इतर

पौर्वात्य फळमाशी

Grapholita molesta

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • अळ्यांनी यजमान रोपांच्या काटक्या आणि फळांवर हल्ला केल्याने नुकसान होते.
  • संक्रमित काटक्यांची पाने मरगळलेली असतात, जी फुटव्याची मर होण्याची लक्षणे आहेत.
  • फळांवर किडे बाहेर निघाल्याची छिद्रे असतात आणि सभोवताली चिकट स्त्राव आणि अळ्यांची विष्ठा असते.
  • संधीसाधू जंतु ह्या जखमातुन घर करतात.

मध्ये देखील मिळू शकते

5 पिके
सफरचंद
जर्दाळू
चेरी
पीच
अधिक

इतर

लक्षणे

अळ्यांनी यजमान रोपाच्या काटक्या आणि फळांवर हल्ला केल्याने नुकसान होते. छोट्या अळ्या फुटव्यात छिद्रे करतात आणि खाली सरकत, आतील भाग खातात. संक्रमित काटक्यांची पाने मरगळलेली असतात, जी फुटवा मराची लक्षणे आहेत. जितकी जास्त पाने मरगळ लेली असतात, तितके जास्त आत पर्यंत अळ्यांनी प्रवेश केलेला असतो. अखेरीस, काटक्या गडद रंगाच्या होतात किंवा पाने सुकतात आणि चिकट द्राव स्त्रवतो. ह्यांच्या पुढच्या पिढ्या फांद्यातुन फळात शिरतात आणि बहुधा खड्याच्या बाजुने बेढब रस्ते गरातुन काढतात. फळांवर किडे बाहेर निघाल्याची छिद्रे दिसतात आणि सभोवताली चिकट पदार्थ आणि अळ्यांची विष्ठा असते. संधीसाधू जंतु ह्या जखमातुन घरे करतात. फळे विकृत होतात आणि गंभीरपणे प्रभावित झाल्यास गळतात. बहुधा अळ्या फक्त एकच फळ खातात आणि फळावरुन परत काटकीवर जात नाहीत.

Recommendations

जैविक नियंत्रण

ट्रिकोग्रामा आणि ब्रँकोनिड, मॅक्रोसेनट्रस अॅनिसिलिव्होरस जातीचे परजीवी वॅस्पसचा वापर पौर्वात्य फळमाशीविरुद्ध करण्यात आला आहे. पुष्कळ प्रकारच्या बुरशी आणि जंतुं, उदा. ब्युव्हेरिया बॅसियाना आणि बॅसिलस थुरिंगीएनसिस, सुद्धा परिणामकारक आहेत. अंड्यांच्या आणि अळ्यांच्या विविध टप्प्यांवर परजीवीपणा करणारे इतर परजीवीही माहितीत आहेत पण त्यावर अजुन प्रयोग व्हायचे आहेत.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. वापराची वेळ महत्वाची आहे आणि तापमान तसेच किती पतंग आहेत ह्याप्रमाणे ती ठरविली गेली पाहिजे. रसायनिक नियंत्रण फक्त नविनच ऊबुन आलेल्या अळ्यांना लक्ष्य करते पण जर जी. मोलेसाटात उडण्याची क्षमता असताना वापर केला गेला तर जास्त परिणाम मिळतो. कामगंधावर आधारीत संभोग विस्थापक फवारे वापरले जाऊ शकते.

कशामुळे झाले

पौर्वात्य फळमाशीचे मुख्य यजमान पीच आणि नेक्टरिन असले तरी काही स्टोन फळे (टणक बिया असलेली चेरीसारखी), क्विंस, सफरचंद, पेयर आणि गुलाबावरही हल्ला करते. पतंग कोळशाच्या रंगाचे असतात आणि त्यांच्या पंखांचा पल्ला सुमारे ५ मि.मी. असतो. पुढचे पंख राखाडी असुन त्यावर स्पष्ट फिकट आणि गडद पट्टे असतात. वसंत ऋतुत बाहेर आल्यानंतर माद्या सुमारे २०० छोटी, चपटी, पांढरी एकेकटी अंडी पानांच्या खालच्या बाजुला किंवा काटक्यांवर घालतात. छोट्या अळ्यांचे शरीर दुधाळ पांढरे असुन नंतर ते गुलाबीसर होते, लांबी सुमारे ८-१३मि.मी. असते आणि डोके काळे किंवा तपकिरी असते. अळ्यांची पहिली पिढी वाढत्या फुटव्यातील पानांच्या बुडाशी छिद्रे करते. तिथुन ते आतील मऊ भाग खात-खात खाली जातात, अखेरीस काटकी मरगळते. नंतरची पिढी फांद्यांच्या बुडाजवळुन किंवा बाजुने आत शिरुन फळांवर हल्ला करते. नंतर पूर्ण वाढ झालेल्या अळ्या म्हणुन सालीच्या बेचक्यात किंवा झाडाच्या बुडाजवळील कचर्‍यासारख्या सुरक्षित ठिकाणी रेशमी कोषात जाते.


प्रतिबंधक उपाय

  • बागेचे ह्या रोगाच्या लक्षणांसाठी नियमित निरीक्षण करा.
  • वसंत ऋतुत सुरवातीला, कामगंध सापळेवापरुन प्रौढांच्या संख्येचे निरीक्षण करा.
  • छाटणी केलेले भाग, झाडावर राहिलेली फळे आणि जमिनीवर पडलेली फळे काढुन नष्ट करा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा