केळी

केळीवरील लेस विंग ढेकूण

Stephanitis typica

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • पानांच्या वरच्या बाजुला बारीक, पांढरे वाळलेले डाग पानांच्या वरच्या बाजुला येतात.
  • पानाच्या खालच्या बाजुला गडद स्त्राव दिसतो.
  • प्रौढ पिवळसर ते पांढुरके अर्धपारदर्शक असुन कलाबुतीसारखे झालरीचे पंख असतात.

मध्ये देखील मिळू शकते

2 पिके
केळी
हळद

केळी

लक्षणे

पानांवरील संक्रमण अगदी लांबुन देखील दिसते. प्रौढ आणि पिल्ले पानाच्या खालच्या बाजुला असतात, जिथे ती वस्ती करुन रहातात आणि पानातील रससोषण करतात. सामान्यपणे हे किडे मध्यशिरेच्या आजुबाजुने राहून रससोषण करतात. प्रादुर्भावामुळे झालेले नुकसान बारीक पांढर्‍या, पिवळ्या ठिपक्यांच्या रुपाने पानाच्या वरच्या बाजुला दिसते. किड्यांचा गडद स्त्राव पानांच्या खालच्या बाजुला सोडला जातो. वस्ती केलेले भाग कालांतराने पिवळे ते तपकिरी होतात आणि वाळतात. झाडाची वाढ खुंटलेली असते आणि ती रोगट दिसतात.

Recommendations

जैविक नियंत्रण

एकात्मिक दृष्टीकोनातुन वापर केल्यास स्टेथोकोनस प्राफेक्टस सारख्या भक्षक किड्यांच्या प्रजातींमुळे संक्रमण कमी होऊ शकते. निंबोळी तेल आणि लसुण (२%) याचे मिश्रण फवारणीसाठी वापरल्यास संक्रमणाचे नियंत्रण केले जाऊ शकते.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. या किडींचा सामना करण्याचा सर्वसामान्य उपाय म्हणजे कीटकनाशकांचा वापर होय. डायमेथोएट असणार्‍या उत्पादांना फवारणीसाठी वापरले जाऊ शकते. हे करताना पानाच्या खालच्या बाजुला देखील फवारणी बसली पाहिजे याची काळजी घ्या.

कशामुळे झाले

प्रौढ पिवळे ते पांढरट आणि सुमारे ४ मि.मी. मापाचे असुन पंख अर्धपारदर्शक, कलाबुतीच्या झालरीसारखे असतात. भुंग्यांच्या माद्या सुमारे ३० अंडी पानांच्या खालच्या बाजुला घालतात. सुमारे १२ दिवसांनी पिवळी पिल्ले ऊबुन बाहेर येतात. हा विकासाचा टप्पा सुमारे १३ दिवस रहातो. सध्या केळीवरील लेस विंग किड्यांच्या संक्रमणामुळे पिकाचे किती नुकसान होते ही माहिती तपशीलात उपलब्ध नाही. आतापर्यंत या उपद्रवामुळे केळीच्या पिकाला गंभीर नुकसान झाल्याचे अहवाल मिळालेले नाहीत.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील किंवा प्रतिकारक वाण उपलब्ध असल्यास लावा.
  • उपद्रवाच्या लक्षणांसाठी झाडाचे किंवा बागेचे नियमित निरीक्षण करा.
  • संक्रमित पान देठाकडील भागासकट खुडुन नष्ट करा म्हणजे संक्रमण पुढे वाढणार नाही.

प्लँटिक्स डाऊनलोड करा