आंबा

आंब्याचे खोड पोखरणारी अळी

Citripestis eutraphera

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • कोवळ्या फळांवर आत शिरल्याची छिद्र दिसतात, त्यातुन रस आणि लगदा गळतो.
  • फळे दुभंगुन अकाली गळु शकतात.
  • तरुण अळ्यांचे डोके काळे आणि शरीर गुलाबी असते जे नंतर लालसर तपकिरी होते.
  • प्रौढ पतंगांचे पुढचे पंख गडद तपकिरी आणि पाठचे पंख फिकट पांढुरके राखाडी असतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

आंबा

लक्षणे

वाटाण्याच्या किंवा लिंबाच्या आकाराच्या फळांवर आत शिरण्यासाठी केलेली काळी छिद्रे दिसतात, लटकणार्‍या फळाच्या खालच्या टोकाशी बहुधा त्याच्या सभोवताली गोलाकार रंगहीन धब्बे दिसतात. जर फळ मोठे असेल तर चावलेला गर आणि रस ह्या भोकातुन गळतो. अळ्यांनी खूप बोगदे केल्याने फळ दुभंगु शकते. अशा परिस्थितीत अळी इतर फळांवर स्थलांतरीत होते. नविनच उबलेल्या अळ्या फिकट गुलाबी शरीराच्या असुन डोके गडद तपकिरी ते काळे असते. नंतर त्या लालसर तपकिरी रंगाच्या होतात. सुरवातीला त्या फळांच्या सालीला खरवडतात, ज्यामुळे खडबडीत धब्बे दिसु लागतात, मग नंतर त्या फळांत छिद्र करुन आत शिरतात, ज्यामुळे कोवळे फळ अकाली गळु शकते. जास्त संक्रमित झाडांखाली त्या शेकड्यांनी पाहिल्या जाऊ शकतात. संक्रमित फळही अकाली गळते.

Recommendations

जैविक नियंत्रण

फुले असताना नीम अर्क (अॅझाडिराकटिन) अठवड्याच्या अंतराने सतत २ महिने वापरावा. वॅस्पस रिचियम अॅट्रिसिमम (अळ्या खातात) आणि ट्रिकोग्रॅमा चिलोनिस आणि ट्रिकोग्रॅमा चिलोट्रे जे अंड्यांवर परजीवी असतात, अशा आंबा पोखरणार्‍या अळीच्या नैसर्गिक शत्रुंची संख्या राखावी

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थियाक्लोप्रिड असलेले फवारे मारल्यास आंबा पोखरणार्‍या अळीवर परिणामकारकरीत्या नियंत्रण करता येते. तसेच गोटीच्या आकाराची फळे झाली असता त्यावर कीटनाशकांची फवारणी केली असताही चांगले परिणाम मिळतात. क्लोरिपायरिफॉस (२.५ मि.ली/प्रति ली. पाण्यात) फवारले असतानी आंबा पोखरणार्‍या अळीचा परिणामकारकरीत्या नाश केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

प्रौड पतंगांचे पुढचे पंख गडद तपकिरी आणि पाठचे पंख फिकट पांढुरके राखाडी असतात. प्रौढ मध्यम आकाराचे पतंग असतात, त्यांचे पंख सुमारे २० मि.मी. लांबीचे असतात. प्रौढ पतंग सुमारे एक अठवडा जगतात आणि फळांच्या खडबडीत धब्ब्यावर तसेच पेडिसेल्समध्ये सुमारे १२५-४५० अंडी घालतात. अळ्या फळात शिरुन गर आणि कोय खातात. पूर्ण वाढ झालेला सुरवंट सुमारे २० सें.मी. लांबीचा असतो. गळ लेल्या फळाच्या आजुबाजुच्या जमिनीत सैलशा विणलेल्या रेशमी कोषात सुरवंट सुप्तावस्थेत जातो. विकसित व्हायला सुमारे ३० दिवस लागतात. किड्यांचे वहन संक्रमित फळांच्या वहनाने होते. प्रौढ पतंग विविध बागांमध्ये उडुन जाऊ शकतात.


प्रतिबंधक उपाय

  • नामवंत स्रोतांकडील स्वच्छ प्रमाणित बियाणेच वापरा.
  • काही अनियमित लक्षणांसाठी आणि उपद्रवाच्या उपस्थितीसाठी बागेचेनियमित निरीक्षण करा, खास करुन फळे लागण्याच्या सुमारास.
  • संक्रमित फ़ळे आणि त्या झाडांची साल नष्ट करा.
  • बागेभोवती कुंपण घातल्यास पतंग बागेत येण्यास मज्जाव होऊ शकेल.
  • मित्र किड्यांना वाचविण्यासाठी कीटनाशकांचा वापर जास्त करु नका.
  • संक्रमित रोपाचे सामान किंवा फळे इतर ठिकाणी नेऊ नका.

प्लँटिक्स डाऊनलोड करा