय असतात. १४ डिग्री सेल्शियसच्या खालील तापमानात लिंबुवर्गीय पिकांवरील फुलकिडे विकसित होत नाहीत आणि जर हवामान अनुकूल असेल तर एका वर्षात त्यांच्या ८ ते १२ पिढ्या होतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास प्रतिकारक वाण लावा.
  • उपद्रवाच्या लक्षणांकरीता बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • मोठ्या प्रमाणात फुलकिड्यांना पकडण्यासाठी मोठ्या संख्येने चिकट सापळे लावा.
  • ब्रॉड स्केल कीटकनाशके वापरुन भक्षक किडींना नुकसान होणार नाही याची काळजी घ्या.
  • पर्यायी यजमानांच्या आसपास लागवड करणे टाळा आणि बागेतुन तसेच आजुबाजुने तण नियंत्रण करा.
  • झाडांना भरपुर पाणी द्या आणि नत्रयुक्त खते जास्त देणे टाळा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा