भुईमूग

रात किडा

Sphenoptera indica

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • किडा फांद्यांना पोखरतो आणि फांद्यांच्या तसेच मुळांच्या आतील पेशींना खातो.
  • पाणी आणि पोषकांचे वहन रोपाच्या वरच्या भागात पोचण्यात ह्यामुळे बाधा येते.
  • बाधीत शेतात बहुधा मृत आणि मरगळलेल्या रोपांच्या ओळीच्या ओळी दिसतात.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

भुईमूग

लक्षणे

किडा जमिनीजवळच्या फांद्यांना पोखरतो आणि फांद्याच्या तसेच मुळांच्या आतल्या पेशी खातो. ह्या नुकसानामुळे पाणी आणि पोषण रोपाच्या वरच्या भागात पोचत नाही ज्यामुळे रोपे मरगळतात आणि मरतात. ह्या किड्याच्या खाण्याच्या क्रियेने आणि जमिनीत पसरण्याच्या पॅटर्नमुळे, बाधीत शेतात बहुधा भागच्या भाग मृत आणि मरगळलेल्या रोपांचे दिसतात. जेव्हा रोप जमिनीतुन मुळासकट उखडले जाते तेव्हा पोकळ खोडात किडा पाहिला जाऊ शकतो.

Recommendations

जैविक नियंत्रण

ब्रॅकोनिडस आणि ट्रिकोग्रामाटिडस परजीवी वॅस्पस ह्या किड्यांच्या अंड्यांवर परजीवीकरण करतात. ड्रॅगॉन फ्लाइज ह्या किड्यांची शिकार करतात. न्युक्लियर पॉलिहेड्रोसिसव व्हायरस (एनपीव्ही) वर किंवा ग्रीन म्युस्कारडाइनवर आधारीत जैव कीटनाशकेही ह्या उपद्रावाविरुद्ध यशस्वीपणे वापरली गेली आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. कार्बोफ्युरान खडी रोपांच्या ओळीत वापरली असता ह्या किड्यांची लोकसंख्या परिणामकारकरीत्या कमी होते. कार्बोफ्युरान किंवा क्लोरपायरिफॉस रोपाच्या वाढीच्या उशीराच्या टप्प्यावर वापरल्यास गंभीर नुकसान टळु शकते.

कशामुळे झाले

प्रौढ किडा गडद रंगाचा असतो आणि त्याचे शरीर हिर्‍यासारखे चमकते, तो साधारण १० मि.मी. लांब आणि ३ मि.मी. रुंद असतो. माद्या एकट्या मुख्य खोडाच्या बुडाशी अंडी घालतात. वाढीच्या टप्प्याप्रमाणे अळ्या रंगात आणि आकारात वेगवेगळ्या असतात. बहुधा त्यांचा रंग तपकिरी आणि पिवळ्याच्या मधील असतो. त्यांना पाय नसतात आणि त्या २० मि.मी.पेक्षाही लांब वाढु शकतात. त्यांचे वैशिष्ट्य असते लांबट, पाठच्या बाजुला निमुळते, चपटे शरीर असते आणि डोके आणि छाती गोलाकार असते. भुईमुगाच्या वाढीच्या उशीराच्या टप्प्यावर म्हणजे साधारणपणे पेरल्यानंतर ५० दिवसांच्या आसपास ते हल्ला करतात. किडा मुळात किंवा खोडात पोखरतो आणि आतील पेशी खातो, ज्यामुळे पाणी आणि पोषकांच्या वितरणात बाधा येते.


प्रतिबंधक उपाय

  • सहनशील वाण लावा.
  • शेताचे निरीक्षण करुन बाधीत रोपांना नष्ट करा.
  • जमिनीवर चांगले कुजलेले जैव खत पसरा.
  • शेतातील आणि आजुबाजुच्या परिसरातील जैव विविधतेवर लक्ष ठेवा.
  • पीक घेतल्यानंतर खोल नांगरा ज्याने कोष उघड्यावर पडुन नैसर्गिक शिकारी त्याचा घास घेतील.

प्लँटिक्स डाऊनलोड करा