भात

भातावरील बेडुक तुडतुडे

Deois flavopicta

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पाने पिवळी पडतात आणि मरगळतात.
  • पांढरट फेसाळ द्रव - गोळा झालेली लाळ.
  • कोवळ्या रोपांची मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भात

लक्षणे

लाळेचा फेस (किड्यांच्या गळलेल्या लाळेत हवा मिसळुन तयार झालेला फेस) दिसणे हे झाडाला अळ्यांनी खालेल्याचा मोठा पुरावा आहे. माद्या किडे यजमान रोपाजवळील जमिनीत अंडी घालतात. अंडी उबल्यानंतर अळ्या बाहेर येऊन आधाशीपणे मूळे आणि जमिनीजवळच्या फांद्या खातात. पिल्ले आणि प्रौढ दोन्ही रोपांचे रस शोषण करतात आणि रोपे नष्ट करतात. पिल्ले आणि प्रौढ दोन्ही, रोपांचे रस शोषण करतात आणि रोपांना कमजोर बनवितात तसेच रसाचे चलन थांबविणारे किंवा प्रतिबंध करणारे विष सोडतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

रात्रीचे तापमान कमी झाल्यास आणि अंड्यांना लांबलेल्या थंड हवामानत रहावे लागल्यास उबण्याचा काळ फारच कमी होतो. या लवकर उबण्याने किड्यांची संख्या कमी होऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. अंतरप्रवाही कीटनाशकांची बीज प्रक्रिया केल्यास डियोइस फ्लव्होपिक्टाच्या हल्ल्यापासुन प्रतिबंध केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

डेमेरारा फ्रॉगहॉपरांना लाळेचा किडा (डियोइस फ्लावोपिक्टा) म्हणुनही ओळखले जाते जे भात आणि मक्यासारख्या बर्‍याचशा पीकांना नुकसान करतात. माद्या यजमान रोपाच्या जवळ जमिनीत अंडी घालतात. उबल्यानंतर पिल्ले मुळांना आणि जमिनीजवळच्या खोडाच्या भागाला वेगाने खायला सुरवात करतात. त्यांच्या पांढर्‍या लाळेत हवा गेल्याने फेसाळ "लाळ जमा" होते. लाळ जमा होणे हेच पिल्लांनी रोपाला त्या ठिकाणी खाल्ल्याचे लक्षण आहे. शेतात किंवा आजुबाजुला (ब्राचारिया किंवा अॅक्झोनोपस च्या जाती) संवेदनशील गवत असल्यास किड्यांची संख्या वाढते. ते या रोपांकडे आकर्षिले जातात आणि त्यांना स्वत:च्या जीवनचक्रास पूरक असे पर्यायी यजमान म्हणुन वापरतात.


प्रतिबंधक उपाय

  • पानांवर पांढरे फेसाळ द्राव (जमा झालेली लाळ) दिसतेय का ते पहा.
  • शेतात आणि आजुबाजुने पर्यायी यजमानांचे नियंत्रण करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा