ऑलिव्ह

ऑलिव्ह खपल्या

Parlatoria oleae

किडा

5 mins to read

थोडक्यात

  • छोटे पांढरे ठिपके पानांवर आणि राखाडी केंद्राचे काळे ठिपके फळांवर येतात.
  • जास्त लोकसंख्या असल्यास पाने मरगळतात, पिवळी पडतात आणि पानगळ होते.
  • फळे रंगहीन, विकृत होतात आणि अकाली गळतात.
  • काटक्या आणि फांद्यांची मर होते.

मध्ये देखील मिळू शकते

6 पिके
बदाम
सफरचंद
जर्दाळू
ऑलिव्ह
अधिक

ऑलिव्ह

लक्षणे

थोडक्यात म्हणजे यजमान रोपाच्या जमिनीवरील सर्व भागांवर ऑलिव्ह खपल्यांचा हल्ला होऊ शकतो. हे बहुधा खोडाच्या, फांद्यांच्या आणि काटक्यांच्या सालीवर खपलीच्या रुपात पाहिले जाऊ शकतात. तरीपण ह्यांची उपस्थिती पानांवरील छोट्या पांढर्‍या डागांनीही दिसुन येते. ऑलिव्हवर संक्रमणामुळे विकृती येते आणि राखाडी केंद्राचे काळे डाग खाल्लेल्या जागी दिसुन येतात. याऐवजी इतर फळे (उदा. सफरचंद आणि पीच) यांवर गडद लाल ठिपके दिसतात. जास्त लोकसंख्येमुळे पाने मरगळतात, पिवळी पडतात आणि पानगळ होते. फळे रंगहीन होतात आणि अकाली गळतात, काटक्या आणि फांद्या कमजोर होऊन मर होते, हे ही ह्या परिस्थितीत सर्वसामान्य आहे.

Recommendations

जैविक नियंत्रण

परजीवी वॅस्पसमध्ये, अॅफिटिस, कोकोफॅगॉइडस आणि एनकारशिया यांच्या पुष्कळ प्रजाती वसंत ऋतुतील पिढ्यांविरुद्ध वापरल्यास सफलतेने ऑलिव्ह खपल्यांची लोकसंख्या निम्म्याने कमी करतात. उन्हाळ्यातील लोकसंख्येवर मात्र कोणताही परिणाम दिसुन आलेला नाही. चेलेटोजिनस ऑर्नॅटस आणि चिलोरसच्या पुष्कळ प्रजाती, या शिकारी कोळ्यांना वापरल्यासही ते पिल्ले आणि प्रौढांवर हल्ला करुन लोकसंख्येला दडपण्यात महत्वाची भूमिका निभावतात.

रासायनिक नियंत्रण

नेहमी एकात्मिक दृष्टीकोन ठेवा म्हणजे प्रतिबंधक उपायांबरोबरच उपलब्ध असल्यास जैविक उपचार पद्धतीचा वापर करा. थंडीत डॉरमँट तेलांचे फवारे झाडाच्या लाकडी भागांवर मारले जाऊ शकतात. वसंत ऋतुत, ऑर्गॅनोफॉस्फेटसवर आधारीत कीटनियंत्रक किंवा कीटनाशकांचा वापर रांगणारे बाहेर येण्याच्या सुमारास केला जाऊ शकतो. वापराची योग्य वेळ ठरविण्यासाठी निरीक्षण गरजेचे आहे

कशामुळे झाले

पार्लाटोरिया ओले नावाच्या ऑलिव्ह खपल्यांच्या प्रौढ आणि पिल्लांनी खाल्ल्याने लक्षणे उद्भवतात. त्यांच्या खपल्या पानांवर आणि फळांवर तसेच खोडाच्या, फांद्यांच्या आणि काटक्यांच्या सालींवर दिसतात. त्यांचा विकाश फार झपाट्याने होत असल्याने, एकाच भागात जिवंत किड्यांचे पुष्कळ थर पहायला मिळतात. मृत खपल्या सर्वात वरच्या थरात असतात आणि कीटनाशकांपासुन अातील थरांचे संरक्षण करतात. तापमान आणि यजमान रोपाच्या प्रकाराप्रमाणे प्रति वर्षी त्यांच्या २-३ पिढ्या होतात. १० डिग्री सेल्शियस तापमानात त्यांची वाढ फारच कमी असते पण ते कोरड्या हवामानासही संवेदनशील आहेत. फळांवरील ठिपके त्यांनी खाताना विष आत सोडल्याने येतात आणि म्हणुन जरी खपल्या मेल्या तरील डाग कायम रहातात. ऑलिव्ह खपल्या ह्या ऑलिव्ह पिकात खास करुन टेबल वाणात फार गंभीर समस्या करतात.


प्रतिबंधक उपाय

  • आपल्या देशातील क्वारंटाइन नियम तपासा.
  • ऑलिव्ह खपल्यांच्या लक्षणांसाठी बागेचे निरीक्षण करा आणि रांगणारे किडे किती आहेत हे ठरवा.
  • निरोगी उत्पादनासाठी बागेत स्वच्छता गरजेची आहे.
  • गळलेली फळे माद्यांसाठी विश्रांती स्थाने असतात म्हणुन ती काढुन विल्हेवाट लावा.

प्लँटिक्स डाऊनलोड करा