मका

युरोपियन कणीस पोखरणारी अळी

Ostrinia nubilalis

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • अळ्या झाडाचे वरचे सर्व भाग खातात.
  • झाडाच्या आत प्रवेश करून ते गोल देठ, मध्यशिरा, फांद्या, स्त्रीकेसर आणि कणीस खातात.
  • या उपद्रवामुळे वाढ खुंटते, पाने कमी होतात आणि उत्पादन घटते.
  • खोडात बोगदे केल्याने झाडाची ताठ रहाण्याची क्षमता घटते आणि ते कोलमडतात.
  • कणसात दाणे खराब होतात आणि गळु शकतात.
  • छिद्रात संधीसाधु बुरशींनी घर केल्याने कूज निदर्शनात येते.

मध्ये देखील मिळू शकते

1 पिके

मका

लक्षणे

अळ्या झाडाचे वरचे सर्व भाग खातात. झाडाच्या आत प्रवेश करून ते गोल देठ, मध्यशिरा, पहिल्यांदा खातात आणि रोपाच्या बुडाशी खोडात पोखरतात नंतर फांद्या, स्त्रीकेसर आणि कणीस खातात. पाणी आणि पोषके पुरविणार्‍या प्रणालीलाच खाल्ल्यामुळे पाने कमी येतात, वाढ खुंटते आणि उत्पादनही घटते. खोडात पोखरल्यामुळे झाडाची ताठ रहाण्याची क्षमता कमी होते आणि आणि ते कोलमडतात. कणसावरील गोल छिद्रातुन विष्ठा, खराब झालेले दाणे दिसतात आणि ते गळु शकतात. छिद्रात संधीसाधु बुरशींनी घर केल्याने कूज निदर्शनात येते. बुरशींनी सोडलेल्या विषामुळे पीकाच्या गुणवत्तेचे आणखीन जास्त नुकसान होते.

Recommendations

जैविक नियंत्रण

युरोपियन कणीस पोखरणार्‍या अळ्यांच्या संख्येला भक्षक, परजीवी आणि जैव कीटकनाशक वापरुन आळा घालणे शक्य आहे. स्थानिय भक्षकांमध्ये इनसिडियस फ्लॉवर बग्ज (ओरियस इनसिडियस), ग्रीन लेसविंग्ज आणि बरेचसे लेडीबर्डस येतात. विश्रांती घेणार्‍या अळ्यांना पक्षी खाऊन २०-३०% कमी करु शकतात. परजीवीत ताचिनिड माशा लिडेला थॉम्पसोनी आणि एरिबोरस टेरेब्रॅन्स, सिम्पेसिस व्हिरिड्युला आणि मॅक्सरोसेंट्रिस ग्रॅन्डी जातीचे वॅस्पस येतात. स्पिनोसॅड किंवा बॅसिलस थुरिंजिएनसिसवर आधारीत जैव कीटकनाशक सुद्धा काम करतात.

रासायनिक नियंत्रण

कणिस पोखरणार्‍या अळ्यांच्या संख्येचे नियंत्रण करण्यासाठी बरीच कीटकनाशके वापरली जाऊ शकतात. त्यांचा वापर योग्य वेळी केला गेला पाहिजे. दाणेदार कीटकनाशकांना प्राधान्य दिले पाहिजे. सायफ्लूथ्रीन, एसफेनवॅलरेट असणार्‍या कीटकनाशकांची खोडांवर आणि वाढणार्‍या कणसांवर फवारणी केली जाऊ शकते. सिंथेटिक पायरेथ्रॉइडसचा उपयोगही या कारणांसाठी केला जाऊ शकतो.

कशामुळे झाले

अळ्या जमिनीतील झाडाच्या अवशेषात विश्रांती घेतात आणि वसंत ऋतुमध्ये बाहेर येतात. युरोपियन कणीस पोखरणार्‍या अळ्यांचे प्रौढ रात्री सक्रिय असतात. नर पतंगांचे शरीर सडपातळ असुन तपकिरी छटा असते आणि पंख गव्हाळ ते तपकिरी रंगाचे असुन त्यावर पिवळे दातेरी कुसर असते. माद्या अजुनच सडपातळ व पिवळसर तपकिरी असतात, त्यांच्या पंखांवर बरेचसे गडद नागमोडी पट्टे असतात. बहुधा जेव्हा वारा कमी असतो आणि तापमान उबदार असते तेव्हा त्या पुंजक्याने पांढरी अंडी पानांच्या खालच्या बाजुला घालतात. अळ्या मळकट पांढर्‍या ते गुलाबीसर गव्हाळ रंगाच्या असतात, त्यांची त्वचा गुळगुळीत, विना केसांची असते आणि पूर्ण शरीरावर गडद ठिपके असतात. डोके गडद तपकिरी ते काळे असते. ते बरेच प्रकारचे तण आणि सोयाबीन, मिरची आणि टोमॅटोसारख्या पर्यायी यजमानांवर प्रादुर्भाव करतात. कमी अर्द्रता, रात्रीचे कमी तापमान आणि पुष्कळ पाऊस अंडी घालण्यास आणि पोखरणार्‍या अळ्यांच्या जगण्यास अनुकूल असतात.


प्रतिबंधक उपाय

  • उपलब्ध असल्यास सहनशील वाण वापरा.
  • किड्यांची उच्च संख्या टाळण्यासाठी लवकर पेरणी करा.
  • शेताचे नियमित निरीक्षण करा आणि सापळे वापरुन किड्यांच्या संख्येला आळा घाला.
  • शेतात आणि आजुबाजुला चांगले तण व्यवस्थापन करा.
  • जमिनीत सुप्तावस्थेतील कोषांना आणि झाडाच्या अवशेषांना खणुन काढुन उघड्यावर टाका.
  • यजमान नसणार्‍या पीकांसोबत पीक फेरपालट करा म्हणजे किड्यांचे जीवनचक्र मोडले जाईल.

प्लँटिक्स डाऊनलोड करा